आरक्षण बचावासाठी ओबीसीचे गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
आरक्षण बचावासाठी ओबीसीचे गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
ओबीसी आरक्षणा मंदिर सर्व सत्ताधीश प्रबळ समाजाचा समावेश करण्याचा घाट महाराष्ट्र शासन घालत आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी, जातीनिहाय जनगणना, महाराष्ट्र शासनाने जानेवारी २०२४ मध्ये सगे सोयरे अध्यादेशाचा मसुदा रद्द करा, ओबीसींच्या महाज्योती संस्थेचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावे. या व अन्य प्रश्नावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच उपोषणकर्ते. मान.अॅड. मंगेश ससाणे, मान. लक्ष्मण हाके आणि, मान.नवनाथजी आबा, यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवार दि.२०जुन २०२४ रोजी दुपारी १२ वा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी माता,भगीणी,बांधव, सक्रिय सहकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चा व ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार, महाराष्ट्र राज्य सचिव सयाजी झुंजार, ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर, जिल्हा समन्वयक एकनाथ कुंभार, सुनील महाडेश्वर, चंद्रकांत कोवळे, व्ही.डी.लोहार, सौ.मालती सुतार, राधा मेस्त्री, रेखा परमाळे, सचिन सुतार, ज्ञानेश्वर सुतार, मोहन हजारे, बाळासाहेब लोहार, डी.बी.सातार्डेकर, धनाजी गुरव, राहूल कवडे, योगेश कुंभार, नामदेव सुतार, ज्योतीराम लोहार, नारायण पोवार, बाबासाहेब काशिद, काशिनाथ माळी, पांडुरंग परीट, विजय मांडरेकर, तानाजी मर्दाने, सोमन गवळी, राहुल काशीद, विवेक सुर्यवंशी, संतोष चव्हाण, विश्वास गंगाधर, युवराज सुतार, रामचंद्र सुतार, सुखदेव सुतार, आदींनी केले आहे.