आमदार प्रा.अशोक उईके यांच्या पाठपुराव्यातून सायखेडा जलाशय भोई समाजाला
आमदार प्रा.अशोक उईके यांच्या पाठपुराव्यातून सायखेडा जलाशय भोई समाजाला
सर्वोदय मत्स्य व्यवसाय संस्था मर्या. रुंझाद्वारा आमदार प्रा.अशोक उईके यांचा सत्कार
भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भनारकर यांच्या प्रयत्नाला यश
सुनील शिरपुरे/यवतमाळ
दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायखेडा येथे सत्कार समारंभ प्रसंगी आमदार अशोक उईके साहेब यांनी भोई समाजाचे सायखेडा जलाशय प्रामुख्याने भोई समाजाला मिळावे, यासाठी वारंवार पाठपुरावा करून मिळवून दिले. त्याबद्दल भोई समाज युवा मंच व सर्वोदय मत्स्य व्यवसाय संस्था मर्या. रुंझा यांच्या वतीने राळेगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार प्रा.अशोक उईके साहेब यांचा शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सर्वोदय मत्स्य व्यवसाय संस्था मर्या. रुंझाचे अध्यक्ष देवानंद करलुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करनारे लोक नेते आण्णासाहेब पारवेकर यांचा सत्कार भोई समाज युवा मंच जिल्हा अध्यक्ष व भाजपा मच्छिमार सेल यवतमाळ जिल्हा सरचिटणीस प्रदीप भनारकर यांनी शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन केले. केळापूर पंचायत समितीचे बि.डी.ओ.विठ्ठल जाधव यांचा सत्कार भोई समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिवरकर यांनी केला. मासेमारी हा भोई समाजाचा मुख्य व्यवसाय असल्याने सायखेडा जलाशयामुळे अनेक समाज बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे भोई समाजाचे युवा नेते जिल्हाध्यक्ष प्रदीप भनारकर यांनी समाधान व्यक्त केले. असेच सर्व भोई समाज बांधवांनी एकत्र यावे अशा सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्वोदय मत्स्य व्यवसाय संस्था मर्या. रुंझाचे अध्यक्ष देवानंद करलुके, नितेश माढरे, शंकर करलुके, विजू करलुके, चंपत करलुके, सतिष करलुके, आकाश करलुके, रविंद्र करलुके, संतोष करलुके, नंदू करलुके, अनिल भनारकर उपस्थित होते. भोई राजा जागा हो एकतेचा धागा हो..!