बसपाची समीक्षा बैठक संपन्न, 24 ला नागपुरात कार्यकर्ता संमेलन
बसपाची समीक्षा बैठक संपन्न, 24 ला नागपुरात कार्यकर्ता संमेलन
नागपूर:हल्ली लोकसभा विधानसभेचे वारे जोरात वाहत असल्याने बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांच्या दिशानिर्देशाने महाराष्ट्रात 3 नवीन प्रभाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र प्रदेश स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्यस्तरीय दौऱ्याचे आयोजन केले असून त्या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी नागपुरात महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी ऍड सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात नागपूर जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची समीक्षा बैठक घेण्यात आली.
या समीक्षा बैठकीत महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रा सुनील कोचे, नरेश वासनिक बबलू डे, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, सुनंदाताई नितनवरे, शहराध्यक्ष सादाब खान, शहर प्रभारी इंजि सुमंत गणवीर, विकास नारायने, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रदेश प्रभारी ऍड सुनील डोंगरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून संघटन बांधणीचा व कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी योगेश लांजेवार (उत्तर नागपूर) सहित अनेकावर वेगवेगळ्या विधानसभेच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. विदर्भात 14 ते 25 जून पर्यंत बसपा नेत्यांच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले असून नागपुरात 24 जून रोजी जिल्हास्तरीय कार्यकर्ता संमेलन व समीक्षा बैठक होणार आहे.
विदर्भातील दौऱ्याची सुरुवात 14 जून रोजी बुलढाणा इथून होईल. 15 ला अकोला, 16 ला वाशिम, 18 ला अमरावती, 19 ला यवतमाळ, 20 ला चंद्रपूर, 21 ला गडचिरोली, 22 ला गोंदिया, 23 ला भंडारा, 24 ला नागपूर व 25 ला वर्धा असे या दौऱ्याचे आयोजन आहे.
या संमेलनाला महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी भीम राजभर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड संदीप ताजने तसेच महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.