महाराष्ट्रातील विचारवंतांनी दिली काँग्रेसच्या खांद्यावर संविधानाची लढाई
????◆ महाराष्ट्रातील विचारवंतांनी दिली काँग्रेसच्या खांद्यावर संविधानाची लढाई
——————
Advocate.रमेश गायकवाड अहमदपूर
M A.(Thoughts).,LL.B.,Ph.D.(Scholar)
९०९६७१६२९९
——————
महाराष्ट्र मधल्या विचारवंतांना असे वाटत आहे की बीजेपी ची सत्ता आल्यास संविधान आणि लोकशाही नष्ट होईल……
आणि म्हणून हे विचारवंत काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करा असे तन-मन-धनाने सांगत आहेत……
विचारवंत म्हणत आहेत की चळवळीच्या पक्षांना मतदान केल्यास बीजेपी सत्तेवर येते….
बीजेपी, काँग्रेस मुळे जिवंत आहे आणि काँग्रेस दलित मुसलमान बांधवांच्या मतामुळे जिवंत आहे….
जोपर्यंत काँग्रेस संपत नाही तोपर्यंत आपण बीजेपीला हरवू शकत नाही…
बीजेपी ला संपवण्याची काँग्रेसची मुळीच इच्छा नाही त्यामुळे हे काम आपणच करावे लागेल…
यूपीमधे काँग्रेस संपली म्हणून बीएसपी सत्तेमध्ये आली समाजवादी सत्तेमध्ये आली….
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये काँग्रेसला प्रत्येकी एक एक खासदार आहे……..
काँग्रेस हा जवळपास संपत चाललेला पक्ष आहे आणि तो लवकर संपला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे……
काँग्रेस आपल्या मतावर मजा मारत आहे आणि ही मते काँग्रेस कडून काढून घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि आपल्या पक्षांची समोरासमोर फाईट होणार नाही आणि जोपर्यंत फाईट होणार नाही तोपर्यंत बीजेपी पराभूत होणार नाही……
कारण काँग्रेस हे बीजेपी सोबत मॅनेज आहे…
पी व्ही नरसिंहराव हे आरएसएसच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता त्याला काँग्रेसने प्राईम मिनिस्टर केलं……
नरसिंहराच्या काळातच खाजगीकरणाचा कायदा झाला…..
विचारवंतांच्या या भूमिकेवर यापुढे मोठे मोठे परिसंवाद लावून त्यांच्या या विचारांची समीक्षा केली जाईल…..
त्यांच्या या भूमिके मागचा खरा खोटा तपशील चर्चेला आणून योग्य मार्ग काढला जाईल…..
आजच्या प्रसंगाने महाराष्ट्रातील विचारवंतांची ही भूमिका मला शंभर टक्के खोटी आणि पलायनवादी वाटते……
संविधान लिहीत असताना काँग्रेस हिंदू महासभा आणि आरएसएस या तिघांनीही बाबासाहेबांना वेळोवेळी विरोध केला होता याचे पुरावे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या रायटिंग& स्पीचेस मध्ये उपलब्ध आहेत याकडे विचारवंतांनी कानाडोळा करण्याचे कारण समजत नाही……
काँग्रेस जर संविधाना प्रति इमानदार असते तर त्यांनी खाजगीकरणाचा कायदा करून एससी, एसटी ,ओबीसी चे शिक्षण आणि आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न केले नसते.
काँग्रेसच्या काळात नफ्यात चालणारे उद्योग बीएसएनएल, रेल्वे ,इंडियन एअरलाइन्स असे अनेक उद्योग डबघाईला आणण्याचे काम काँग्रेसनेच केलेला आहे…..
काँग्रेसने खाजगीकरणाचा कायदा केला आणि त्याचा कहर केला बीजेपी ने अरुण शौरीच्या नेतृत्वाखाली निर्गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करून नफ्यात चालणारे उद्योग बंद पाडणे आणि बंद पडलेले उद्योग भांडवलदारांना विकणे याला गती आली…..
आरक्षणाचा अनुशेष काँग्रेस आणि बीजेपी या दोघांच्याही कारकिर्दीमध्ये राहिला….
पदोन्नतील आरक्षण कायद्याला या दोघांनीही विरोध केला….
संविधानाला पन्नास वर्षे पूर्ण झाले तेव्हा आणि संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले तेव्हा म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सवाच्या वेळी दोघांनीही बघ्याची भूमिका घेतली……
आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार खासदार बीजेपी मध्ये जाऊन त्यांची सत्ता स्थापन करत आहेत..
निवडून दिलेले काँग्रेसचे खासदार उद्या बीजेपी मध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी विचारवंत घेतील का….
स्वतः राहुल गांधी याची गॅरंटी देऊ शकत नाहीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार खासदार बीजेपी मध्ये जाऊन मंत्रीपद भोगत आहेत…….
2024 ला काँग्रेसचे सरकार नाही आले आणि परत बीजेपी चे सरकार आले तर विचारवंत काय करतील…..
चळवळीच्या पक्षांना मतदान करू नका असे जाहीरपणे सांगणाऱ्या विचारवंतांच्या निर्लज्जपणाचा कळस तर आहेच, पण हे विचारवंत बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरुद्ध स्टॅन्ड घेत आहेत हा फार मोठा धोका वाटतो मला……
जयंती मधून भीमा कोरेगाव चे गाणे ऐकायला बरे वाटते पण जेव्हा पेशव्यांच्या विरुद्ध त्यांच्या वारसांच्या विरुद्ध लढण्याची वेळ आली तर हे विचारवंत म्हणत आहेत काँग्रेसला मतदान करा….
तुम्ही जरा लढा ना पेशव्यांच्या वारसांच्या विरोधात पुस्तक लिहून आणि आर्टिकल लिहून निवडणुका जिंकता येत नाहीत महोदय…..
प्रत्येक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांचे फळी तयार करावे लागते त्या कार्यकर्त्यांना शिक्षण प्रशिक्षण द्यावे लागते आणि त्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणुका जिंकावे लागतात….
वर्गात जाऊन 45 मिनिटाचा पिरेड घेण्या एवढे हे सोपे काम आहे का……
काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने मिळून भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे टाळले कारण एक सत्ताधारी होता दुसरा विरोधक होता….
बाबासाहेबांचे अनुयायी गांधीजींच्या अनुयायाला म्हणायला लागले संविधान वाचवा काय दुर्दैवाची वेळ आली तुमच्यावर……
धन्यवाद,
कळावे,
लोभ आहेच तो एकमेकांप्रती विकसित व्हावा हीच मंगल कामना
*◆आपला धम्म बंधू*
*ॲड.रमेश गायकवाड *अहमदपूर*.
*+91 9096716299*
????????????????????????????????????