भारतात एकूण १२०० लेणी आहेत त्यापैकी ९०० बुद्धिस्ट, २०० हिंदू व १०० जैन.. वाचा सविस्तर..
भारतामध्ये बौद्ध धर्माची गौरवशाली वाढ महान सम्राट अशोक याच्या काळात म्हणजे (इ.स. पूर्व २७३-२३२) मध्ये झाली. बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर खऱ्या अधनि संपूर्ण भारताता व भारत देशाबाहेरसुद्धा बौद्ध धम्माचा प्रसार-प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. अभिलेखामध्ये सम्राट अशोकाचा उल्लेख देवानपिये पियदशी व श्रीलंकेतील बुद्ध साहित्यामधील ‘दिपबंश व महावंश’ या ग्रंथात येतो. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर सर्वप्रथम महाबोधी मंदिराची म्हणजे बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या ठिकाणाला भेट दिली. बुद्धाशी संबंधीत स्थळाना भेटी दिल्या. अनेक बुद्ध स्मारकांचा जिर्णोद्धार केला. बौद्ध स्तूपाची डागडुजी केली. स्तूपाच्या अंडाकृती भागाला दगडाचे आवरण घातले. बौद्ध स्तंभ उभाराले. ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो. सम्राट अशोकानी बांधलेले सर्वात जास्त स्तूप भारत देशात आहेत. असे म्हटले जाते, अशोकाने भन्ते मोगलीपुत्त तिस्स यांना विचारले की, बुद्धाने सांगितलेला धम्म किती महान आहे? त्यावर मोगलीपुत्त तिस्स म्हणाले की, ‘धम्मामध्ये एकूण ८४,००० विभाग आहेत. त्यावर सम्राट अशोक म्हणाला की, ‘मी त्या प्रत्येक भागाच्या संदर्भाला अनुसरण ८४,००० स्तुपाची निर्मिती करेल’.
सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रचार पसार मोठ्या प्रमाणात झाला. दोन विशेष धम्मप्रसाराच्या मोहिमांमध्ये महाराष्ट्र क्षेत्रात बौद्ध धर्माचा पाया भक्कम करण्यात आला. अशोकाच्या साम्राजात एक अपराता (दक्षिण कोकण) आणि इतर महाराष्ट्र हे दोन्ही प्रदेश अशोकाच्या अधिपत्याखाली होते. अशोकाच्या काळातच महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्ध स्तूपांची नव्याने डागडुजी करुन त्याचा आकार मोठा करण्यात आला.
महाराष्ट्रातील बौद्ध लेणी स्मारकाच्या दृष्टीकोणातून भूमिका मांडताना सागता येईल की, महाराष्ट्राचे बौद्ध स्मारकाच्या दृष्टीने अनन्य महत्त्व आहे. भारतात एकूण १२०० लेणी आहेत. त्यामध्ये ९०० बुद्धिस्ट, २०० हिंदू व १०० जैन आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की, भारतात बौद्ध धर्म प्रमुख होता. महान प्रवासी भिक्षु द्युन संग आपल्या प्रवासवर्णनात महाराष्ट्रातील दोन स्थळाचा उल्लेख आहे. त्यामध्ये कुंग-कुन-नपुलो (कोकण) आणि मोहालोचा (महाराष्ट्र) ह्युन संग असे म्हणतो की, महाराष्ट्रामध्ये जवळपास १०० विहारे आहेत. त्यामध्ये एकूण १०,००० भिक्षुना राहण्याची व्यवस्था होती. भिक्षु थेरवाद व महायान बुद्ध परंपरेशी संबंधित होते. याखेरीज अशोकाने बनवलेले स्तूप, १०० विहारे, ज्यामध्ये ५,००० बौद्ध भिक्षंना राहण्यासाठी निर्माण केले होते. महाराष्ट्रात अशोकाचे दोन शिलालेख सापडलेले आहेत. पहिला सोपारा (ठाणे जिल्हा) व दुसरा देवटेके (चंद्रपुर जिल्हा) येथे.
अशोकाच्या काळानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी, स्तूप, विहार, चैत्यगृह, इत्यादींची निर्मिती झाली. त्यामध्ये पुणे येथे कार्ले, भाजा, जुन्नर, बेडसा, कॉडिवटे, मुंबई येथे कान्हेरी, औरंगाबाद येथे अजिंठा, पितळखोरा, एलोरा, औरंगाबाद लेणी, नाशिक येथे बौद्ध लेणी व इतर बुद्धीष्ट स्मारकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. ही परंपरा जवळजवळ १४ व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होती. १४ व्या शतकापासून बौद्ध धर्माच्या न्हासाला सुरवात झाली.
-उमेश वी.मेढे
संदर्भ सार:
(द पीपल्स पोस्ट)