गणेशपूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
गणेशपूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर
तालुका विधी सेवा समिती न्यायालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
झरीजामणी/सुनील शिरपुरे
विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्यामार्फत 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ‘आजादी का महोत्सव ‘ साजरा करण्याच्या व कायदेविषयक जनजागृती करण्याच्या हेतुने कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गणेशपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन तालुका विधी सेवा समिती न्यायालयाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्ष महोदय व इतर प्रमुख पाहुण्यांनी मोटार वाहन कायदा व नियम तसेच ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, प्रचलीत कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश बी.एस.वाढई झरीजामणी तर प्रमुख पाहुणे पोलीस स्टेशन मुकुटबनचे ठाणेदार अजित जाधव, अॅड.मयुरेश ताडशेट्टीवार, सरपंच शुभांगी लोडे, उपसरपंच अमोल आसुटकर, नेवारे, न्यायालयीन कर्मचारी किसन दातारकर, आडे व गावातील गोविंदा लोनगाडगे, निलेश बेलेकार, राजु आसुटकर, लक्ष्मण येलादे, प्रविण गोहणे, पंकज पानघाटे तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्र संचालन अॅड राहुल बोथले यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील मंगेश बरडे यांनी केले.