नांदेड: पिवळं सोनं म्हणून ज्या कापसाला ओळखलं जातं त्या सोन्याला आज कवडीमोल दर मिळत असल्याने ऐन मकर संक्रांतीनंतर तरी कापसाला योग्य तो दर येईल काय अशी असा शेतकऱ्यांत लागली आहे.
आज कापसाला साधारण ६६०० ते ६९०० रुपये क्विंटल असा दर आहे.पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन घेत असताना येणाऱ्या दराच्या तुलनेत अतिशय कमी असून या दराच्या आधारावर जर मोबदला मिळत गेला तर कापसावर झालेला खर्चही निघू शकत नाही.त्यामुळे कापूस दरवाडीची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांना आता मकर संक्रांतीनंतर तरी भाव वाढले काय अशी आस लागली आहे.