हे तिरंग्या,लाजू नकोस..
हे तिरंग्या, लाजू नकोस
काल तिरंगा लहरवला गेला. तो लहरला. अगदी डौलात लहरला. त्यातच त्या तिरंग्याला सन्मान प्राप्त झाला. कारण त्याला लोकांनी जागोजागी लहरवला व नमन सुद्धा केलं. परंतू याबाबत एक विचार असाही करता येईल की खंरच आपला हात असलेला सन्मान पाहून खरंच तिरंगा खुश असेल काय? तर याचं उत्तर नाही असंच असेल. कारण अलीकडे हा तिरंगा काही काही ठिकाणी पापी माणसाच्या व गुंंड मवालीच्या हस्ते लहरत असतो.
तिरंग्याबद्दल सांगतांना एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती अशी की आज तिरंगा गल्लीगल्लीत आणि शाळेत लहरत असतो. गल्लीचा विचार केल्यास गल्लीत जे नेते असतात, त्या नेत्यांच्या हस्ते तिरंगा लहरत असतो. मग जे कोणते नेते असतात. ते खरंच पाक असतात का? तर याचंही उत्तर नाही असंच आहे. ते नेते नापाक नसतात. काही नेते हे आपल्या गल्लीत गुंडगीरी करुन निवडून येत असतात. त्या नेत्यांचे हात निरपराध माणसांच्या रक्तानं माखलेले असतात.
काही काही शाळेत जेव्हा तिरंगा लहरतो, तेव्हा हा तिरंगा त्या त्या शाळेतील संस्थाचालक फडकवीत असतो. हा संस्थाचालकही नापाक असतो का? तर याचंही उत्तर नाही असं आहे. कारण हा संचालक आपल्या शाळेतील लोकांना पाप करायला लावतो. तो आपल्या शाळेतील लोकांना असत्य बोलायला लावतो. तो भ्रष्टाचार करतो. एवढंच नाही तर तो लोकांपासून अतोनात पैसा घेत असतो.
काही काही अधिकारीही झेंडा फडकवतांना दिसले. ज्यांचे हात भ्रष्टाचारानंं लिप्त होते. तसेच काही लोकं मांसभक्षण करणारेही होते. मुक्या प्राण्यांची हत्या करणारे. खरंंच अशांच्या हातानं तिरंगा लहरल्यावर त्याला सन्मानच वाटला नसेल. अतिशय वैैषम्यता वाटत असेल.
महत्वाचं म्हणजे तिरंगा लहरविण्याची नियमावली असावी. अशी नियमावली की ज्या नियमावलीनं देशाच्या तिरंग्यालाही सन्मानच वाटेल. त्यालाही तसं लहरणं प्रतिष्ठेचं वाटेल.
तिरंगा त्यानं लहरवावा. जो इमानदार आहे. ज्याला देशाचं हित आहे. जो देशाचंं हित जोपासतो. जो भ्रष्टाचारी नाही. जो मांंसभक्षी नाही. जो उत्पादक आहे. जो गरीब आहे, परंतू लाचार नाही. एवढंंच नाही तर तिरंगा त्यानं लहरवावा की जो वायफळ बोलत नाही तर त्यातील ब-याच गोष्टी आचरणात आणतो.
खरंच अशा व्यक्तीनं तिरंगा लहरविल्यास त्यालाही लाज वाटत नाही, उलट सन्मान वाटतो. तसं पाहता त्यानं लाजू नये. आज जरी त्याला वरील प्रकारातील लोकांनी लहरवलं तरी. त्यानं सवय पाडून टाकावी. कारण अलीकडं इमानदाराचं जग नाही. दोनचार इमानदार जेे उरले आहेत. त्याचेवरच जग आधारलेले आहे. परंतू आज कलियुग असल्यानं तिरंग्याची आवडनिवड कोणी पाहात नाहीत. पाहतात आपला स्वार्थ. आज घराघरात स्वार्थ शिरला आहे. लोभानं चरणसीमा गाठली आहे. देश रसातळाला जात आहे. परंतू तिरंग्याला काय करायचं एवढं. कोणीही लहरवो आणि कोणीही सन्मान करो. आज देश भ्रष्टाचारानं लिप्त असल्यानं लोकांनी पर्याय काढला की अमूक अमूक माणसानंच त्याला लहरवावं. देशात त्याला लहरविण्यासाठी काही इमानदार लोकं आहेत. परंतू त्यांना जाणूबजून पुढं आणलं जात नाही. कारण ते जर समोर आले तर भ्रष्टाचार करता येणार नाही. भ्रष्टाचाराचा बोलबाला होणार नाही. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०