नोंदणी दिनांकापासुन बार्टिच्या 2022 च्या 719 संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या
नोंदणी दिनांकापासुन बार्टिच्या 2022 च्या 719 संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या
पुणे येथे 79 दिवसापासुन चालु आसलेले उपोषण व मुंबई आझाद मैदानावरील बेमुदत धरणे आंदोलनाद्वारे संशोधक विद्यार्थ्यांची सामुहीक नागपुर आधिवेशनावर आत्मदहण करण्याची घोषणा.
अनुसूचित जातीच्या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचा पीएच.डी. साठी प्रवेश होऊन आज 21 महिने झाले असून, अनुसूचित जातीच्या बार्टीकडे अर्ज केलेल्या पिएचडीच्या 2022 च्या 719 विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासुन सरकसट फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी मागील 21 महीण्यापासुन विद्यार्थी संघर्ष करत असुन बार्टी कार्यालय पुणे येथे गेल्या 79 दिवसापासुन 2022 चे पिएचडीचे संशोधक विद्यार्थी नोंदणी दिनांकापासुन सरसकट फेलोशिपच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषण करत आहेत व याच न्याईक मागणीसाठी मुंबई,नागपुर व पुणे या ठिकाणी मोर्चे,आंदोलने,उपोषणे करुणही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आसताना बार्टी प्रशासन हे कसल्याच प्रकारे विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भुमिका घेत नाहीत व वांरवार मागणी करुण शिंदे फडणवीस सरकार विद्यार्थ्यांना न्याय देत नाही तर दुसऱ्या बाजुला सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दि. 21.09.2022 च्या पत्रानुसार 851 मुलांना सरसकट फेलोशिप मंजूर होऊन त्यांच्या खात्यात रक्कम ही जमा केली जाते व 2023 ची जाहीरात ही सारथी संस्थेच्या पी.एच.डी. धारकांसाठी दिली जाते. तर महाज्योती या फेलोशिप देणाऱ्या संस्थेकडे पाहिले असता ती संस्था पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना 2022 मध्ये दि. 02.11.2022 च्या पत्रानुसार 1226 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करून त्या फेलोशिपची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते व 2023 ची जाहीरात दिली जाते. सारथी व महाज्योती संस्था विद्यार्थ्यांचा पिएचडीला प्रवेश झाल्यावर जवळपास तिन महीण्यात प्रक्रिया पुर्ण करुण सरसकट 2022 च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देते तर अनुसूचित जातीच्या 2022 च्या पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना फेलोशिप देणारी बार्टी ही संस्था पीएच.डी. धारकांचा प्रवेश होऊन 21 महिने झाले असले तरीही व गेल्या 79 दिवसापासुन उपोषण चालु असतानाही या महाराष्ट्रात बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकार अद्यापही घेत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे व सरकार जात बगुन विद्यार्थ्यांना न्याय देणार का आसा संतप्त प्रश्न पडला आहे ? पिएचडीला प्रवेश होऊन 21महीने झाले असता विद्यार्थ्यांच्या खात्यात बार्टीकडून फेलोशिपची अद्याप दमडीही जमा करण्यात आली नाही तर व हे विद्यार्थी कामगार,अल्पभूधारक शेतकरी,कष्टकरी कुंटुबातील विद्यार्थी असल्याने संशोधन कसे करणार ? या शैक्षणिक व आर्थिक अन्याया विरोधात आणि बार्टीकडे अर्ज केलेल्या पीएच.डी. च्या 2022 च्या 719 संशोधक विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन दिनांकापासून वाढीव तरतुदीसह कागदपत्र पडताळणी करून तात्काळ सरसकट अवार्ड लेटर देऊन एका महिन्याच्या आत फेलोशिप सरसकट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी .
या मागणीसाठी विद्यार्थी पुणे व मुंबई आझाद मैदान येथे
येथल्या गेंड्याची कातडी घेऊन झोपेच सोंग घेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार व बार्टी प्रशासन यांना जाग करण्यासाठी अनुसूचीत जाती संशोधक विद्यार्थी अधिकार बचावासाठी बार्टी कार्यालय पुणे येथे चालू आसलेल्या 79 दिवसाच्या उपोषणात्मक आंदोलनातुन व मुंबई आझाद मैदानावरील बेमुदत धरणे आंदोलनातुन बार्टीच्या 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांनी केली नागपुर आधिवेशनावर सामुहिक आत्मदहण करण्याची घोषणा यावेळी बार्टीचे 2022 चे संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते.