फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो ला मिळाला जॅकपॉट
फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो ला मिळाला जॅकपॉट
भुतकाळात अशा अनेक रंजक कथां आढळतात की जर वेळ मजबूत बलवान असेल तर प्रसिद्धी आणि संपत्ती तुमच्या पायांचे चुंबन घेते. पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या बाबतीत अशीच पुन्हा एकदा अशक्यप्राय कथा गोष्ट घडली आहे. त्याला सौदी अरेबियातील एका फुटबॉल क्लबने दरवर्षी सुमारे 1800 कोटी रूपये देऊन तीन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. हा करार फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठे करार मानले जात आहे. हा तोच रोनाल्डो आहे जो फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मोरोक्कोच्या फुटबॉल संघाकडून पराभूत झाल्यानंतर रडत स्टेडियम सोडताना दिसला होता. अगदी अलीकडच्या काळात फुटबॉल जगतात रोनाल्डोचे चलनी नाणे चालत आहे हे सिध्द होत असून त्यांचे प्रचंड चाहते आजही आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषकात त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. हेच कारण आहे की त्याच्या क्लबने त्याला डच्चूच दीला नाही तर त्याला पोर्तुगाल संघात वर्ल्डकपच्या बाद फेरीत वेळा मैदानाबाहेर बसवायला लावले. त्यांच्या जागी नवीन खेळाडूंना स्थान मिळाले आणि त्यांनीही संघासाठी नवा इतिहास रचला.
फुटबॉलच्या या मोठ्या कराराने जगभरात खळबळ उडाली आहे. या कराराचे वर्णन जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम म्हणून केले जात आहे. सौदी अरेबियाने क्रिस्टियानो रोनाल्डोला एवढी रक्कम कशी का? दिली असेल काय असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालचा संघ मोरोक्कोसारख्या संघाकडून पराभूत होऊन विश्वचषकातून बाहेर पडला होता. त्यानंतर मोरोक्कोच्या विजयावर रोनाल्डोचे अश्रू आणि अरब जगतातील जल्लोषही लोकांनी पाहिला. तसे पाहिले तर विश्वचषकात रोनाल्डोची कामगिरी काही खास नव्हती. शेवटच्या दोन सामन्यांच्या सुरुवातीला त्याला मैदानाबाहेरही बसवण्यात आले होते. मात्र, मैदानात रोनाल्डो-रोनाल्डोचे नारे नक्कीच गुंजत राहिले. क्रिस्टियानो ज्या युरोपियन फुटबॉल क्लबसाठी खेळत असे, त्या मँचेस्टर युनायटेड क्लबनेही रोनाल्डोची ऑफर कमी केली कारण त्याला सोळा सामन्यांत केवळ तीन गोल करता आले होते. तथापि, आता रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल-नासरसाठी करार केला आहे, त्याचा जुना क्लब भूतकाळातील गोष्ट झाली आहे.
अशा परिस्थितीत या सदतीस वर्षीय फुटबॉलपटूसोबतचा महागडा करार कशामुळे झाला, याचीही जोरदार चर्चा आहे. या कराराचे मूळ कारण असेही सांगितले जात आहे की, अरब देश आता पाश्चिमात्य देशांत त्यांची जी प्रतिगामी प्रतिमा तयार झाली आहे ती पुसून क्रीडा जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार करत आहेत. कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकासारख्या महागड्या कार्यक्रमामागे हीच विचारसरणी आहे. पेट्रोलियम संपत्तीने समृद्ध असलेल्या मध्य आशियातील देशांना जागतिक महासत्ता म्हणून उदयास यायचे आहे. या करारामागेही सौदी अरेबियाचा विचार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नव्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये त्यांना आपल्या देशाला धार्मिक प्रतिमेपासून मुक्त करून आधुनिक देश म्हणून स्थापित करायचे आहे. या करारामुळे सौदी अरेबियाच्या संघाच्या भविष्यातील आशांना चालना म्हणूनही पाहिले जात आहे, ज्याने त्यांच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाचा पराभव केला होता. खरं तर, या विजयानंतर, संपूर्ण सौदी अरेबिया जल्लोषात मग्न झाला होता, ज्यासाठी राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली होती. त्याच वेळी, हा विजय इस्लामी देशांचा विजय म्हणून चित्रित केला जात होता. या सर्व क्षणांना पुनरावृत्तीने गती देण्यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डोसोबतचा हा महागडा करार झाला असण्याची शक्यता आहे.
काहींचा असा विश्वास आहे की खेळांना प्राधान्य देणे हा सौदी राजकुमार आपल्या देशाची प्रतिमा बदलण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. कुठेतरी जगाशी ताळमेळ राखण्याचा आणि खेळात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. असा अंदाज आहे की 2030 पर्यंत, सौदी अरेबियासह काही शेजारी फिफा विश्वचषक आयोजित करण्याचा दावा करू शकतात.
वास्तविक, सौदी अरेबियाला वाटते की महागड्या खेळाडूंशी अशा करारांमुळे देशात क्रीडा संस्कृती विकसित होईल. सोबतच सुसंस्कृत-पुरोगामी विचार करणारा देश म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित होईल. ही प्रतिमा तयार करताना, रोनाल्डोसारख्या खेळाडूची प्रतिमा उपयुक्त ठरेल कारण अशा मोठ्या करारांमुळे देश संपूर्ण जगाच्या चर्चेत राहतो. तसे पाहता, सौदी अरेबियाने अलिकडच्या वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून देशाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
तथापि, रोनाल्डो अल-नासरसाठी मैदानात परत येण्यास काही वेळ लागेल. त्याचे चाहते अजूनही आतुरतेने वाट पाहत आहेत. पण इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने रोनाल्डोवर दोन सामने खेळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळेच त्याच्या नावावर असलेल्या सामन्याची तिकिटे विकल्यानंतरही त्याला मैदानात उतरता आले नाही. खरं तर, सामना हरल्यानंतर परतताना शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या प्रेक्षकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र, याबाबत त्यांनी माफी मागितली. यावरून त्यांची संवेदनशीलतेला दिसून येतो
विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com