साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे यानि संपूर्ण आयुष्य येथील भांडवलवादी सामंतशाही विरूध्द संघर्ष करून जनजागृतीची मशाल प्रज्वलीत करून लोकांची मने व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्यास तयार केले.भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य म्हणून कार्य केले.त्याच्या कथा कादंबरीत ग्रामीण भागातील जीवन चित्रीत केले गेले.त्याचे नायक हे विषय व्यवस्था विरूद्ध संघर्ष करताना दिसतात.जातीयतेचे रूप उघड करून समतेच्या दिशेने वाटचाल करतांना दिसतात.
पोवाडा लावणीच्या माध्यमातून क्रांतीकारक वातावरण तयार करीत असत साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे.
शाहिर अमर शेख सोबत महाराष्ट्र राज्य निर्मितीस फार मोठे योगदान दिले.परतु येथील व्यवस्थेने उपेक्षित ठेवले.
ज्या प्रमाणात ब्राम्हण साहित्यीक यांचा उदोउदो केला जातो.तशा अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख केला जात नाही.त्याना जातीच्या बंधनात अडकवून मातंग समाजाच्या पूरता मर्यादीत केले आहे.यथील जातीय व्यवस्था जातीय कक्षा बाहेर जाऊ देत नाही.
अण्णाभाऊ साठे जिवनाच्या अंतिम पहाडावर परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी सोबत नाते जोडण्याचा प्रयत्न केला.परतु त्यांच्या निधनानंतर मातंग समाजातच मर्यादित केले गेले.आज गरज आहे अण्णाभाऊना माणनारा समाज आंबेडकर अनुयायी नी सोबत येऊन एकदिलाने संघटित होऊन जातीयवादी व्यवस्थेला उखडून फेकण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही.सख्याबळानी विचार केला तर हा समुह व्यवस्थेला घाम सोडल्याशिवाय राहणार नाही.आबेडकरवाद समझून त्यावर आचरण करून एकजुटीने संघर्ष करून समतावादी लोकांची चळवळ मजबूत करावी .हीच अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिवस साजरा करून अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली ठरेल.
विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६