विदर्भातील भोई समाजाचे एकमेव श्रद्धास्थान हागोडबुआ देवस्थान विश्वस्त सचिवपदी प्रदीप भनारकर यांची निवड
विदर्भातील भोई समाजाचे एकमेव श्रद्धास्थान हागोडबुआ देवस्थान तातापूर
भोई समाजाचे युवा नेते प्रदीप भनारकर यांची विश्वस्त मंडळाच्या सचिवपदी निवड
सुनील शिरपुरे/यवतमाळ
भोई समाजाचे विदर्भातील एकमेव श्रद्धास्थान असलेले श्री.हागोडबुआ देवस्थान तातापूर येथील चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. यात्रेत सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली व देवस्थानच्या विश्वस्तांना पूर्णपणे सहकार्य केले. या प्रथमत: वर्षात शंभर स्वयंसेवकांनी आपली सेवा दिली आणि आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या धार्मिक स्थळाला भेट दिली नाही. परंतु यावर्षी मात्र या यात्रेत विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. संदिपभाऊ धुर्वे यांनी भेट दिली. भोई समाजाचे श्रद्धास्थान अतिशय महत्त्वपू्र्ण असून सर्व समाज बांधवांना एकत्र पाहून अतिशय प्रसन्न झाल्याचे व देवस्थानला कसलीही मदत लागल्यास नक्कीच हाक देण्याचे मत व्यक्त करत मी तुमच्या मदतीसाठी तत्पर आहोत असे मनोगत आमदार संदिप धुर्वे यांनी सर्व समाज बांधवांसमोर व्यक्त केले. श्री हागोडबुआ देवस्थानच्या वतीने आमदार साहेबांचा शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ व हागोडबुआ देवतेची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला व त्यांच्यासोबत असलेले आनंद वैद्य, नगर सेवक बंटी जुवारे, प्रितेश बोरेले, विपीन राठोड व अन्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थानचे कटीबद्ध नियोजन पाहता आमदार संदिप धूर्वे यांनी देवस्थानचे अध्यक्ष कैलास नान्हे व सचिव प्रदीप भनारकर यांचा सत्कार केला व सर्व विश्वस्त उपाध्यक्ष लिंबा शिवरकर, कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर, विश्वस्त प्रकाश पारशिवे, बापू पारशिवे, रमेश शिवरकर, काशीनाथ पारशिवे, बंडु नान्ने, लक्ष्मण करलुके, लक्ष्मण शिवरकर, शेखर नान्ने, रमेश शिवरकर, अर्जुन करलुके, संजय नान्ने, सुरेश करलुके, चंदू कामतवार, संतोष मढरे, गजानन शिवरकर यांना असेच शुभ कार्य तुमच्या हातून पार पडो अशी ईश्वचरणी प्रार्थना करत दरवर्षी अशीच प्रगती होत राहो अशी आशा आमदार संदिप धूर्वे यांनी व्यक्त केले. दोन दिवसापूर्वीच या देवस्थानच्या विश्वस्त सचिवपदी भोई समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष व भोई समाजाचे युवा नेते प्रदीप भनारकर यांची एकमताने निवड झाल्याबद्दल व समाजाप्रति असेच प्रेमभाव असावे या हेतुने पुढील वाटचालीसाठी त्यांना समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले.