Life Style

हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

हवामान बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग संकट, ज्याबद्दल प्रसारमाध्यमे आणि पर्यावरण संरक्षण संस्था सतत इशारे देत आहेत, ते आता वास्तव बनत आहे. गंमत अशी आहे की या संकटाच्या गांभीर्याबद्दल ना धोरणकर्ते गंभीर आहेत, ना सार्वजनिक पातळीवर जन जागृतीचा खूप अभाव आहे. हवामान बदलाचे संकट किती मोठे आहे, हे क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह या जागतिक संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. संस्थेने जगातील सर्व देशात आणि प्रदेशांमध्ये तयार केलेल्या पर्यावरणावर केंद्रित असलेल्या भौतिक हवामानाच्या जोखमींचे तार्किक विश्लेषण केले आहे. वास्तविक, हवामान बदलामुळे आपली पिके, हवामान आणि जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामांचे आकलन करून पन्नास संवेदनशील क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतातील सर्व राज्यांचा या संकटाच्या यादीत समावेश होणे ही चिंतेची बाब आहे. बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळचाही या यादीत समावेश आहे.
या राज्यात हवामान बदलाचा ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली असून तर देशाच्या अन्नसुरक्षेसाठी आव्हान निर्माण होऊ शकते असा इशारा दिला आहे . या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर या आव्हानाला तोंड देण्यासाठी रणनीती आखण्याची गरज व्यक्त होत आहे. तेही अशा वेळी जेव्हा देशात आर्थिक विषमता सातत्याने वाढत आहे, तेव्हा आपल्याला हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या संकटाची जाणीव ठेवावी लागेल. खरं तर, या संकटाचा सर्वात मोठा फटका समाजातील दुर्बल घटकांना आणि शेतमजुरीसारख्या व्यवसायांना बसतो.

खरे तर केंद्र आणि राज्यांनी या गंभीर समस्येविरोधात संयुक्त मोहीम राबविण्याची गरज असून शेतकरी आणि सर्वसामान्यांना जागरुक करण्याची गरज आहे. वाढत्या तापमानामुळे आपल्या पिकांची उत्पादकता कमी होते, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. वाढत्या तापमानामुळे अन्नधान्याचे उत्पादन आणि दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडतो व शेतकरी हवालदिल होतो .

अशा परिस्थितीत आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी पुढे येण्याची गरज आहे. यासोबतच आजवर प्रयोगशाळांमध्ये जे संशोधन झाले आहे, ते शेतीपर्यंत शेतकर्‍यांच्या बांधापर्यत नेण्याची गरज आहे. जगातील कार्बन उत्सर्जन करणारे विकसित देश गेली अनेक दशके या दिशेने ज्या प्रकारे बेफिकीर राहिले आहेत, त्यात लवकरच कोणताही बदल दिसून येणार नाही, हे निश्चित. अशा परिस्थितीत आपल्याला हरित ऊर्जेला प्रोत्साहन द्यावे लागेल, जीवाश्म ऊर्जा टाळावी लागेल आणि निसर्ग अनुकूल धोरणांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आपली उपभोगवादी संस्कृती आणि निसर्गाच्या चक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे .अशा परिस्थितीत झाडे लावणे आणि हरित क्षेत्र वाढवणे याला प्राधान्य द्यावे लागेल. हवामानातील असामान्य बदल आपल्या पारंपारिक जलस्रोतांवरही विपरित परिणाम करेल. येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी जलस्रोतांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तापमान वाढले की जलस्रोत आकुंचन पावू लागतात हे निश्चित. असेच संकट देशातील अनेक महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या तापमानात अनपेक्षित वाढ झाल्याने गहू, कडधान्ये आणि तेलबियांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर आपली हंगामी फळेही त्याच्या प्रभावाखाली येऊ शकतात. गुणवत्तेसोबतच हवामान बदलाचा परिणाम उत्पादकतेवर दिसून येत आहे. आजकाल, आपण मार्च मध्ये जे एप्रिलचे हवामान अनुभवत आहोत तो हवामान धोक्यांचा आवाज मानला पाहिजे.

विकास परसराम मेश्राम
मु+पो,झरपडा
ता अर्जुनी मोरगाव
जिल्हा गोदिया
मोबाईल नंबर ७८७५५९२८००
vikasmeshram04@gmail.com

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button