साहित्य
कांबळे कांबळे कांबळे सगळेच नसतात पोचीराम कांबळे

कांबळे कांबळे कांबळे
सगळेच नसतात
पोचीराम कांबळे
काही मार खातात कांबळे
पण इमान विकत नाहीत कांबळे
काही जन्मतःच मनक्यात हाड
नसलेले जन्मतात कांबळे
जोहार करत जीवन कंठतात नेभळे
कांबळे कांबळे कांबळे
चळवळी साठी जीव देतात काही कांबळे
जयभीम साठी वेडे होतात काही कांबळे
मैलाचा दगड बनतात काही कांबळे
कांबळे कांबळे म्हटलं की
जयभीम का विचारतात सगळे
गव्हात असतात चार दोन खडे
बावळ्यांना काय माहित
सगळेच नसतात जयभिम कांबळे
लढला चळवळीत पोचीराम कांबळे
नामांतर लढ्यात नावं जोडून गेला कांबळे
जोवर असेल विद्यापीठ आणि ऐतिहासिक
नामांतर चळवळ
तोवर शीर्ष स्थानी असेल तोच तो
पोचीराम कांबळे
#राजू_वाघमारे
२०/०१/२०२४