आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते दृष्टीक्षेप लेख संग्रहाचे प्रकाशन; विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती
आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते दृष्टीक्षेप लेख संग्रहाचे प्रकाशन,
*विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती..*
मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावचे सुपुत्र, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विश्लेषक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे चिंचवलकर यांच्या दृष्टीक्षेप लेख संग्रहाचा प्रकाशन सोहळा १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सायं. ७:०० वाजता, रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. मिलिंद चिंचवलकर लेख संग्रह प्रकाशन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजू झनके, अध्यक्षस्थान संजय बोपेगावकर तर, सुत्रसंचालन सिध्दार्थ साळवी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या दृष्टीक्षेप लेख संग्रह प्रकाशन सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, माजी पोलिस अधिकारी ॲड. विश्वास काश्यप, सुप्रसिद्ध कवी संजय गायकवाड, उद्योजक संजयकुमार सुर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी प्रविणा लुनावरा, डॉ. शैलेश पाटील, साहित्यिक राजेश सावंत, बी. एस. जाधव, रिपब्लिकन सेनेचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष भगवान साळवी, पालघर जिल्हाध्यक्ष लवेश लोखंडे, सिंपन प्रतिष्ठानचे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, समाजभूषण उत्तमराव गायकवाड, भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अमोलकुमार बोधीराज, भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग मा. जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्देकर, बौध्दजन पंचायत समितीचे सुरेश मंचेकर, म्युनि. बँकेचे व्यवस्थापक अरुण जाधव व बाळकृष्ण कांबळे, मा. संचालक बी. पी. साळिस्तेकर, सामाजिक कार्यकर्ते भगवान कांबळे, पांडुरंग उंडिलकर, अरविंद जाधव, रविंद्र साळिस्तेकर, सुप्रसिद्ध गायक प्रकाश आजविलकर, युवा नेतृत्व प्रमोद नाईक, बामसेफचे प्रकाश डोंगरे, २२ प्रतिज्ञा अभियानाचे विनोद पवार, कल्पना साळवी, रुपाली दोंदे, अजेश पवार, मोहन बागडी, अभिषेक कदम, संजय वाघमारे, संतोष कांबळे, सुरेश पगारे, साहेबराव धिवार, विश्वास धादवड, सुनील साळिस्तेकर, संजय जाधव, अमोल गायकवाड, विजय कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.