विकृत किड्यांची पैदास

विकृत किड्यांची पैदास
महाराष्ट्राचे राजकारण समाजकारण एवढ्या नीच पातळीवर जाण्याचे काम म्हणजे प्रतिगामी विचारांचे सत्तेत येणे होय. ज्यांच्या डोक्यातच विषमतेची घाण असल्याने काम करताना संविधानिक नैतिकता सोडून असंविधानिक काम करून जनतेची प्रतारणा करत असतात .स्वतःला संस्कृतीचे वारसदार म्हणणारे सारे असांस्कृतिक वातावरण तयार करत आहेत.ही कृती महाराष्ट्राच्या पुरोगामी पायावरच वार करण्याचा हा प्रयत्न आहे. जर महाराष्ट्राने हाणून डाव पाडला नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्या नक्कीच बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत .
धर्मश्रेष्ठ बाकी कनिष्ठ, आपला माणूस श्रेष्ठ दुसरा माणूस कनिष्ठ या विश्वात मशगुल असणाऱ्या महाराष्ट्रातील बांधवांनो आपण आपली अस्मिता गमावत चाललो आहोत. समाजकारण, राजकारण,
शिक्षणकारण ,परिवर्तन, विज्ञानवाद, स्त्री सक्षमीकरण अशा विविध कार्याने जगाला नवा विचार देणारा महाराष्ट्र आज किड्यांच्या नावाने फिरणाऱ्या कुत्र्यांनी भ्रष्ट केलेला आहे. अकलेचे तारे तोडणारे नाकाने कांदे सोलत आहेत. या महाशयाला स्वतःच्या बुद्धीवर खूप गर्व वाटतो. फाउंडेशन निर्माण करून महाराष्ट्रातील तरुणांना वस करतो आणि खोट्या विचारांचे रोपण तरुणांमध्ये करतो .अशा फाउंडेशनला आपले मुले पाठवणारी व त्या फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी अंधभक्तीचा चष्मा डोळ्यावर लावलेला आहे असे वाटते. त्यांना सत्य समजत नाही. कारण राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी “सत्य सर्वांचे आदिघर। सर्व धर्माचे माहेर” असे म्हटले आहे .
ज्या महामानवाने महाराष्ट्रालाच नाही तर या देशाला नव्या शिक्षणाची ओळख करून दिली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि एक नवा भारत घडवला. अशा महामानवावर विकृत किड्यांनी ज्या पद्धतीमध्ये आपली भंडास काढली ती अत्यंत निंदनीय आहे. अशा विकृत किड्यांना आज आपण ठेचल्याशिवाय राहू नये.राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या समाजउद्धाराच्या कार्यावर ज्या पद्धतीने अभद्र टिपणी करून कलंकित केले आहे. ही विचारसरणी अत्यंत किळसवाणी व महाराष्ट्राच्या प्रगतीपथात बांधा आणणारी आहे.
ज्या महात्मा फुलेंना ते ब्रिटिशांचे हस्तक म्हणतात हे अत्यंत निंदनीय आहे. महात्मा फुले यांनी पाहिल की ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे भारतात शिक्षणाची नवीन प्रवाह निर्माण केला. त्या प्रवाहामुळे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले कार्यक्षेत्र वाढवले . त्यांना देशातील असमान विकृत ग्रंथाची ओळख झाली . त्यांनी समाज व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या हरामखोरांना जमीनदोस्त करण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली . आज किड्यांच्या भोवती फिरणारे यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची ओळख करून घ्यावी. राजकारणाच्या कपटी स्वार्थासाठी अशा किड्यांची निर्मिती करणाऱ्या येथील राजसत्तेचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. त्याचा करवता धनी कोण आणि बोलवता ध्वनी कोण हे पडद्यामागे असले तरी महाराष्ट्रा ते समजून आहे.
ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांना आपला गुरु मांनला त्या महामानवाची विद्वत्ता किती श्रेष्ठ असेल हे आपण समजून घ्यायला हवी. किड्यांची बुद्धी भ्रष्ट आहे.किती नपुसक आहे .हे आपण जाणून घ्यायला हवे . महात्मा जोतीराव फुलेंनी जे काम केले ते काम एकाही किड्यांच्या औलादाना करता आले नाही. शेणातील वळवळणारे किडे जसे शेणातच असतात तसेच आजचे हे किडे महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात वळवळत आहेत .समानता, भाईचारा, प्रेम सगळ्या गोष्टी सोडून महाराष्ट्रातील जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत .हे किडे म्हणजे महाराष्ट्रावरील कलंक आहे. अशा प्रतिष्ठानावर बंदी घालून त्या अटक करावी. नाहीतर महाराष्ट्रातील समानतेचे वातावरण असमानतेत बदलण्यास वेळ लागणार नाही .मग महाराष्ट्रातील सरकारच्या हातातही काही राहणार नाही. महाराष्ट्र पेटला तर उभा भारत भेटू शकतो. शेवटी महाराष्ट्र ही क्रांतिभूमी आहे. असे कितीही किडे आले तरी महाराष्ट्र तुटणार नाही .राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची महती कमी होणार नाही. कारण शिक्षणाचा क्रांतीसुर्य कधीच बुडत नाही. कींड्याची पैदास भस्म करण्यासाठी आता महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी धर्म जात सोडून किड्यांच्या घाणयुक्त मेंदूची शस्त्रक्रिया करावी .तेव्हाच त्यांची मती ठेचल्या जाईल .महाराष्ट्रात विकृत किड्यांची पैदास होणार नाही. याची सर्व काळजी महाराष्ट्रातील बांधवांनी घ्यावी अशी आशा आहे.
संदीप गायकवाड नागपूर
९६३७३५७४००