वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप

गंगाखेड तालुक्यातील मौजे.धारासुर तांडा येथील विद्यार्थी अक्षय वसंत राठोड आणि इळेगाव येथील नरेंद्र शेळके हे शेतकरी यांचा वीज पडून मृत्यु झाल्याची दु:खद घटना घडली आहे. त्यामुळे राठोड आणि शेळके कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे, हि क्लेशदायक वार्ता ऐकून व्यथीत झालेले गंगाखेड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेवून सात्वन केले आणि प्रत्येकी चार लक्ष रूपये मदतीचा धनादेश सुपूर्त केला.
भौगोलिक समतोल ढासल्याने नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे नेहमी दक्ष राहून स्वत:ची काळजी घ्या. विशेष करून पावसाळ्यात झाडाखाली किंवा आडोशाला थांबताना सुरक्षित असल्याचे पाहून घ्या. अशा आपत्ती आपल्या हातात नसतात, मात्र काळजी घेण तरी आपल्या हातात आहे. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य द्या, असेही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी दोन्ही कुटुंबियांसह उपविभागीय अधिकारी जीवराज डापकार, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, आप्पासाहेब कदम, बाळासाहेब जाधव, बालासाहेब शिंदे, कुलदीप जाधव, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती, तहसील कार्यालयाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते