काबरानगर येथे व्याख्यानमालेचे चौथै पुष्प
काबरानगर येथे व्याख्यान मालेचे चौथै पुष्प
नांदेड दि.
श्रीकृष्ण मंदिर, काबरानगर येथील काबरानगर सांस्कृतिक मंडळ आयोजित व्याख्यानमालेचे चौथे पुष्प तीन मान्यवर महिला व्याख्यात्या मिळून गुंफणार आहेत. सदरची व्याख्यानमाला दि. २१ ते २३ मार्च पर्यंत चालणार आहे.
श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या, काबरानगर सांस्कृतिक मंडळातर्फे व्याख्यानाची मेजवानी गेल्या डिसेंबरपासून चालू झाली आहे, डिसेंबर मधे ह.भ.प.श्री विक्रम नांदेडकर यांचे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. २८ ते ३० रोजी ‘महाभारत एक चिरंतन दीपस्तंभ’ या विषयावर गुंफले होते. याच श्रृंखलेत दुसरे चार दिवसीय व्याख्यानमालेचे पुष्प तीन मान्यवर व्याख्यात्यांनी २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी गुंफले होते. त्यात हभप श्री अविनाश गोहाड, परभणी, श्री गोविंद पुराणिक, नांदेड आणि डॉ संजीवनी देशमुख-नेरकर, नांदेड या मान्यवरांनी ‘श्री राम’ या विषयावर व्याख्याने दिली होती. या श्रृंखलेचे तिसरे पुष्प १८ ते २० फेब्रुवारी २०२४ रोजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्याला समर्पित होते, यात डॉ कार्लेकर, डॉ मान्नीकर आणि डॉ सोलापूरकर यांनी व्याख्यान देऊन सहकार्य केले. आता याच साखळीतले चौथे पुष्प काबरा नगरातील मान्यवर महिला मिळून गुंफणार आहेत. यात प्रथम दिनांक २१ मार्च २०२४ रोजी सौ सुहासिनी सुरेश पांडे या ‘भारतीय संस्कृती आणि महिला’ या विषयावर बोलणार आहेत. दुसरे दिवशी म्हणजे दि. २२ मार्च रोजी डॉ सौ भाग्यश्री आनंद चिमकोडकर या ‘ संत स्त्रियाः एक चिंतन’ या विषयावर बोलणार आहेत. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. २३ मार्च रोजी डॉ मेधा रणजित धर्मापुरीकर’ या महिष्मती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ‘ या विषयावर बोलणार आहेत. ही सर्व व्याख्याने रोज श्रीकृष्ण मंदिर परिसरात, सायंकाळी सात च्या श्रीकृष्णाच्या आरती नंतर लगेचच सुरू होतील. नांदेड व परिसरातील सर्व भाविकांना विश्वस्थां तर्फे विनंती वजा आवाहन करण्यात येते की या मान्यवर व्याख्यात्यांच्या अमोघ वाणीचा लाभ घ्यावा.