बुध्द हसतोय का ?
बुध्द हसतोय का ?
बुध्द म्हणजे परम ज्ञान.ते तसे परम मानवीय असते.शांती,सुखाचे असते.त्यात मैत्री,बंधुत्वाचे नाते असते.ते नाकारण्यावर ही बुध्द हसत नाही.पण त्यांना अणू विस्फोट घडवून श्रीमती इंदिरा गांधी आणि त्यांच्या नंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी हसायला लावले. त्यांचे ते हसणे उपहासात्मक होते.तसे ते कदापि ही कधी दुःखावर,संकटावर रडत नाहीत.हसत ही नाही.नेहमी सम्यक असतात.परम शांत चित्त मुद्रेवर अस्सीम कारुण्याचे भाव असते. मौन पाळतात.ते पुढच्याला बरेच काही सांगून जाते.कारण दुःख,संकट हे अज्ञानातून आहे.त्या कर्त्या व्यक्तीला सज्ञानी करा.आणि पुढे आशावाद जागविताना म्हणतात, दुःख,सुख व सारेच काही अनित्य आहे.क्षणभंगूर आहे.क्षण प्रतीक्षण परीवर्तनशील आहे.गतीशील आहे. असा ते उपदेश करतात.बुध्दाचा उपदेश हे लोकांना आवाहन आणि आव्हान असते.आवाहन हे सकारात्मक आहे.आणि आव्हान हे बाध्यतेचे परिक्षण आहे.
युक्रेन वरील रशियाचा हल्ला हा बुध्दाच्या दृष्टीकोनातून घेतला तर,तो रशियाला आवाहन ही आहे आणि आव्हान सुध्दा आहे.कारण युक्रेन वर हल्ला, तो राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर पुनित यांचा आहे.रशियन जनतेचा नाही.दोन्ही देशाची जनता या हल्ल्याच्या विरोधात आहे.ते दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षाच्या अहंकारातून घडवून आला आहे.अहंकार हा अज्ञानातून जन्मतो.त्यावर बुद्धाचे उपाहासात्मक हंसणे असू शकते.असाच हंसा अणूबॉम्ब परीक्षणावेळी प्रधानमंत्री म्हणून श्रीमती इंदिरा गांधी आणि त्या नंतर त्याच पदावरील अटलबिहारी वाजपेयी यांनी बुध्दाच्या माथी मारला होता.अणू परीक्षण हा श्रीमती इंदिरा गांधी व वाजपेयींचा शत्रू देशांना दंभ होता.तर जगाला ‘ हम किसी से कम नहीं ‘ हा अहंकार प्रदर्शित करणारा होता.त्यावर बुध्द नक्की हंसत असतील.माझ्या जन्म-कर्मभूमीत प्रचंड संहारक अस्त्राचे परीक्षण ?
बुध्द उपदेश देतात,विवाद,तंटा हा आपसी चर्चेतून समोपचाराने सोडवा.असे ते निक्षून आवाहन करतात.पिता राजा शुध्दोधन यांच्या काळात कपिलवस्तू राज्याशी रोहिणी नदीच्या जलावरुन शेजारच्या कोलियं राज्याशी विवाद उद्भवला.सिध्दार्थ गौतम हा तेव्हा शाक्य युवक संघाचा प्रमुख होता.त्यांच्या संघाची जल विवादावर बैठक झाली.यात काहींनी आक्रमकपणे युध्दाची भूमिका घेतली.सिध्दार्थ एकटे विरोधक पडले.तो विरोध आपल्या एकट्याचा आहे.त्यात आई-वडील,पत्नी,राज्य आदिंची कोणतीही भूमिका वा दोष नाही.मग शाक्य संघातील बहुमताच्या निर्णयाची शिक्षा त्यांना कशी ? ते मलाच भोगावी लागेल.यातून त्यांनी गृहत्याग केला.आणि शाक्य व कोलिय या शेजार राज्यातील संघर्ष टाळला.असेच काहीसे रशियाचे व्लोदिमीर पुनित व युक्रेनचे व्लाडिमीर झेलेन्स्की या दोघांना करता आले असते.त्यातून युध्दाची परिस्थिती टाळता आली असती.पण त्यांचा तेथे अहंकार आडवा आला.झेलेन्स्की नाटो देशांचा तर पुनितला आपल्या सैन्य व शस्त्रे बळाचा अहंकार होतो.आज पाच दिवस झाले.कोणताही निर्णय निघाला नाही.मात्र यात दोन्ही देशांचे निरपराध नागरीक हकनाक बळी पडत आहेत.तर बाकी आपल्या जिवाच्या आकांताने भयग्रस्त झाले आहेत.वरुन दोन्ही देशांची होत असलेली प्रचंड वित्त हानी.रशियाला युक्रेन वर हल्ले कायम ठेवण्यासाठी दररोज सव्वा लाख कोटी रुपये खर्च येत आहे.हा लोकांच्या खिशातून करापोटी आलेला पैसा असा लोकांना,एका देशाला उध्वस्त करण्यासाठी पाण्या सारखा खर्च केल्या जात आहे.तो निर्णय केवळ एक व्यक्ती घेतो.त्यात त्याचा दंभ आहे.अहंकार आहे.त्याच्या असल्या निर्णयाने केवळ युक्रेनचाच नाश होणार नाही तर त्याची जबरदस्त झळ रशियन लोकांना ही सोसावी लागणार आहे.हे हल्ले रशियाकडून अधिक दिवस राहिले तर रशियाचे दिवाळे निघून त्याच्या यातना सामान्य रशियन जनतेला ही भोगाव्या लागणार आहे.हे लक्षात घेतले पाहिजे.
जेमतेम आम्ही विश्वस्तरावर अजून पर्यंत कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या महामारीतून सावरलेले नाहीत.त्यात आमची म्हणजे प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.असे असताना, युक्रेन-रशिया युध्द तर अविवेकाचा अतिरेक म्हणता येईल.तो अतिरेकीपणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्लोदिमीर पुनित यांनी केला आहे.हा प्रकार सर्वाधिकार संपन्नतेचा दुष्परिणाम म्हणता येईल.तो असाच अतिरेकपणा जबरीने यापूर्वी जर्मनीच्या हुकूमशहा हिटलरने अवलंबून जगाला अनाहूतपणे दुसऱ्या महायुद्धात लोटले होते.त्याची विभिषिका आपण इतिहास म्हणून वाचतो.तर अमानवीय अनुभूती जापान मध्ये आताही खाणाखुणाच्या रुपाने बघायला मिळते.दुसऱ्या महायुध्दात मनुष्य व साधन संपत्तीची सर्वाधिक हानी रशियाला सोसावी लागली होती.जर्मनी हल्ल्याचा पाडाव करण्यासाठी रशियाला आपले पाच लाखा पेक्षा अधिक लोक गमवावे लागले होते.असे असताना पुन्हा संपूर्ण जगाला तिसऱ्या विश्व युध्दाच्या दारात आणण्याचा प्रयत्न रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर पुनित करीत आहेत.हा त्यांचा मुर्खपणा अज्ञानाचा कळस आहे.असेच अत्यंत व्यतीत मनाने म्हणता येईल.
कदापि तिसरे महायुध्द झाले तर पुनित व झेलेन्स्की हे आणि त्यांच्या दोन्ही देशांचे अस्तित्व राहणार की नाही ? हे सांगता येणार नाही.कारण युक्रेन च्या मदतीला महाशक्ती अमेरिकेच्या छत्रछायेतील तीस देशाचे सामरीक संघटन नाटोचे देश सहभागी होवू पहात आहेत.युक्रेनला आता संहारक शस्त्रे पुरवत आहेत. पुढे त्यांच्या सैन्यांनी यात उडी घेतली तर महायुध्द अपरिहार्य होवून जाते.ते तिसरे महायुध्द ठरेल. तिसऱ्या महायुद्धाची विभिषिका ही कल्पनेच्या पलीकडे असेल.पृथ्वीच्या अस्तित्वापुढेच प्रश्न चिन्ह असेल.कारण जगातील अनेक देशांकडे काही क्षणात विध्वंसक अस्त्र-शस्त्राचे प्रचंड साठे आहेत.असे म्हणतात, त्यांच्या वापरामुळे समस्त पृथ्वीला अनेकदा अस्तित्वहीन करता येते.असे विदारक विध्वंसक चित्र वैज्ञानिक दररोज संगणकावर आभासी पध्दतीने बघत असतात.आणि ते जगापुढे मांडत, जगाला शहाणपणा देत असतात.त्यावर दोन लोकांच्या अहंकाराने मात दिली आहे.ज्ञानावर अज्ञानता भारी झाली आहे.त्याची परिणिती आपले सर्वांचे अस्तित्व अंधारात आले आहे.ज्या मानवाने या पृथ्वीला फुलविले,जोपासले,सुंदर केले,तीच मनुष्य जाती आपल्या अहंकारातून आज त्यांच्या अस्तित्वालाच उघड-उघड आव्हान उभे करती झाली आहे.हे त्यांचे घोर अज्ञान आहे.त्या अज्ञानावर बुध्द उपाहासात्मक हंसत आहे……
अशीच अहंकारी,दंभकारी शक्ती आपल्या देशातील सत्तेत आहे.या शक्तीने गेल्या सात-साडे सात वर्षांत ऐतदेशीय आपल्या माणसां माणसातील मैत्री,बंधुभावाच्या दुव्यांना निर्दयपणे तुडवले आहे.देशाच्या एकता व अखंडतेपुढे आव्हान उभे केले आहे.व्लादिमीर हा एकाधिकारशहा विश्वाला तर अशाच थाटाचा संघी अनौरस पिळावल देशाला उध्वस्त करायला निघाला आहे.हे दोघेही मानवतेचे शत्रू आहेत.त्यांच्यावर बुध्द उपाहासात्मक हंसत आहे.
मिलिंद फुलझेले
२८/२/२०२२