महाराष्ट्राचा होतोय ऊडता पंजाब
**महाराष्ट्राचा होतोय ऊडता पंजाब**
सध्या मुंबई व महाराष्ट्रातील व्यसनाधीनता इतक्या प्रमाण वाढले आहे की दहा ते बारा वर्षापासून 50 ते 60 वर्षापर्यंतचा वृद्धापर्यंत सर्वजण नशा करायला लागले आहेत.
आजचा किस्सा सांगतो मी सायंकाळी 5 वाजता ऑफिसचे काम निपटून कांदिवली स्टेशनवरून घरी निघालो असता 19 वर्षाचा एक मुलगा अतिशय मद्य धुंद अवस्थेमध्ये रस्त्यात पडलेला आढळला .मी त्याची चौकशी केली असता मला असे कळले की तो सकाळी कॉलेजला गेला परंतु येताना तो एवढी दारू पिला की त्याच्यासोबत असणार एक मुलगा जो गाडी चालवत होता हा पाठीमागे बसला असताना हा गाडी वरून खाली पडला .मी त्वरित बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन पाण्याची बॉटल घेऊन आलो त्याच्या तोंडावर पाणी मारले त्याला उठवले त्याला पाणी पाजले व त्यांच्या घरच्यांना फोन केला व त्याला त्याच्या घरी पोहोचवले.
सध्या मुंबईसारख्या शहरांमध्ये दहा ते बारा वर्षाची मुलं सुद्धा वाईटनरचि नशा ,बटन , गांजाची नशा ,सिगरेट पिणे असे वेगवेगळे व्यसन करत आहेत यामुळे पूर्ती पिढी बरबाद होत आहे.
अशातच व्यसन करायला जर पैसे नसले तर घरामध्ये चोरी कर शेजारी चोरी कर परिसरामध्ये चोरी कर असे प्रकार दिवसेंदिवस वाढायला लागले आहेत. यातच जास्त नशेच्या आहारी गेल्यामुळे बऱ्याचशा तरुण मुलांचे जीव सुद्धा जायला लागले आहेत.
यामुळेच वाटायला लागले की महाराष्ट्राचा उडता पंजाब होतोय की काय?
**शोध पत्रकारिता बादशहा लोकनायक संजय बोर्डे८६५२२७४५८०**