ओबीसी कोणाचे हातचे खेळणे
ओबीसी कोणाचे हातचे खेळणे
वर्ण व्यवस्थेत ओबीसी समाज शुद्र म्हणून गणला जातो. मनुस्मृती मध्ये ज्या शिक्षा व सेवा करण्याचे आदेश दिले ते शुद्राकरिता प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचे काम ब्राम्हण व्यवस्थेने केले आहे.ओबीसी समाज कोणतीही तक्रार न करता ईमानदारीने ते करत आले.ईग्रज शासन असताना 1931,,, मध्ये ओबीसीची जनगणना करण्यात आली. भारताची राज्यघटना लिहीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी पंजाबराव देशमुख व देशातील ओबीसी नेत्यांना बोलावून सवलती देणया बाबत चर्चा केली.परतु हिन्दु मानसिकतेचा पगडा असल्यामुळे व जनजागृती नसल्यामुळे हा मुदा मागे पडला .व मूलभूत हक्क मध्ये समावेश होऊ शकला नाही.डा बाबासाहेब आंबेडकर यानी३४०कलमाचा घटनेत अंतर्भाव करुन ओबीसी समाजाची दर दहा वर्षांनी सामाजिक आर्थिक स्थितीचे अवलोकन करण्यासाठी आयोगाची निर्मिती करण्याचा समावेश केला. भारत देशात राज्य घटना लागू झाली. बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदामंत्री होते. त्यांनी पडीत जवाहरलाल नेहरू याना मागणी पत्र दिले की ओबीसी समाजाची अर्थीक समाजिक शैक्षणिक परिस्थितीच्या आढावा घेण्यास आयोगाची निर्मिती करण्यात यावी .त्याची मगणी मानल्या गेली नाही.
म्हणून कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला.१९५३ला काका कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला.देशात फिरुन ओबीसी समाजासाठी आरक्षणाची शिफारस केली .सरकार काँग्रेस पक्षाचे होते ब्राम्हण वर्चस्वाखाली होते.काका कालेकरना दबाव टाकून दुरुस्त पत्र लिहावे लागले की आयोगानी केलेल्या शिफारसी लागू करू नये.बाबासाहेब यानी याचा निषेध केला व ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून जन जागृतीची चळवळ करण्याचे आव्हान केले. देशात चळवळ सुरू झाली परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार असे पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.१९७५ ला आणीबाणी लावण्यात आली . सर्व विरोधी पक्ष नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आले .१९७७,ला जनता पक्षाचे सरकार आले. व त्यांनी बी पी मडल यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आयोग नेमण्यात आला.१९८० मध्ये सरकारला आयोगानी अहवाल सादर केला.इदिरा गांधी यांच्या नेतृत्वात सरकार आले परंतु आयोगावर कोणतेही कारवाई केली नाही देशात मंडल आयोग लागू करा अशी चळवळ सुरू झाली.आबेडकरीसघटनानी मडल आयोगाचीशिफारश लागू करण्यात यावी ह्यासाठी आदोलन केले .ओबीसी समाजाची अशी समझ करण्यात आली की हाअनुसूचीत जाती साठी आहे.हा समझ दृढझाला १९९० ला व्हिपी सिंगांच्या नेतृतवात सरकार आले त्यांनी ७/८/१९९०,ला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आले.भारतीय जनता पक्षानी पाठिंबा काढून घेतला.
लालकृष्ण अडवाणी कमंडल यात्रा काढली. राम मंदिराच्या नावानी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात सामील झाला.६/१२/१९९२,,,,ला बाबरी मस्जिद पाडली मुस्लीम द्वेष ओबीसीत पसरविला.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन दुःखाचा दिवस त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला.व आपलीं सांस्कृतिक सत्ता मजबूत केली.ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आपले सरकार दावावर लावले त्या व्हिपी सिग व आबेडकरी सघटना याना दूर करून भाजपा व काँग्रेस पक्षाला कवटाळले . ब्राम्हणी व्यवस्थेचा भार वाहण्यात धन्यता मानली.जातीय मानसिकतेने आंधळा झाला असल्यामुळे जातीव्यवस्था नुसार महाराष्ट्र राज्य मध्ये महार समाजांचा द्वेष करतात.ज्यानी ओबीसि आरक्षणाला विरोध केला ते हितेषी व समर्थन करणारे विरोधी ही अवस्था आहे.जोपरयत ओबीसी समाज ब्राम्हणी व्यवस्थेचे ओझे वाहणे बंद करीत नाही व मित्र व विरोधक ओळखत नाही तोपर्यंत ब्राम्हणी व्यवस्थेला कोणताही धोका नाही हे समजणे आवश्यक आहे.
विनायकराव जामगडे
७८२३०९३५५६
९३७२४५६३८९