मांगली येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती
मांगली येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती
सुनील शिरपुरे/झरीजामणी
पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला. एक अतिशय योग्य शासक, संघटक, न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याच्या ‘तत्वज्ञानी राणी ‘ म्हूणन ओळखल्या जाणा-या अशा या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची मांगली येथे २९८ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी समस्त मांगली ग्रामवासी तथा समस्त धनगर समाज बांधव आणि युवा मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.विजय काकडे तर प्रमुख अतिथी धीरज गोरे, कुणाल डावे व संकेत गोरे हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अवी गोरे तर आभार रोशन चामाटे यानी केले. या कार्यक्रमासाठी शिवा डावे, अनुप चामाटे, युगल चामाटे, गनु बोधे, यश चामाटे, साहिल चामाटे, नितिन काळे, संकेत चामाटे, नयन चामाटे, हर्षू चामाटे, सुरज गोरे आणि रितिक चामाटे यांनी सहकार्य केले.