संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करणारे वीर गणपत महार उर्फ गोविंद गोपाळ गायकवाड- ४
4
गणपत महार
थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल. काही दिवसानं सांगेल. पण त्याचा जर अन्नपाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहिल कायमचा दफन होवून. त्यामुळं त्याला जीवंत राहाणं भाग आहे. शेवटी उपाय नसल्यानं बादशाहानं गोविंदाला काही दिवस की असेना जीवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठविण्याची व्यवस्था केली होती.
सकाळ झाली होती. त्यातच पक्षी अन्न मिळविण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते. तांबडं फुटलं होतं. त्याचबरोबर सुर्यही निघाला होता. अशातच बादशाहाचा एक दूत गावात येवून धडकला. म्हणाला,
“एक सरकारी आदेश हाय. बादशाहा औरंगजेबाचं म्हणणं हाये की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं, त्यांनी स्वतः होवून बादशाहाकडं यावं. त्यांची माफी मागावी. बादशाहा त्यांना खुल्या मतानं माफ करेल.”
बादशाहा औरंगजेब……..त्या बादशाहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहित होतं की त्याचा स्वभाव कसा आहे. तसं पाहता बादशाहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं. कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशाहाचा हेर नव्हता. सर्वांनी एकत्र येवून संभाजीच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती. त्यातच आता ते शिपाही येत. दोन गोष्टी बोलत आणि निघून जात. पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं.
सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता. ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती. त्यातच माझा परीवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती. फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकराबाळाला सांभाळावं. आज संंपूर्ण गावानंही त्या परीवाराला अंतर दिलं नाही.
रोजच येणारे ते शिपाही. त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं. त्यातच काही जणं गावंही सोडून गेले होते. त्यांना वाटत होतं की यदिकदाचित बादशाहाला माहित झाल्यास बादशाहा आपल्याला सोडणार नाही.
गोविंदा जीवंत होता. त्याला क्षणोन् क्षण आठवत होता. ती बादशाहाची माणसं त्या अंधा-या कालकोठडीत येत. कधी तंबी देवून जात. तर कधी जोरजोरानं हसत असत. कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुंडकं छाटण्याची धमकी देत. एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता. त्याला काय करावं आणि काय नाही असं होवून जात होतं. पण उपाय नव्हता.
गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती. त्या गोष्टीला आपलं भाग्य समजला होता. एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटलं. कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करतांना तो व्यवहार दुरुननच केला होता. त्यांना पाणीही दुरुनच पाजलं होतं. जरी त्यानं संभाजीच्या सैन्यात एका किल्लेदाराची भुमिका पार पाडली असेल. त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेवून औरंगजेब बादशाहाच्या धाकाची पर्वा न करता संभाजीचे तुकडे गोळा केले होते. तसेच त्याला शिवून त्याचा दाहसंस्कारही उरकवला होता. एवढंच नाही तर त्यानंच दुस-या दिवशी महाराणी येशूबाईंना गडावर जावून त्याबद्दल सर्वकाही रितसरपणे सांगून मी कसा पुढाकार घेतला याचं वर्णनही केलं होतं. त्यामुळं की काय, कोण्यातरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहित होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती. आज गोविंदा बादशाहाच्या कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता. निर्भीड, नबोलक्या मनानं. त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता. उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं बादशाहा औरंगजेब दिवसेंदिवस परेशान होत होता.
गोविंदा एकटाच शूरवीर नव्हता. तर त्याची अख्खी खानदानही शुरवीर होती. त्यांना लढाईत मोठमोठे पराक्रम कसे गाजवावे हे माहित होते. त्यातच त्याचा मावशभाऊ रायप्पाने केलेला पराक्रम हा त्याच्या पाठीशी होता. तो पराक्रम गोविंदालाही पाठबळ देवून गेला होता.
संभूराजे हे जेव्हा लहान होते, तेव्हा ते रायप्पाकडे जेवायला जायचे, तेव्हा अमात्य अण्णाजी दत्तो अस्पृश्य व सवर्ण भेदभाव असल्यानं जीजामातेला त्याबद्दल सांगायचे आणि जीजाबाई शिवरायांना सांगायची. तेव्हा शिवराय हसून द्यायचे आणि त्याकडे दुर्लक्ष करायचे. कारण जीजाबाईनं जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार शिवरायांवर केले नव्हते. तसेच त्याबाबत शिकवलंही नव्हतं.
रायप्पाचं मुळ गाव तवं. आज तवं गाव मुळशी तालुक्याच्या वरसगाव धरणात बुडालेले आहेे. हे गाव तुळापूरच्या मोसे खो-यात आहे. तो पराक्रमी असा व्यक्ती असून त्याच्या पराक्रमामुळं त्याची नेमणूक संभाजीचा अंगरक्षक म्हणून झाली होती. अगदी बालपणापासूनच रायप्पा शंभूराजाचा अंगरक्षक होता.
ज्यावेळी शंभूराजे व कवी कलशांना पकडण्यात आलं. त्यावेळी त्यांंना औरंगजेबानं बहादूरगड इथे आणलं. त्यातच त्याचा छळंही करण्यात येवू लागलाा. हे जेव्हा रायप्पाला कळलं, तेव्हा त्याचं मस्तक खवळलं व मोजक्या सैन्यानिशी तो बहादूरगडाच्या दिशेनं चालून गेला. त्यातच त्या ठिकाणी पाच लक्ष सैन्याची तुकडी तैनात होती.
रायप्पानं त्या ठिकाणच्या परिस्थीतीचं निरीक्षण केलं व तो शत्रूच्या गोटात शिरला. त्यातच त्यानं वेषांतर करुन सैनिकांना पाणी पाजणा-या लोकांचा पोशाख धारण केला. अशातच एका सैनिकाला पाणी पाजत असतांना त्याच्या कानावर एक बातमी येवून धडकली की कोणाची तरी धिंड काढण्यात येत आहे. ज्यावेळी त्यानं एका सैनिकाच्या तोंडून मरहठ्ठा संभा असं नाव ऐकलं. तेव्हा तर आणखी रायप्पाचं पित्त खवळलं. त्यातच तो रागानं लालबुंद झाला आणि तिकडं धावतच सुटला.
रायप्पानं पाहिलं की कोणीतरी तेजस्वी पुरुष साखळदंडात जखडला असून त्यांचा अपमान होत आहे. त्याला मुघल सैनिक लाथा बुक्क्या मारत आहेत. त्यातच कोणी शिव्याही देत आहेत. ते पाहून रायप्पाला बरे वाटले नाही. त्यातच त्या साखळदंडाजवळ असलेल्या लाखोच्या मुघल सैन्यावर रायप्पा एकटाच चालून गेला. क्षणातच त्यानं दोन अंमलदार कापून काढले. ज्यामुळं बादशाहा सुद्धा हैरान होता. अचानक झालेला हमला…… त्या हमल्यामुळं बादशाहा औरंगजेबही गोंधळून गेला होता.
तो काटेरी साखळदंड, त्यातच तो लोखंडी साखळदंड त्यामुळं त्या साखळदंडाच्या शक्तीपुढं रायप्पाचं काहीच चाललं नाही. त्यातच लाखो सैनिक भोवताल असलेले. त्या सैनिकांच्या लाखो तलवारी. सपासप ते सैनिक वारकर्ते ठरले. त्यातच रायप्पा महाराला वीरमरण आले. ते संभूराजाच्या पायाशी झुकले व म्हणाले,
“राजे, मला माफ करा. मी हरलो. मी तुम्हाले सोडवू शकलो नाही. मी हरलो. शेवटी त्याचं रक्त संभाजीच्या पायावर सांडलं. त्यातच अगदी संभाजीच्या पायावरच रायप्पानं आपला जीव सोडला. (क्र म श:..) पुढील भाग
शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०