ऍड.प्रकाश आंबेडकर,महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा
ऍड.प्रकाश आंबेडकर,महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा
देशात एक प्रकारे चालू असलेली हुकूमशाही राजवटीचे सरकार आणि या विरोधात असणारे विविध बहुसंख्य पक्षाची एकजूट हा डाव कितपत यशस्वी होईल हे ठणकावून सांगता येणार नाही पण;जर का हा डाव साधला गेला तर मात्र देशाच्या राजकीय क्षेत्रात मात्र कमालीचे बदल घडवून येतील.
गत 2014 पासून सत्तेत विराजमान असलेले भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येते की,काय या घोर निराशेत असणाऱ्या सर्वसामान्य जनतेपुढे एक मोठा प्रश्न उपस्थित होताना दिसून येतो. याच संदर्भात देशातील इंडिया आघाडी ही सत्ताधाऱ्यांना उधळून लावण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे तर याच विरोधात भाजप आणि भाजप प्रणित संघ परिवारही कमालीची ताकत लावताना दिसून येते.नुकतेच अयोध्येत झालेले राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापना याबाबी धार्मिक असल्यातरी राजकीय हेतुने या जमेच्या बाजू ठरतात. ठरतात. देशातील असणाच्या वेगवेगळ्या चित्रापेक्षा महाराष्ट्राचे चित्र अधिक महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या नंतर दोन ठाकरे गट पडले त्यांनतर अजित पवार गट असे गटातटाचे राजकारण महाराष्ट्रात राजरोस सुरू असले तरी संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात ऍड.प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही निवडणुकीत कमी लेखून चालणार नाही असा इतिहास सांगतो.कारण प्रकाश आंबेडकर हे बहुजनांचे,वंचितांचे अशे नेतृत्व आहे.ज्यांच्या केंद्रित देशासह राज्यातील सामाजिक,राजकीय धार्मिक आणि वैचारिक चळवळीत उलथापालथ होते.कमी अधिक सत्तेत सत्तेत असलेली भागेदारी ही बाब सोडली तर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आणि सत्तेतून पाय -उतार होण्यासही प्रकाश आंबेडकर परिणामकारक ठरतात.माघील निवडणुकीच्या काळात जागा वाटपाबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला जागा वाटपाबाबत घेतलेला आखुडता हात यामुळे राज्यात त्रिशंकू सरकार स्थापन झाले होते.पण तेही पूर्णवेळ टिकले नाही. आजच्या परिस्थितीत काल झालेली महाविकास आघाडीची बैठक म्हणजे लक्षवेधक होती. याच अनुषंगाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले असतांना प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, सेना या पक्षातील महत्वाचे नेते यांच्यात झालेली चर्चा लोकांच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण राज्यात नुसत्या घोषणा आणि हुकूमशाहीचे सत्ताशासन चालू असताना बदलाची बदलाची अपेक्षा मात्र अवघ्या महाराष्ट्राला आहे हे मात्र तितकेच सत्य …