,त्याग, सेवा यांना जीवन समजनारे डाॅ. सिद्धार्थ कांबळे
कष्ट,त्याग, सेवा यांना जीवन समजनारे डाॅ. सिद्धार्थ कांबळे !
काही माणसांचा जीवन प्रवास नेहमीच प्रेरणादायी असतो. डॉ. सीध्दार्थ कांबळे यांच बालपन गरीबीशी संघर्ष करण्यात गेले. वडील जीवनजी मीलमजदूर अल्पशी मीळकत. कुंटुबाचा आवाका मोठा. अल्पशीक्षीत कुंटुब आजी राधाबाई मात्र कणखर तीच्यात नेतृत्व गुण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा. बाबासाहेबांनी राधीकाबाईच्या हातच्या भाकरी खाल्या होत्या. एम्प्रेसमील नागपूरातील महीला मजुरांच नेतृत्व राधाबाई करीत होत्या. तीची शीस्त कणखरपणा तसेच आईचा मायाळु स्वभाव कोणाचही दुःख पाहुन बुद्धाची करूणा नेहमी डॉ. सीध्दार्थ कांबळेंच्या डोळ्यात दिसते. व्हेटरनरी डॉक्टरची डीग्री घेतलेला हा माणूस वाहन इनशुनरन्स कंपनी त्याआधी शासकीय हुद्यावर राहुन ब्रुकबॉन्ड कंपनीकडून बाहेर देशात पाठवल्या जाणाऱ्या मांसाच परीक्षण ही महत्वाची जवाबदारी सांभाळायचा. डॉक्टर सीद्धार्थ नेहमी म्हणतात,” जे काम आपण करतो त्यात एकनीष्ठता असणे महत्वाच हयगय नाही. कारण आपल्या कंर्तव्यावर अनेकांच जीवन अवलंबुन आहे.”
डॉ. सीद्धार्थ कांबळे केव्हा कायदे तज्ञाच्या डीगऱ्या घेऊन कायदेतज्ञ झालेत हे कळलेच नाही. त्यांच्या काळ्या कोटाने अनेकांना न्याय मीळवुन दीला. हे सर्व लाभार्थी जेव्हा ऍड. सीद्धार्थ कांबळेच्या कार्य कतृत्वावर बोलतात मन भरून येत. डॉ. बाबासाहेबांनी काळाकोट दुःखीत वंचीतांना न्याय मीळावा म्हणून घातला याची पदोपदी जाणीव डॉ. सीध्दार्थ कांबळे कडे पाहुन होते.
मानवता हायस्कुल कुंजीलालपेठमध्ये ह्या व्यक्तीच शालेय शीक्षण झाल हे आज पटत नाही. इंग्रजी भाषेवरच त्यांच प्रभुत्व, त्यांच इंग्रजी ड्रापटींग वीरोधीपक्ष कोर्टात थरथर कापतात. अभ्यासु व्यक्तीत्व म्हणून त्यांचा सर्वच क्षेत्रात सन्मान आहे.
डाॅ. सीद्धार्थ कांबळे या माणसाने हीम्मतीने अनेकांना मदतीचा हाथ दीला. आता तर ह्या माणसाने वर्तमान पत्राच्या दुनीयेत झेप घेतली. सहकारी तत्ववावर “बहुजन सौरभ” नावाच वर्तमान पत्र काढल. जाहीरातीच पाठबळ नाही, वाचकांच्या हीम्मतीवर हे वर्तमान पत्र समाज प्रबोधन करेल हा आशावाद डाॅ. सीध्दार्थ कांबळेना आहे. प्रबंध संपादकाची नवीन जवाबदारी सक्षमतेने सांभाळत आहे.
त्यांच्या मित्रपरीवारात जात धर्माच्या भींती नाही. भारतीय संविधानाचा विचार आहे. त्यांनी एकदा मैत्री केली की ती जीवाभावाने ती जपतात. कटरता धर्माची असो की विचारांची ही मैत्रीच्यामध्ये कधीच येऊ नये. ते आपल व्यक्तीगत जीवनाचा भाव असतो.
डॉ. सीध्दार्थ कांबळेच जीवनच अनेकांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या काम करन्याच्या तडफदारपना त्यांच्या पासष्ठीला मागे टाकते. त्यांच जीवन सुख, समृध्दी आरोग्यदायी राहो ह्याच शुभेच्छा !
:ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा !