त्याने परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले पन्नास हजार रुपये
त्याने परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले पन्नास हजार रुपये
दिवसेंदिवस वाढत जाणारी बेरोजगारी आणि शासनाने स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आखलेले भरमसाठ शुल्क यामुळे आपणास नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राहुत यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पन्नास हजार रुपये द्यावेत अशी मागणी एका तरुणाने केली आहे.
हदगाव तालुक्यातील लक्ष्मण वाठोरे असे या युवकाचे नाव असून मूळचा पाथरड येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्यांचा मुलगा आहे.तो स्पर्धा परिक्षेची तयारी नांदेड शहरात करत आहे. जिल्हा परिषद मार्फत सरळसेवा पदभरती निघाली पण फॉर्म भरण्यासाठी मागासवग्रीयाकडून 900 रुपये शुल्क घेतले जात आहे. मी मागासवर्गीय प्रवर्गातील विदयार्थी असूम तलाठी भरतीसाठी सुध्दा 900 रुपये एवढे शुल्क भरले शुक्क आहे, माझ्या तालुक्यात ओला दुष्काळ पडला असून माझ्या वडिलांच्या शेतीचे नुकसा आले असून माझं कुटुव आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि मला सरकारद्वारे भारत सरकार शिष्यवृती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार रक्कमही मिळाली नाही त्यामुळे आर्थिक अडचणीचा विचार करून एक जिव्हाळ्याचे माय बाप म्हणून परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी जिल्हा आपती व्यवस्थापनामधून 50,000/- रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सदरील युवकाने जिल्हाधिकारी अभिजित राहुत यांच्याकडे केली आहे .सोबत त्याने आधार कार्ड
बँकेचे पासबुक,उपदवी प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जोडल्याने या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.