शेतकऱ्यांनो काय आहे ऑलिव्ह उर्फ जैतून उत्पादन त्यातून कसा नफा मिळवायचा
शेतकऱ्यांनो काय आहे ऑलिव्ह उर्फ जैतून उत्पादन त्यातून कसा नफा मिळवायचा
ऑलिव्हला जैतून असंही म्हणतात.
भारतात ऑलिव्ह उत्पादन राजस्थान राज्यात घेतलं जातं. ऑलिव्ह हे मूळचं भारतातलं नाही. देशात ऑलिव्हचं उत्पादन २००७ मध्ये सुरू झालं. इस्रायलमधून ऑलिव्हची रोपं आयात केली गेली आणि राजस्थानच्या थर वाळवंटात त्याची लागवड केली गेली. भारतात प्रथम ऑलिव्ह उत्पादन २०१२ मध्ये झालं आणि ऑलिव्ह ऑइलचं व्यावसायिक उत्पादन सप्टेंबर 2013 २०१३ मध्ये सुरू झालं. राज ऑइल नावाचा पहिला भारतीय-निर्मित ऑलिव्ह ऑइल ब्रँड ९ नोव्हेंबर २०१६ रोजी लॉन्च करण्यात आला. २०२० मध्ये भारतानं १५० टन ऑलिव्हचं उत्पादन केलं.
नित्झानेई सिनाई या राजस्थानी राजघराण्यातल्या स्त्रीनं नेगेव वाळवंटात ऑलिव्हचं पीक पाहिलं आणि तिला वाटलं की, आपण ते राजस्थानच्या थरच्या वाळवंटात वाढवू शकू. राजस्थानला परतल्यानंतर तिनं भारतीय कृषी संशोधन परिषदेची भेट घेतली. पण त्यांनी १९८५ मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये ऑलिव्ह पिकवण्याचा पूर्वीचा अयशस्वी प्रयत्न सांगून तिचा प्रस्ताव नाकारला. मात्र राजस्थान सरकारनं स्वतःहून प्रकल्प पुढं नेण्याचा निर्णय घेतला. त्यातून १९ एप्रिल २००७ रोजी राजस्थान ऑलिव्ह कल्टिव्हेशन लिमिटेड (आरओसीएल) ची स्थापना करण्यात आली. त्यात राजस्थान राज्य कृषी विपणन मंडळ (आरएसएएमबी), पुण्यातली फलोत्पादन कंपनी प्लास्ट्रो प्लासन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड (आता फिनोलेक्स प्लासन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड) आणि इस्रायल इंडोलिव्ह लिमिटेड कंपनीनं राजस्थानमध्ये ऑलिव्ह पिकवण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी समान भागीदारी केली. राजस्थान सरकारनं प्रकल्पासाठी जमीन आणि तीन दशलक्ष डॉलर्स निधी प्रदान केला. फिनोलेक्स प्लासन इंडस्ट्रीजनं सूक्ष्म सिंचन उपाय आणि उपकरणं पुरवली, तर इंडोलिव्हनं प्रकल्पासाठी आवश्यक कौशल्य प्रदान केली. आरएसएएमबी आणि फिनोलेक्स यांनीही या प्रकल्पात प्रत्येकी १.५ कोटी गुंतवणूक केली आहे.
त्यानंतर बर्निया, अर्बेक्विना, कोर्टिना, कोरोनेकी, पिकुअल, फ्रँटोयो आणि पिकोलीन या ऑलिव्हच्या जाती इस्रायलमधून आयात केल्या गेल्या आणि १९२ हेक्टरमध्ये लागवड केली गेली.
या प्रकल्पासाठी जयपूर, झुंझुनू, बिकानेर, श्रीगंगानगर, नागौर, जालोर आणि अलवर जिल्ह्यांमध्ये आठ ऑलिव्ह फार्मची स्थापना करण्यात आली. जयपूरजवळ दुर्गापुरा इथं रोपवाटिका स्थापन करण्यात आली. २०११ मध्ये रोपं फुलण्यास सुरुवात झाली आणि २०१२ पर्यंत फळ देण्यास सुरुवात झाली. तथापि ७ जातींपैकी फक्त ३ जातींना फळं आली. त्यामुळं एकूण उत्पादन फक्त दहा टन झालं. प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलं की ऑलिव्हमध्ये तेलाचं प्रमाण ९-१४% आहे आणि इतर ऑलिव्ह उत्पादक देशांमध्ये हे तेलाचं प्रमाण १२-१६% असतं. भारतात आता उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जातोय.अत्यंत उच्च तापमान, लांबलचक पावसाळा आणि थंड हिवाळा ऑलिव्हला त्रासदायक असतो. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये ही वनस्पती वाढवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले, याचं कारण तिथं तज्ञांच्या अभाव होता हे मानलं जातं.
त्यानंतर राजस्थान सरकारनं बस्सी, जयपूर इथं ऑलिव्ह नर्सरीची स्थापना केली. दर वर्षी एक दशलक्ष रोपांची निर्मिती करण्याची क्षमता आणि राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये ऑलिव्ह लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिव्ह रोपं, खतं आणि ठिबक सिंचनसाठी सबसिडीची घोषणा केली.
राजस्थानमध्ये सप्टेंबर २०१३ मध्ये व्यावसायिक ऑलिव्ह ऑईल उत्पादनाला सुरुवात झाली. २०१३ पर्यंत राज्यात सुमारे २६० हेक्टर (६४२ एकर) सार्वजनिक आणि खाजगी जमिनीवर १४४,००० हून अधिक ऑलिव्ह झाडं लावण्यात आली. राजस्थाननं २०१४ मध्ये १००-११० टन ऑलिव्हचं उत्पादन केलं. त्याच वर्षी एक तेल काढण्याचं यंत्र इटलीहून आणलं गेलं आणि बिकानेरमध्ये ऑलिव्ह ऑइल रिफायनरी स्थापन करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये राजस्थाननं राज्यातील ५२०० हेक्टर क्षेत्रावर ऑलिव्ह उत्पादन वाढवण्याची योजना जाहीर केली. राजस्थान सरकारने ९ नोव्हेंबर २०१६ रोजी जयपूर इथल्या ग्लोबल राजस्थान ऍग्री-टेक मीट (GRAM) मध्ये राज ऑइल नावाचा भारतातला पहिला ऑलिव्ह ऑइल ब्रँड लाँच केला.
योग्य परिस्थिती उपलब्ध असेल तरच ऑलिव्हचं झाड भारतात वाढू शकतं. सध्या भारतात ऑलिव्हची लागवड करणारी ४ राज्य आहेत. ऑलिव्ह ट्री शेती फायदेशीर आहे आणि शेतकरी ३ वर्षानंतर दर वर्षी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन करू शकतात. ऑलिव्हला उष्ण ते उपोष्णकटिबंधीय हवामान आवश्यक असतं. समुद्रसपाटीपासून १५०९ मीटर अक्षांशावर याची लागवड करता येते. इष्टतम तापमान श्रेणी १५ ते ३० अंश आहे. यासाठी १०० तास थंड वातावरण आवश्यक आहे.
ऑलिव्ह वालुकामय, चांगला निचरा असलेल्या भागात उत्तम वाढतात. नायट्रोजन खतामुळं अंकुरांची नीट वाढ होऊ शकते.
त्यांची काळजी घेणं सोपं आहे. ऑलिव्ह झाडांना कमी देखभाल लागते. कोरडी माती आणि हवा, नियमित पाणी आणि दररोज सहा तास सूर्यप्रकाश त्यांना लागतो. उबदार तापमानदेखील त्यांना चालतं.
एक प्रौढ ऑलिव्ह झाड दर वर्षी १५ ते २० किलोग्रॅम (३३ ते ४४ पौंड) ऑलिव्ह फळं तयार करतं. एक लिटर तेल तयार करण्यासाठी सुमारे पाच किलो ऑलिव्ह लागत असल्यानं, एक झाड वर्षाला तीन ते चार लिटर तेल तयार करतं.
एका एकरात २० फूट बाय २० फूट अंतरावर झाडाची लागवड केली तर, झाडांची एकूण संख्या १०८ होते. आणि प्रत्येक झाड अंदाजे ३५ किलो फळं देते. तर एक एकर जमिनीतून एकूण फळ उत्पादन १०८ झाडं x ३५ किलो = ३७८० किलो फळं मिळतात. ही फळं ७५६ लिटर ऑलिव्ह ऑइल देतात. याला साधारण दोन ते अडीच लाख रुपये भाव मिळतो.
ऑलिव्ह तेल खाण्यात वापरतात, सौंदर्य प्रसाधनं आणि औषधातही वापरतात.
ऑलिव्हची झाडं अंदाजे ५०० वर्षं जगतात.
ऑलिव्हची झाडं खनिज-समृद्ध, चांगल्या निचऱ्याच्या जमिनीवर वाढतात. यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त नसतं, त्यामुळं कंपोस्ट आणि कुजलेलं खत दिलं नाही तरी चालतं. त्याऐवजी Vitax ऑलिव्ह फीडचा वार्षिक वापर केला जातो.
ऑलिव्हची झाडं सदाहरित असतात आणि २५ ते ३० फूट उंच वाढू शकतात
जलपाई हे भारतात संशोधन करून तयार केलेली ऑलिव्हची जात आहे. याचं तेल गोड आणि आंबट पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं.
ऑलिव्ह झाडांना पाणी कमी लागतं. ऑलिव्ह झाडाची लागवड करताना माती ओलसर लागते, पण खूप पाणी चालत नाही. जैतूनच्या झाडाला पहिल्या वर्षासाठी आठवड्यातून एकदा पाणी पुरेसं असतं. ऑलिव्हच्या झाडानं बळ धरल्यावर महिन्यातून एकदा खोल पाणी दिलेलं पुरतं.
ऑलिव्हची झाडं जड, चिकणमाती सहन करत नाहीत.
ऑलिव्ह हे एक फळ आहे. ते खाता येतं. त्यामध्ये एक बीज असतं. फळं फुलापासून येतात. त्याला मसालेदार चव असते. लोक त्याला भाजी म्हणून संबोधतात.
एक लिटर ऑलिव्ह ऑइल तयार करण्यासाठी ४ ते ५ किलो ऑलिव्ह फळांची आवश्यकता असते. ऑलिव्हचं झाड ५ ते १० वर्षांच्या दरम्यान उत्पादनाला सुरुवात करतं आणि १०० वर्षांचं झाल्यानंतर त्याचं उत्पादन कमी होऊ लागतं.
ऑलिव्ह ५०० ते ५०० मिमी दरम्यान वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात चांगलं वाढतं आणि विकसित होतं आणि चांगलं उत्पादन देतं. जास्त आर्द्रता, बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा हल्ला त्याला सहन होत नाही. म्हणून समुद्राजवळ लागवड याची लागवड केली जात नाही.