जग

धगधगते अफगानिस्तान;शांतता हवी

धगधगते अफगानिस्तान;शांतता हवी

         अफगानिस्तान हा पुर्वीपासूनच अत्याचारींचा बालेकिल्ला राहिला आहे. पुर्वीचे इराण, इराकचे सौदागर याच अफगानिस्तानातील काबूल, कंदाहार मार्गे भारतात येत. भारताला लुटत असत आणि येथील लुटलेला माल आपल्या देशात लुटून याच मार्गानं नेत. त्यावेळी ते आपल्या सोबत तो माल वाहून आणण्यासाठी गुलाम आणत नसत तर ते गुलाम याच अफगानिस्तान मधील लोकांवर अत्याचार करुन त्यांना गुलाम बनवून त्यांच्या अंगावर ओझं देवून या भारतातील माल ने आण करीत असत.
            बगदाद तसं पाहता ही व्यापारी पेठ होती. पुढे व्यापारी बनलेली ही सौदी अरेबियाची तसेच इराण, इराकची माणसं अफगानिस्तानमध्ये स्थिरावली. त्यातच ती अफगानिस्तानची राज्यकर्तेही बनली.
          अफगानिस्तान हा पुर्वीपासूनच स्वतंत्र्य असा देश नाही. तो भारताचा एक भाग होता. कारण तसा उल्लेख इतिहासात नाही. खिस्तपुर्व ज्यावेळी सिंकदराचं आक्रमण झालं, त्यावेळी याच अफगानिस्तानमध्ये फारस हखामनी शाह यांचं शासन होतं. त्यानंतर या भागात बौद्ध धम्म अस्तित्वात होता. परंतू अफगानिस्तान हा स्वतंत्र्य देश म्हणून इस सतराशेपर्यंत तरी अस्तित्वात नव्हता.
         अफगानिस्तान हा भारताचा एक भाग होता. तसं पाहता इंग्रज जेव्हा भारतात आले. तेव्हा त्यांनी अफगानिस्तान चा भारतातून कारभार पाहतांना एक सीमारेखा आखली. त्या रेषेला ड्युरंड लाईन म्हणतात. ही घटना १८९६ मध्ये घडली. त्यानुसार अफगानिस्तान हे स्वतंत्र्य राज्य म्हणून अस्तित्वात आले.
          अफगानिस्तान हे १८९६ मध्ये स्वतंत्र्य राज्य म्हणून अस्तित्वात आले असले तरी त्यानंतरही त्या प्रदेशावर ब्रिटीश हुकूमत होतीच. अर्थात अफगानिस्तान ब्रिटीशांचा गुलाम होता.
          अहमदशाह अब्दालीनं पहिल्यांदा अफगानिस्तानवर एकाधिकारशाही निर्माण केल्यानंतर अफगानिस्तान मधील लोकांना स्वातंत्र्याची जाणीव झाली.
          अफगानिस्तानची जुनी नावे आर्याना, आर्यानुम्र वीजू पख्तिया, खुरासान, पश्तूनख्वाह आणि रोह अशी आहेत. ते पुर्वी हिंदू राष्ट्र होते. त्यानंतर मौर्य शासन काळात बौद्ध धम्म तिथं प्रस्थापित झाला. पुढे याच ठिकाणी मुस्लीम शासनही. या ठिकाणी जरी सुसंपन्नता नसली तरी इथूनच सरळ सरळ मार्ग इजिप्त आणि तत्सम देशाकडे निघत असल्यानं अफगानिस्तान हे इतर देशाचे लक्ष ठरले होते.
             छत्रपती शिवरायांचा सरनौबत नेतोजी पालकर याला जबरदस्तीनं मुसलमान बनवून औरंगजेबानं त्याला याच अफगानिस्तानात ठेवलं होतं. १९१९ ला अफगानिस्तान स्वतंत्र्य झालं. त्यानंतर १९३३ पर्यंत अफगानिस्तानचा राज्याची घडी बसविण्यात वेळ गेला. त्यानंतर जाहिर शाहचं शासन आलं. जाहिर शाहने १९३३ पासून १९७३ पर्यंत चांगलं शासन केलं. त्यापुर्वी त्याच्या जीजाचं शासन होतं. जाहिर शाह हा कम्युनिस्ट पार्टीचा असून जेव्हापर्यंत त्याची सत्ता होती. तेव्हापर्यंत सगळं व्यवस्थीत होतं. परंतू त्याची सत्ता १९७३ ला जाताच मुजाहिदीनचं (तालिबान) राज्य आलं.
          अमेरीका….. एक बलाढ्य देश. तो महाशक्तीची स्वप्न पाहात होता. त्याला कुठंतरी रशिया तोडायचाच होता. त्याची एक नजर रशियावर तर दुसरी नजर अफगानिस्तानवर होती. त्यातच त्यानं तालिबानला सोवियतला तोडण्यासाठी मदत केली. त्यात सोवियतमध्ये असलेली कम्युनिस्ट सत्ता तुटली. अमेरिकेचं काम झालं. त्यातच अमेरीकेनं हळूहळू तालिबानला विरोध करणं सुरु केलं. त्यातच मुजाहिदीन चिडूनच होता.
           फेब्रुवारी २००७ पर्यंत अफगानिस्तानात लोकतांत्रिक सरकार होती. त्यातच अफगानिस्तानची सीमा भारताला लागून असल्यानं तसेच अमेरीकन सैन्य अफगानिस्तान मध्ये असल्यानं तालिबान दबून होते. परंतू ते संधी पाहात होते. अमेरिकन सैन्याच्या निघून जाण्याची. जसे अमेरीकेने अफगानिस्तान मधून सैन्य हलवले. तालिबाननं अफगानिस्तानची सत्ता हातात घेतली. मग काय, त्यांना जे जे विरोध करत होते. त्यांना तालिबान मारत सुटले. मग तो मार्ग क्रुराचा का असेना. त्यात कोणाचा दोष का असेना. निर्दोष नागरीक आज अफगानिस्तानमध्ये बेवारसपणे मरत आहेत. एक भारत सोडला तर आजूबाजूचे देशही येथील लोकांना  मदत करायला पुढे येत नाही. त्यांना वाटत आहे की कदाचित आपल्यालाच पुढे तालिबान अफगानिस्तान सारखं मारुन टाकतील.
           अफगानिस्तान अख्खा ताब्यात आला असला तरी आजही पंजशीर नावाचा एक प्रांत असा आहे की तो तालिबानला अजुनही ताब्यात घेता आला नाही. याच प्रदेशावर सोविएट संघाने व तालिबानने यापुर्वीही ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू ते त्यात यशस्वी झाले नव्हते.
           ज्यादिवशी भारताचा स्वातंत्र्यदिन होता. त्यावेळी अफगानिस्तान मध्ये तालिबानी सत्ता ताब्यात घेत होते. परंतू पंजशीरमध्ये तिनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि तेथील उपराष्ट्रपती अजहर मसूदनं यांनी सांगीतलं की अजुनही अफगानिस्तान सरकार पराभवी झालेले नाही. त्यांच्या धमणीत अजुनही अफगाणी रक्त शिल्लक आहे.
           तालिबाननं यापुर्वी म्हणजे १९९६ मध्ये सत्ता हातात घेतली होती. त्यावेळीही त्यांनी कडक निर्बंध लावले होते. लहान लहान मुलांच्या हातात बंधूका दिल्या होत्या. शिक्षणाचा लवलेश नव्हता. महिलांना बुरखा वापरल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हते. त्यांनी नेलपालिश लावणे वा लिपस्टिक लावणे, सारासर गुन्हे समजले जाई. त्यातच या तालिबानाच्या मोरक्यानं १९९९ मध्ये भारतीय विमान  हायजैक केलं. ते विमान अफगानिस्तान मध्ये नेलं. त्यात अनेक राष्ट्राचे नागरीक होते. शेवटी अमेरिकेच्या मदतीने २००१ मध्ये या अफगानिस्तान वर हल्ला केला गेला. त्यानंतर तालिबान सत्तेतून बाहेर झालं.
           आज अमेरिकेनं आपले सैन्य माघारी बोलावले होते. तोच तालिबाननं अफगानिस्तानातील सत्ता हातात घेतली. परंतू त्यांचं अत्याचार करणे पाहून तालिबानची सत्ता बरी नाही असं मत साहजिकच लोकांच्या नजरेत निर्माण होत आहे. त्यामुळं की काय, अफगाण नागरीकांना अजुनही तालिबानवर विश्वास नाही.
            खरं तर तालिबाननं सुधरायला हवं. ठीक आहे, सत्ता तालिबाननं हातात घेतली. परंतू जुनं ते सोडून द्यावं व नवीन विचार अंगीकारुन तालिबानं लहान मुलांच्या हाती बंधूका देवू नये. महिलांना सुरक्षितता प्रदान करावी. तसेच कोणत्याही अफगानिस्तान नागरीकांवर अत्याचार करु नये. जेणेकरुन पुढील काळात हर अफगानिस्तान नागरीकच नाही तर इतर देशातील लोक तालिबानकडे चांगल्या नजरेनं पाहतील.
          सध्या अफगानिस्तान धगधगत आहे.काल असाच एक व्हाट्सअपवर व्हिडीओ आला. व्हिडीओ महिलेचा होता. ती महिला…… त्या महिलेनं नेलपालिश लावला होता. परंतू तिनं नेलपालिश का लावला म्हणून तालिबान्यांनी तिचा हात तोडला. ते एवढे करुनच थांबले नाहीत तर त्या महिलेचा घावाचा हात उकळत्या पाण्यात बुडवला. यावरुन कल्पना येते की अफगानिस्तान मध्ये काय चाललेले आहे.
           खरंच अफगानिस्तान मध्ये असलं तालिबान्याचं कृत्य. विचार करायला भाग पाडणारं दृश्य. सर्व जगानं याचा विचार करण्याची गरज आहे. अफगानिस्तान खचला आहे. त्याला मदतीची गरज आहे. तालिबान्यांनी अमेरीकेला ३१ सप्टेंबरपर्यंत सैन्य काढण्यासाठी मुदत दिली आहे. ते खरंही आहे. परंतू अमेरिकेनं सैन्य काढू नये अफगानिस्तानमधून.व्यतिरिक्त सर्व जगानं तालिबानला लक्ष करुन त्यावर आक्रमण करावं. जेणेकरुन तालिबानी दबेल व पुन्हा ते मुंडकं वर करणार नाही. हे तेवढंच खरं आहे.

         अंकुश शिंगाडे ९९२३७४७४९२

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button