मागासवर्गीय व्यक्तीची जमीन सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसिलदार यांनी संगनमत करून महावितरण कंपनीला केले हस्तांतर
मागासवर्गीय व्यक्तीची जमीन सरपंच ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसिलदार यांनी संगनमत करून महावितरण कंपनीला केले हस्तांतर
अकोला :
पिंपरडोळी येथील मागासवर्गीय असलेले बौध्द समाजाचे मयत असलेले मोहन लोभाजी पवार यांनी सन.१९८८ पासून मौजे पिंपरडोळी येथील गट क्र. १३५ मधील एकूण क्षेत्र पाच एकर ही शेती कसत होते. त्यांच्या नंतर त्यांची पत्नी प्रमिला मोहन पवार वय ६२ वर्ष या सद्यस्थितीत कसत असून या शेत जमिनीवर त्यांची उपजिविका चालते . सदर जमीन नावावर होण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी, बाळापूर तसेच तहसिलदार पातूर यांच्याकडे विनंती अर्ज व त्यासह महसूल पुरावे देऊन देखील त्यांना न्याय मिळालेला नाही या विचारानेच नंतर खंगुन मोहन लोभजी पवार यांना २०१८ मध्ये अर्धांगवायूचा झटका येऊन मयत झाले.
गट नं.१३५ ही शेत जमीन मोहन लोभाजी पवार मयत रा.पिंपरडोळी ता.पातूर जी.अकोला यांच्या नावे शासकीय भरणा पावती क्र. एलईएन -३९/ पिंपरडोळी / २२/ ८८- ८९ दिनांक : ८ जानेवारी १९९० ला ट्रेझरी पातूर स्टेट बँक ऑफ इंडिया चलन क्र. १३५ भरलेले असताना ही जनिन ग्रामसेवक , सरपंच , तलाठी , मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून मा. तहसिलदार साहेब यांना चुकीचा अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल केलेली आहे.
या बाबत महावितरण कंपनीने ही जमीन ताब्यात घेण्या अगोदर केवळ तलाठी , मंडळ अधिकारी यांच्या अहवाला वरून मागासवर्गीय व्यक्तीची जमीन परस्पर ताब्यात घेतलेली आहे. सदर जमिनी बाबत महावितरण कार्यालयाने कोणतीही शहानिशा न करता बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेली आहे. व त्या ठिकाणी महावितरण मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातलेला आहे. या मध्ये सरपंच , ग्रामसेवक, तलाठी , मंडळ अधिकारी व मा. तहसिलदार या सर्वांचे संगनमत आहे.
मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रं. रामक्रं/ एल एन ए – २२ पिंपरडोळी/ ०२/ २०२१-२२ दिनांक : २६/०७/२०२२ या आदेशान्वये मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प मौजे पिंपरडोळी ता.पातूर जी.अकोला सदर गटामध्ये असलेली जमीन ही परस्पर ताब्यात घेतलेली आहे.
सदर जमीन ही मोहन लोभाजी पवार (मयत) यांच्या कुटुंबीयांचे उपजीविकेचे एकमेव साधन असून हा निर्णय मागासवर्गीय कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा असल्याने सदर निर्णय व ताबा पावती तात्काळ रद्द करावी असे निवेदनात म्हटले आहे. मोहन लोभाजी पवार (मयत) हे अनुसूचित जाती (महार) या मागासवर्ग प्रवर्गातील आहेत. हा निर्णय त्यांच्यावर जाचक व अन्याय कारक आहे. त्यांचा नैसर्गिक न्याय हिरावून घेणारा आहे. हा आदेश एका मागासवर्गीय व्यक्तीस त्यांच्या न्याय हक्का पासून वंचित ठेवण्यासाठी मुद्दामहून जातीय द्वेषातून आर्थिक आकस बुद्धीने पारित करण्यात आले आहे. तरी हा आदेश तात्काळ थांबविण्यात यावा असे पत्रकात नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष वेधून मागासवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोरातील कठोर कार्यवाही करून मोहन लोभाजी पवार (मयत) यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध साहित्यिक देवानंद पवार यांनी कळविले आहे.