रिपाई(आ.)राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते विनोद निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
रिपाई(आ.)राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते विनोद निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
कंधार: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीतील व्यक्तिमत्व तथा ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांच्या जन्मदिनानिमित्त नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ईशान्य भारताच्या तळागाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन विचारधारा पेरण्यात महत्वपूर्ण योगदान असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीतील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू व्यक्तिमत्व तथा ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांचा ३१जानेवारी रोजी जन्मदिन होता.रिपब्लिकन विचारधारा भारतातील ज्या डोंगराळ भागात पोहचली नाही त्या भागात रिपब्लिकन विचारधारा पोहचवण्यात विनोद निकाळजे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या एकूणच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय कार्याचा गौरव व प्रेरणा लक्षात घेता नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार ता.कंधार जिल्हा नांदेड येथील संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत गोणारकर,उपाध्यक्ष रणजित गोणारकर ,सचिव इंजि.अमोल गोणारकर यांच्या पुढाकारातून गोणार येथील सरपंच दिगांबर कठाळे,उपसरपंच हरिशचंद्र पाटील पवळे,ग्रा.स.मंजुषा गोणारकार ,ग्रा. स.लक्ष्मीकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सेवासहकारी सोसायटी गोणारचे चेअरमन गजानन पवळे,व्हाइस चेअरमन अण्णासाहेब पाटील पवळे,विशाल गोणारकार,नामदेव गोणारकार,सचिन गोणारकार आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाचे प्रस्थाविक इंजि.अमोल गोणारकर यांनी केले तर आभार श्रीकांत गोणारकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू गोणारकर, संतोष गोणारकर,नागेश गोणारकर,हर्षवर्धन गोणारकार,संतोष विजय गोणारकर,नागेश गोणारकर,मारोती कांबळे आदींचे सहकार्य लाभले.