बसपाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
बसपाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
बाराव्या शतकातील दक्षिण भारतातील क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर यांची 893 जयंती आज बसपाने साजरी केली. कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत सुभेदार लेआउट येथील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद तायडे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
महात्मा बसवेश्वर यांनी अनेक भाषा, धर्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करून *अनुभव मंटपाची* स्थापना केली. अनुभव मंटप म्हणजे लोकशाही संसद होय. समाजातील अनिष्ट चालीरीतीवर चर्चा करणे, वाईट चालीरीती सोडणे, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे, समाजातील अंधश्रद्धा घालवून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, महिलांना समानतेची वागणूक देणे, अस्पृश्यता न पाळणे, पशुहत्या न करणे, नैतिकता पाळणे, कर्मकांडापासून दूर राहणे, व्यक्तीला देवालयाच्या केंद्रस्थानी मानने आदि विचारधारेचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. म्हणूनच बसवेश्वरांना म्हणजेच बसवण्णांना दक्षिण भारतातील प्रबुद्ध महात्मा सुद्धा म्हंटल्या जाते. असे विचार बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.
जन्मदिन समारोह नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अभिलेश वाहने यांनी, प्रास्ताविक युवा नेते सदानंद जामगडे यांनी, तर समारोप दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी यांनी केला.
कार्यक्रमाला मध्य नागपूरचे अध्यक्ष अभय डोंगरे, दक्षिण नागपूरचे प्रभारी शंकर थुल, महिपाल सांगोळे, मध्य नागपूरचे प्रभारी विलास पाटील, प्रवीण पाटील, वाडीचे सचिव वीरेंद्र कापसे, जगदीश गेडाम, हेमंत बोरकर, सुबोध साखरे, संबोधित सांगोळे, आदर्श शेवडे आदि प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक प्रामुख्याने उपस्थित होते.