हम सब एक है !
हम सब एक है!
हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिश्चन, हा शिख. सर्व धर्माची भांडणं…….तसेच हा चांभार, हा मांग, हा ब्राम्हण. सर्व जातीची भांडणं. जातीजातीत कलह. कोणी म्हणतात धर्मावर लिहू नका, टिका करु नका. कोणी म्हणतात जातीवर लिहू नका. मग जात लपविण्यासाठी सारेच उपद्रव. जात विचारल्यास चक्क ओबीसी सांगीतलं जातं. का? तर ओबीसींनाच जणू अभय असावं. एस सी सांगीतल्यास भेदभाव होईल.
आज देशात अशाच प्रकारच्या भेदभावानं चरणसीमा गाठली आहे. बलात्कार सर्रास सुरु आहे. बलात्कार केव्हा कुणावर होईल असे सांगता येत नाही. त्यातच बलत्कार पिडीत व्यक्ती हा ज्या जातीचा असेल, त्या जातीची लोकं आंदोलन करतात. तसेच आरोपींना वाचविण्यासाठीही काही आंदोलनं. परीपुर्ण गोष्ट अशी की बलत्कार करणा-या माणसांचा जात आणि धर्म नसतो. तरीही जातीचा असल्याने सारेच प्रयत्न. हिच दुफळी आहे आपल्या देशात. शुल्लक शुल्लक कारणावरुन वाद होत असतात. वादातून वातावरण चिघळतं.मग सारंच बिघडत जातं. सुरुवातीला जात आडवी येते. ते प्रकरण जर धार्मीक असेल तर मग त्यात धर्मही ओतला जातो.
धार्मीक कलहाबाबत सांगतांना हे धार्मीक कलह आजचेच नाही, हे परंपरागत चालत आलेले आहेत. पुर्वी याच देशात एकच मतप्रवाह अस्तित्वात होता. कालांतरानं त्या मतप्रवाहाला तीन फाटे फुटले. जुनी वैदिक विचारसरणी, नवी बौद्ध विचारसरणी आणि जैन विचारसरणी. वाद होताच. पण जातीतीलही वाद नव्हता आणि धर्मातीलही वाद नव्हता. फक्त सत्ताविस्तारासाठी वाद. त्यातच बलशाली राजे हे आपल्या राज्याच्या विस्तारासाठी दुस-या राज्यावर आक्रमण करुन त्या राज्याला नेस्तनाबूत करीत. त्यात ज्यांचा गुन्हा नसायचा, अशा सामान्यांचे हालहाल होत.
इस सनाच्या सातव्या शतकाच्या मोहम्मद बिन कासीमच्या आक्रमणानंतर अरबी समुदाय या देशात स्थिरावला. त्या अरबी सत्ताधिका-याला साडे सातशेच्या काळात बाप्पा रावलनं हाकलून लावलं. परंतू झालेल्या अपमानाचा बदला म्हणून की काय पुढे बाराव्या शतकात पृथ्वीराज चौहानचा पराभव करुन या देशात अरब सत्ता स्थिरावली. पुढे देश स्वतंत्र्य होईपर्यंत हिच सत्ता या देशात टिकून राहिली. आजही देशात अरब समुदाय अस्तित्वात आहे. परंतू त्याचं नाव बदललं आहे.
भारत देश पुर्वीपासूनच एकसंघ राहिला आहे. परंतू अशा एकसंघ भारताला काही राजनैतिक लोकांनी तोडून या देशात दुफळी तयार केली. खुद्द अरबी सत्ताधिका-यांनीही त्यात दुफळी तयार केली. त्यातच ज्यावेळी इंग्रज सत्ताधिकारी या देशात आले, तेव्हा याच एकसंघ भारताला तोडण्याचे काम या इंग्रजांनी केलं. नव्हे तर हिंदू मुसलमान भांडणं लावले.
आजही असेच भांडणं लागतात. धर्माधर्मातील भांडणं. आज अशा भांडणातून एकमेकांचे डोके फोडली जातात. रक्त सांडवलं जातं. परंतू यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही आमचं अस्तित्व विसरलो असल्याचं जाणवतं. ज्यांनी ज्यांनी या देशात वाद निर्माण केलेत. ते वादी प्रतिवादी लोकं…..मग ते मुस्लीम राज्यकर्ते का असेना, ते इंग्रज का असेना, या भारतातून निघून गेले. सरतेशेवटी या भारतात कोण राहिले? या भारतात राहिले रुपांतरीत लोकं. ज्यांचा जबरदस्तीनं धर्म बदलवला गेला. ज्यांचा आजही डी एन ए तपासला तर तो विदेशी निघत नाही. या भारतातील पुर्वपिढीच्या लोकांचा अंश निघतो. आजही या सर्वांचं रक्त लालच आहे. मग असे असतांना आम्ही धर्माधर्माच्या नावाने का भांडावे? जातीजातीत कलह का निर्माण करावा? आपल्याच देशातील आपल्याच आईबहिणींवर अत्याचार का करावे? हे असे अत्याचार होतांना का पाहावे? मी याच जातीचा असा अभिमान का बाळगावा? मी याच धर्माचा असा अभिमान का असावा? आपल्याच देशातील गरीब लोकांना का छळावे? त्यांच्याबद्दल मनात हीन भावना का आणावी? वैगेरे प्रश्न अधांतरीतच आहेत.
विशेष म्हणजे आम्ही सर्व एक आहोत. आमची जात, धर्म एक आहेत. आम्हाला आमच्याच देशात येवून या विदेशी शक्तींनी एकमेकांत गुरफटून ठेवलं. आमच्यावर अत्याचार करण्यासाठी नाही तर सत्ता गाजविण्यासाठी आमची धर्माधर्मात विभागणी केली हे तेवढेच खरे आहे. आजही आम्ही जेव्हा पाऊस येतो. तेव्हा आडोशाला थांबतो. तिथे सर्वच धर्माची मंडळी असतात. मग ते हिंदू असो, की शिख असो. मुस्लीम असो की अजून कोणता. आजही दुकानातून वस्तू घेतांना हे हिंदूंचं दुकान व हे मुसलमानाचं असं मानत नाही. आम्ही वस्तू घेतो. आजही अयोध्येतील रामललाला तेथील मुस्लीम भाईच कपडे शिवतात. आजही मैहरच्या शारदेला पहिलं फुल आला उद्दल चढवत असतो असं मानलं जातं. अन् आजही रुग्णाला रक्त देणारा व्यक्ती हे हिंदूंचं रक्त किंवा हे मुस्लीमांचं रक्त असं मानलं जात नाही. आजही शेती पिकविणारा शेतकरी हा अस्पृश्य आहे की मुस्लीम आहे की हिंदू आहे हे न ओळखता आपण ते धान्य खातो. मग असे असतांना आम्ही हा मुसलमान, हा हिंदू, हा अस्पृश्य असा भेदभाव का करतो? प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार असतांना आम्ही असा कुरघोडी डाव का रचतो? तेच आम्हाला कळत नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास आम्ही कालही एक होतो. म्हणूनच इंग्रजांच्या विरोधात लढतो आणि देश स्वतंत्र्य केला. आम्ही आजही एक आहोत. कारण आजही आम्ही एकोप्यानं राहतो. म्हणून आम्ही हे लक्षात घ्यायला हवे की आमच्यात दुफळी कोण माजवत आहे आणि हेही लक्षात घ्या की रशियाला तोडण्यासाठी अमेरीकेनं तालिबानची मदत घेतली. आज रशिया तुटताबरोबर त्यानं ओसामालाही संपवलं. ही राजनीती आहे. हेच आपण लक्षात घ्यायला हवं. आम्ही केवळ आणि केवळ भारतीय आहोत. विदेशी नाहीत. विदेशी मंडळी ही आपल्यात दुफळी तयार करण्यासाठी सारेच प्रयत्न करणारंच. तेव्हा आपण त्यांच्या विचारांना बळी न पडता आपण सर्व एक राहावे. कोणी धर्माधर्माच्या नावाने भांडणं करु नये. जातीच्या नावाने बलत्कार होवू देवू नये. अन् जाती धर्माच्या नावाने भेदभाव. असे जर तर आपलाही देश उद्या रशियासारखाच तुटेल व भारत एकसंघ राहणार नाही.
आम्ही आजही एक आहोत. एकसंघ आहोत. अन् एकसंघ राहणार हे आम्ही आमच्या कृतीतील दाखवावे. जेणेकरुन धर्मांध विदेशी शक्ती आपल्या देशात फोफावणार नाही व कोणताच तालिबानी वृत्तीचा माणूस या देशाचं वाटोळं करणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५० (कृपया हा लेख शेअर करावासा वाटल्यास करावा)