भिमाचा गोतावळा”

“भिमाचा गोतावळा”
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा ज्वलंतकार,राडा राडा फेम शाहिर सचिन डांगळे यांच्या लिखाणातून अवतरलेले “भिमाचा गोतावळा” हे गीत म्हणजे जगातल्या सर्व आंबेडकरी जनतेला एका संवेदनशील कलाकाराकड़ून प्रेमळ भेटच आहे.
पुण्यातील सतीश शिरसट यांच्या संगीताने तसेच सतीश आणि अमरावतीतील जयभीम कडक फेम (रॅपटोली) स्वप्निल गणवीर यांच्या आवाजाने या गीताला योग्य असा न्याय दिलेला आहे.उत्कृष्ट ढोलकी वादक महेश लोखंडे यांनी रिधम अरेंजमेंट केलेली आहे.
या गीताला गौरव सोमवंशी हे निर्माता म्हणून लाभले आहेत.आणि कोलंबिया यूनिव्हरसीटीचे सीनेट अध्यक्ष विकास तातड यांनी या गाण्यासाठी यूनिव्हरसिटीमधील विडिओ मिळवून दिले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात जातधर्म न पाहता जगातील माझ्या संपर्कात असणाऱ्या आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी पुढाकार घेऊन संकटग्रस्त लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मला जे सहकार्य केले तेंव्हा सूचलेले हे गीत आहे.या गीताला लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आशा शाहिर सचिन डांगळे यांनी व्यक्त केली आहे.सदर गीत Swarup Dangle या यू टूब चॅनेलवर प्रकाशित झालेले आहे.
विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या