पी.एचडी प्रवेश पूर्व परीक्षा (PET) घ्या;अन्यथा आमरण उपोषण- नसोसवायएफ*
पी.एचडी प्रवेश पूर्व परीक्षा (PET) घ्या;अन्यथा आमरण उपोषण- नसोसवायएफ
,
नांदेड: दि. २१
येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची Ph.D प्रवेश पूर्व परीक्षा (PET) घेण्यात आली नाही, परंतु महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात पेट परीक्षा घेतली आहे,त्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाने पेट पूर्वपरीक्षा घेतली आहे.
परंतु रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने २०२२ पासून पेट परीक्षा घेतली नही. त्यामुळे विद्यापीठाने सदर परीक्षेबाबतचे परीपत्रक तात्काळ काढण्यात यावे, ही मागणी नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) या विद्यार्थी संघटनेने मा. कुलगुरू यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता २०२३-२४ ची Ph.D प्रवेश पूर्व परीक्षा (PET) घ्यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने दिनांक २७ जून, २०२४ पासून विद्यापीठ परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनाद्वारे कुलगुरूंना विद्यार्थी नेते डॉ.हर्षवर्धन दवणे, प्रा. सतीश वागरे यांनी दिले आहे.