सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्यावतीने वतीने ‘महात्मा दिवस’ उत्साहात साजरा
![](https://writersmanch.com/wp-content/uploads/2024/05/IMG_20240512_095412.jpg)
सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्यावतीने वतीने ‘महात्मा दिवस’ उत्साहात साजरा
सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने *११ मे महात्मा दिवस* गणेशवाडी,पंचवटी,नाशिक येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून साजरा करण्यात आला.
बाजीरावआण्णा तिडके, रमेश गीते, महादेव खुटे, भास्करराव जेजुरकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अप्पा जगताप यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव आण्णा तिडके,आयटक कामगार युनियन चे महादेव खुटे, प्राध्यापक डॉक्टर रामदास भोंग,गिरीश बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महात्मा फुले यांचे कार्य विशद केले.
सावता माळी युवक संघाचे कैलासवासी सचिन भाऊ गुलदगड यांचे आकस्मिक निधन झाले त्यांनाही याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास बाजीराव आण्णा तिडके, रमेश गीते, आयटक कामगार युनियनचे महादेव खुटे, भास्करराव जेजुरकर, गिरीश बच्छाव, सुरेश गीते, संजय भडके, विकास गीते, हर्षल चवरे, दीपक खैरे, शंतनु शिंदे, विजय चव्हाण ,रामदास बागुल,संजय पवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उपस्थितांचेआभार श्री भरत शेलार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे आप्पा जगताप, प्राध्यापक रामदास भोंग,श्रीराम सोनवणे, संतोष प पुंड, भरत शेलार, रामदास बागुल, जयराम सोनवणे, संदीप बच्छाव, सागर मुंजवाडकर ,विनोद सूर्यवंशी, सतीश खैरनार, संभाजी बाविस्कर, प्रकाश बागुल, धोंडू मानकर, संजय पवार प्रतीक शेलार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.