तिरळे कुणबी समाजातील समाज बांधवांचा सत्कार सोहळा

तिरळे कुणबी समाजातील समाज बांधवांचा सत्कार सोहळा
सुनील शिरपुरे/झरीजामणी
मुकुटबन:- ग्रामीण भागातील प्रतिभावंत व गरजू विद्यार्थी नि प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून वैयक्तिकतेसोबतच समाजासाठी उत्तोमत्तम कार्य घडावे आणि समाजाचा विकासात्मक स्तर सुधारावा या उदात्त हेतुने तिरळे कुणबी (पाटील) समाज संघटनाद्वारा पुरस्कृत संत बाजीराव महाराज बहुउद्देशिय संस्था मुकुटबन तर्फे समाजातील प्रतिभावान विद्यार्थी व प्रतिष्ठित बांधवांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्पर्धा परिक्षेतून नोकरी मिळवणा-या आणि सेवानिवृत्त, सद्यस्थितीत कार्यरत व सेवानिवृत्त पोलीस पाटील, वैद्यकिय व अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून नोकरी करणा-या, खाजगी शिक्षण संस्थेत व कंपनीमध्ये काम करणा-या तसेच १० वी व १२ वी मध्ये प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांचा सोमवार दि.१७ जून २०२४ रोजी महावीर भवन, मेन रोड मुकुटबन येथे सत्कार करण्यात येणार आहे. तरी समाजातील वरील विद्यार्थी व प्रतिष्ठित बांधवांनी या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावे. असे तिरळे कुणबी समाज संघटनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तरी वरील सर्व समाज बांधवांनी या सत्कार सोहळ्यात बहुसंख्येने भाग घेऊन, आपले योगदान देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमाच्या आयोजनामागे सघटनेचे अध्यक्ष गणेश बुटे सर, उपाध्यक्ष रमेश शिरपुरे, सचिव प्रा.देविदास गायकवाड सर, सहसचिव आशिष राऊत, कोषाध्यक्ष चिंतेश्वर वैद्य, संघटन सचिव निलेश चौधरी सर व इतर सदस्य यांचे विशेष योगदान आहे.