सिंगल स्क्रीन आणि पठाण..

सिंगल स्क्रीन आणि पठाण..
आपण सर्वांनी एकदा तरी सिंगल स्क्रीन वर सिनेमा पहिला असेलच. कारण त्यावेळी आता जसे मल्टिस्क्रीन जे मॉल मध्ये असतात तसे सिनेमा गृह नव्हते,सिने रसिकांना सिंगल स्क्रीन टॉकीज शिवाय पर्याय च नव्हता. पण असे असले तरी सिने रसिक अत्यंत जोशाने व सहपरिवार सिनेमाचा आनंद घेत असत.आपल्याला माहीत आहे की, सिंगल स्क्रीन सिनेमा असल्यामुळे तिकीट काढायची कशी कसरत आपली होत असे हे वेगळे सांगायची गरज नाही.आणि त्यात ही ब्लॅक करणाऱ्या ची तर एक फौज टॉकीज समोर उभी असत.
परंतु आज युग हे डिजिटल युग आहे असं आपण म्हणतो.पूर्वीचे सिनेमा गृह आणि आजचे सिनेमा गृह यात जमीन अस्मान चा फरक आहे जो आपण अनुभवत आहोत.. मला आज ही आठवत की,जर मी कोणता शेवटचा चित्रपट सिंगल स्क्रीन वर पहिला असेल तर तो लगान जो श्याम टॉकीज ला होता आणि गदर जो गणेश टॉकीज ला होता.त्यानंतर हे दोन्ही चित्रपट गृह बंद पडले आणि मग ज्योती बिग सिनेमा झाला, PVR आला व Bharat ई-स्केवर पण तयार झाला. हळू हळू सिंगल स्क्रीन मल्टिस्क्रीन मध्ये बदलत गेली आणि सिनेमा रसिक यांच्या सोयी-सुविधा सहित सिनेमाचे तिकिट पण वाढत गेले. अगदी छोट्या छोट्या शहरापासून ते महानगरापर्यंत या मल्टिस्क्रीन च जाळ पसरत गेलं पण असं असलं तरी काही ठिकाणी या सिंगल स्क्रीन अजून ही आपले स्थान कायम टिकून आहेत ते देखील आता डिजिटल झाले म्हणा कारण पूर्वी सारख्या फिल्म रील आता बंद झाल्या आहेत. सेटेलाईट च्या साह्याने थेट प्रेक्षपण सिनेमा गृहात होत आहे पण ते सिंगल स्क्रीन टिकून आहेत हे विशेष.
साधारणतः आज किंचितच 70 MM चा पडदा आपणास पाहायला मिळते.70 MM च्या पडद्यावर सिनेमा पहायची मज्जाच कुछ और थी, तिकीट काढण्यासाठी तास न तास रांगेत उभे राहणे, आपल्या समोर घुसून पुढे गेला की भांडणे, आत गेल्यावर जागा पकडणे, आपल्या जागेसोबत मित्राची जागा पडकणे, तो वेळेमध्ये आला नाही की त्याच्याशी वाद होणे असे कित्ती तरी गोष्टी फ़क्त तो सिनेमा पाहण्यासाठी कराव्या लागत कस बस सगळं आपली जागा पक्की झाली की मग त्या सिनेमाचा आनंद घेणे.
सिनेमाचे नाव पडद्यावर दिसताच एकच आवाज, जलोश, शिट्या झालं सुरू..आपल्या आवडत्या हिरो ची एन्ट्री झाली की,गाणे लागले की, अकॅशन सुरू झाले की मग शिट्या,टाळ्या यांचा वर्षाव च होत असे. हीच ती मज्जा फक्त आणि फक्त सिंगल स्क्रीन वरचं अनुभवायला मिळत असत किंवा आपण सर्व त्याचे साक्षीदार पण असाल.
पण हाच सिने रसिकांचा जलोश, शिट्या, आवाज आज आपल्या मल्टिस्क्रीन वर पाहायला मिळत नाही आणि कोणी जर प्रयत्न केला तर तेथिल कर्मचारी तयारच आपल्याला दम द्याला असो….
आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा मला सिंगल स्क्रीन वर सिनेमा पहायची संधी भेटली.एका खाजगी कार्यक्रमासाठी उदगीर येते आलो असता मुक्काम पडणार होता तर मग काय पठाण सिनेमा पहायचा ठरवलं आणि मी व माझे मित्र निघालो..एका रिक्षा चालकाला थांबवले, मी त्याला म्हणले की, यहा पर फिल्म का थिएटर कहा है! तो बोलला सोडतो,आम्ही बसलो…एका मित्राने त्याला विचारले की इथं PVR नाही का?तो बोला आहे पण सर आप मत जावो! मी म्हणले,ऐसा क्यू! तो बोलला की, यहा पर कल्पना नाम का थिएटर है आप वाह फिल्म देखो! आम्ही जात होतो तेवढ्यात त्याच मित्राने त्याला विचारले की,कल्पना मॉल बडा है क्या? तो बोलला की ,नही नहीं वो मॉल बिल कुछ नहीं थिएटर है बस्स! आम्हाला समजेना 5 -7 मि.आम्ही तिथं पोहचलो. पाहतो तर काय ते सिंगल स्क्रीन थिएटर आणि गेट च्या बाहेर रांग गेली तिकिट काढायची तेंव्हाच सगळया आठवणी जागी झाल्या सिंगल स्क्रीन च्या….. मग काय करावं आता हा प्रश्न पडला! तेवढ्यात एका कोपऱ्यातुन आवाज ऐकू आला बाल्कनी बाल्कनी…. समजदारो को इशारा काफी… तिकिट तर भेटली पण आत मध्ये सोडणार कधी याची वाट पाहत होतो. पाहिले खालचं फुल्ल केलं मग बाल्कनी वाले मग बॉक्स वाले.. पण आत जाताना आठवण आली ती गदर सिनेमा ची गेट ओपन केला की सगळे धावतच पळत सुटले सीट साठी.. आम्ही गर्दीत न घुसता थोडा वेळ वाट पाहिली मग आत गेलो तर काय सगळं फुल्ल… आता एक या कोपऱ्यात एक दुसऱ्या तर मी मध्ये असं कसं तरी बसलो…70 MM चा पडदा, अतिशय सुसज्ज व स्वच्छ सुंदर सिनेमा गृह, जवळपास 750-800 प्रेक्षकांना बसण्याची उत्तम व्यवस्था जशी मल्टिस्क्रीन मध्ये असते अगदी तशीच,जबरदस्त साऊंड सिस्टिम.
बाल्कनी, बॉक्स असे नांव खूप वर्षांनी पाहायला भेटले, तस पाहिलं तर आपण सर्व जण बॉक्स मध्ये बसण्यासाठी फार उत्सुक असायचो तेव्हा, पण पैसे ची अडचण असायची असो..
पठाण सिनेमा सुरू होताच प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद, टाळ्या, शिट्या, उभे राहून शाहरुख खान चे स्वागत हे सर्व आमच्यासाठी नवीन नव्हते,आपण आणि मी देखील या प्रकारेचं सिनेमा पाहिलेला आहे. पण आता जास्त सिंगल स्क्रीन नसल्यामुळे PVR आणि भारत ई-स्केवेअर किंवा अन्य मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा पाहत असल्यामुळे असा सिनेमाचा जोश कमीच दिसतो म्हणा..
खूप वर्षांनी सिगल स्क्रीन वर सिनेमा पाहायला भेटला तो पण पठाण जो सुपर से भी उपर आहे याचा आनंद जास्त आहे. आणि शाहरुख खान कमाल है बॉस !
मुद्दा हा आहे की सिगल स्क्रीन चा प्रेक्षक हा खरोखरचं सिनेमा जगत असतो. त्याच्या उत्साहाला काही ठिकाणा नसतो मनसोक्त आनंद घेणे आपल्या चाहत्या कलाकार साठी टाळ्या, शिट्या वाजविणे, ओरडणे ये बात कुछ और ही है! मी असं म्हणत नाही की मल्टिप्लेक्स मधले प्रेक्षक आनंद घेत नाहीत ते पण घेतात पण त्यांना सीमा आहेत इथं मात्र मला त्या सीमा दिसल्या नाहीत. या बसा सिनेमा पहा 2:30 ते 3 तास एन्जॉय करा आणि समाधानी व्हा! हा जो सिंगल स्क्रीन चा आपल्या मनात अनुभव आहे तो मला पुन्हा पठाण च्या निमित्ताने अनुभवायला भेटला त्या अनुषंगाने आपल्याशी हितगुज करत आहे…. आपण ही आपले अनुभव कळवावे…
(टीप: मी एक सिनेमा प्रेक्षक असल्यामुळे मी सिगल स्क्रीन व मल्टिस्क्रीन असा भेद करत नाही)
प्रा. राहुल पुंडगे, नांदेड.