आजही राज्यसरकार पुरस्कृत अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक जातीवाद केला जातो -किरण फुगारे
पिएचडीच्या सारथीच्या 2022 च्या 851 विद्यार्थ्यांना व महाज्योतीच्या 2022 च्या 1226 विद्यार्थ्यांना विना परिक्षा सरसकट फेलोशिप देऊन वर्ष झाल पण बार्टीच्या 2022 च्या 761 पाञ विद्यार्थी गेल्या 22 महीण्यापासुन वारंवार मुंबई ,पुणे व नागपुर सारख्या ठिकाणी आंदोलने करुण सरसकट फेलोशिपची मागणी करत आसताना आजही
अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांना तब्बल 2 वर्ष होऊनही फेलोशिपपासुन वंचित ठेवण्याचा प्रयत्न बार्टी महासंचालक सुनील वारे व मंञालयीन सचिव सुमंत भांगे यांच्या माध्यमातून मुंख्यमंञी एकनाथ शिंदे , उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व आजीतदादा पवार सरकारच्या काळत अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांचे नियमाच्या नावाखाली शैक्षणिक अयुष्य उध्वस्त करताना दिसुन येत आहे.व अनुसूचीत जाती आयोग याकडे मुग गिळून शांत बसुन बग्याची भुमिका घेत आसताना दिसुन येत आहे.आजही आमचे प्रश्न पटलावर मांडताना बोटावर मोजण्याईतके आमदाराशिवाय कोणी मांडून न्याय देण्याची भुमिका घेत नाही.आजही आमच शैक्षणिक आरक्षण उध्वस्त करताना हे राज्यसरकार दिसुन येत आहे.विद्यार्थ्यांची फेलोशिप,स्वधार व शिष्यवर्तीची रक्कम आजही जाणिवपुर्वक वेळेवर दिली जात नाही व देण बंद करण्याचे प्रयत्न राज्यसरकार मार्फत होताना दिसुन येत आहेत.आजही आमच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी समाजाच्या विकासासाठी खर्च न करता अखर्चीत म्हणून ईतञ वळवण्याचा प्रकार केला जातो.
आजही आम्ही शैक्षणिक मागास राहाव व आम्हचा विकास नाही झाला पाहीजे या द्रष्टीने राज्यसरकार कुटनीती करतानाच्या भुमिकत आम्ही पाहातो.आजही आमच्या विद्यार्थ्यांचा छळ केला जातो म्हणून आजही अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसोबत राज्यसरकार पुरस्कृत शैक्षणिक जातीवाद संपलेला नाही..
-किरण फुगारे
संशोधक विद्यार्थी, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड