ही होती संविधान निर्मिती प्रोसेस..
संविधान निर्मिती प्रोसेस
✍️ #उमेश गजभिये.
प्रजासत्ताक दिनी साजरा करताना. त्याची माहिती करणे अत्यंत आवश्यक आहे.
“दुसरे महायुद्ध 1945 मध्ये संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य मिळाले. इंग्रजांनी सत्तेचे हस्तांतर शांततेने होण्याच्या दृष्टीने एक त्रिसदस्यिय समितीला भारतात पाठवले. या समितीला ‘मंत्रिमंडळ समिती’ म्हणून संबोधले गेले. या समितीने 16 मार्च 1946 ला आपला प्रस्ताव जाहीर केला. त्यांनी असे सुचवले की, भारताच्या भावी शासनासाठी एक ‘नवीन संविधान तयार करावे लागेल’. त्याकरता एका ‘संविधान सभेची’ स्थापना करण्यात यावी. या त्रिसदस्य मंत्रिमंडळ समिती च्या शिफारसीनुसार भारतात संविधान सभा स्थापन करण्यासाठी प्रांतीय विधिमंडळाकडून निवडणुकाद्वारे सदस्य निवडण्यात आले. त्यावेळी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना काँग्रेसच्या विरोधामुळे मुंबई प्रांतिक विधिमंडळातर्फे संविधान सभेवर निवडून जाणे शक्य नसल्याने त्यांनी जोगेंद्रनाथ मंडळ आणि त्यांचे अनुसूचित जातीतील सहकारी सभासदांच्या पाठिंब्याने बंगालच्या विधिमंडळामार्फत संविधान सभेमध्ये स्वतःचा प्रवेश करण्याचा मार्ग सुकर करून घेतला.*1”
“संविधान सभेने स्वतंत्र भारताचे संविधान बनविण्याचे काम 9 डिसेंबर 1946 ला सुरू केले. प्रथम बैठकीत 296 सदस्य भाग घेऊ शकले असते. परंतु केवळ 207 सदस्य पहिल्या बैठकीला उपस्थित होते. गैरहजर असणाऱ्या सभासदांमध्ये संविधान सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेल्या मुस्लिम लीगचे बहुतेक सभासद होते. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्ली येथे संविधान सभागृहात पाच डिसेंबर 1946 ला सोमवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाली. बर्तिय संविधान निर्मिती बद्दल जी संविधान सभेत जी परिचर्च झाली. या परिचर्चेचा समरोप 16 सप्टेंबर 1949 ला झाला. व 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान भारतासाठी व भारतीय जनतेकरीता लागू झाला.*2”
जेंव्हा संविधान सभा निर्मिती झाली तेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता. संविधान निर्मिती करिता सदस्यांची परिचर्चा संविधान सभेत सुरू असताना 15 ऑगस्ट, 1947 ला भारत स्वतंत्र झाला. “संविधान सभेने 10 डिसेंबर, 1946 ला संविधान सभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकी संबंधी नियम संमत केले. त्यानुसार संविधान सभेने 11 डिसेंबर, 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून स्थायी निवड केली. 13 डिसेंबर, 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या ध्येय आणि उद्देशासंबंधी एक प्रस्ताव मांडला.” *3.(संदर्भ: *1,*2, *3.
Dr. Babasaheb Ambedkar writing and speeches, volume 13, Dr.Ambedkar the principal architect of the constitution of India. पेज नंबर 5,6)
“भारताच्या संविधानाचा प्रारूप अभ्यास करण्यासाठी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवण्यासाठी एक प्रारूप संविधान परिनिरीक्षण समिती सुचविण्यात आली. त्यातील सात सदस्य होते. श्री.अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, श्री. एन. गोपाल स्वामी अय्यंगार सन्माननीय डॉक्टर बी.आर. आंबेडकर, श्री. के. एम. मुंशी, सैयद मोहम्मद सादुल्ला, श्री.बी.एल. मित्तल व श्री. डी.पी.खेतान. ‘संविधान सभा कामकाज समितीचा अहवाल’, यावर संविधान सभेत परिचर्चामध्ये सन्माननीय डॉक्टर बी. आर. आंबेडकर हे 29 ऑगस्ट, 1947 ला म्हणतात, ’20 ऑगस्ट, 1947 ला नियुक्त केलेल्या समितीने भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 च्या अंतर्गत संविधान सभेच्या कामकाजासंबंधी जो अहवाल सादर केलेला आहे त्यावर विचारविनिमय करण्यासाठी सभागृहाने पुढाकार घ्यावा असा प्रस्ताव मी सादर करू इच्छितो.”*1. पेज नंबर 29.
“सविधान मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट, 1947 ला झाली आणि त्यात सर्वांनुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ही मसुद्या समिती 27 ऑक्टोंबर, 1947 पासून संविधान सल्लागाराच्या कार्यालयाने तयार केलेल्या अनुच्छेदाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि मसुद्याची पुनर्मांडणी होणार करण्यासाठी नियमितपणे बैठका घेत होती. समितीने 13 फेब्रुवारी, 1948 पर्यंत एकूण 44 दिवस बैठका घेतल्या त्यामध्ये स्वतः डॉक्टर आंबेडकर यांनी कामकाज चालविले. मसुदा समितीने ठरविल्या प्रमाणे संविधानाचा नवीन मसुदा 21 फेब्रुवारी, 1948 ला अध्यक्षांना सादर करण्यात आला. मसुदा समिती सातत्याने कामकाज करीत होती आणि दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या सूचनाचा विचार करीत होती. संविधानाचा मसुदा जनतेसमोर आठ महिने होता आणि 4 नोव्हेंबर, 1948 ला संविधान सभेसमोर चर्चेसाठी ठेवण्यात आला.”*1.पेज नंबर 44.
“चार नोव्हेंबर, 1948 ला भारतीय संविधानसभे समोर संविधानाचा मसुदा सादर करण्यात आला. नंतर त्यावर थोडक्यात चर्चा झाली. त्यास संविधानाचे पहिले वाचन असे म्हटले जाते. दुसरे वाचन 15 नोव्हेंबर, 1948 ला सुरू झाले. दुसऱ्या वाचनाचे वेळी संविधानाच्या प्रत्येक खंडावर सविस्तर चर्चा झाली. 17 ऑक्टोंबर 1949 ला चर्चा संपली. 14 नोव्हेंबर 1949 ला तिसऱ्या वाचनासाठी संविधान सभेची बैठक भरली. 26 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा संविधान संमत झाल्याचे जाहीर करण्यात आले आणि त्यानंतर सभेच्या अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी केली.”*1 संदर्भ पेज नंबर 47,48.
त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान भारतात लागू झाला.
दिनांक : 26/01/2026.
✍️ उमेश गजभिये.