महार रेजिमेंटने जवानांच्या टोपीवर भीमा कोरेगावचे विजयस्तंभ लावले पण; स्वातंत्र्यानंतर बदलले
महार रेजिमेंटमध्ये जवानांच्या टोपीवर भीमा कोरेगावचे विजयस्तंभ लावले पण; स्वातंत्र्यानंतर बदलले
दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा हजारो महार तरुणांनी आम्हाला लष्करात घ्या, अशा अर्थाचे अर्ज सरकारकडे पाठविले. या विनंतीला सदर्न एरिया रिक्रूटिंग स्टाफ व त्यांचे प्रमुख कर्नल के. ई. फ्रैंक्स, डी. एस. ओ. आणि असिस्टंट डायरेक्टर ऑफ रिकूटिंग साउथ यांनी ताबडतोब पाठिंबा दिला. त्यांनी पलटणीतील बीन लढाऊ सेवक म्हणून त्या महार तरुणांना निरनिराळ्या पलटर्णीत व पथकांत नोकरीवर ठेवले. १९४० मध्ये महार तरुणांच्या अॅब्युलन्स रक्षक म्हणून दोन पलटणी उभारण्यात आल्या. महार रेजिमेंट तयार करावी, असा हुकूम मिलिटरी खात्याने १९४१ च्या सप्टेंबरमध्ये काढला, तेव्हा फर्स्ट महार बटालियन बेळगाव येथे १ ऑक्टोबर १९४१ ला उभारण्यात आली. ही बटालियन बेळगावहून कामटी (नागपूर) येथे नेण्यात आली. सेकंड महार बटालियन, कामटी येथे १ जून १९४२ ला उभारण्यात आली. तिसरी महार बटालियन, १ नोव्हेंबर १९४३ रोजी नौशेरा (वायव्य सरहद्द प्रांत) येथे उभारण्यात आली.
त्यात पुढे जाऊन
१११ वी महार बटालियनने (१९१४-१८)
या कालखंडात खांद्यावरील पट्टा वापरला होता.
तो “111 MAHARS”या अक्षरांचा होता.
तर
१९४२-४६ च्या काळांत महार रेजिमेटने जवानांच्या टोपीवर जो पट्टा वापरण्यासाठी घेतला त्यावर कोरेगांवचा विजयस्तंभ होता.
त्यांच्या दोन्हा बाजूना उतरत्या पट्यावर “कोरे” (उजवी बाजू) आणि “गांव” (डावी बाजू) आणि विजयस्तंभाच्या तळाशी “महार”ही अक्षरे वर्तुळाच्या एका भागात बसविलेली होती.
हा बॅज मेजर ईलमॉर्टल मॅन्स दुसऱ्या महार बटालियनच्या अधिकाऱ्याने तयार केला होता.
(कित्ता पा. ८९)
पुढे
महार रेजिमेंटसचे रूपांतर १ ऑक्टोबर १९४६ ला मिडियम मशिनगन रेजिमेंटमध्ये झाले. तेव्हा टोपीवरील वापरण्याचा बॅज तयार करण्यांत आला. त्यांत मध्यावर विजयस्तंभ, त्याला छेदणाऱ्या दोन म्यान केलेल्या तरवारी, परस्परांना खालच्या बाजूस छेदणाऱ्या दाखविण्यात आल्या होत्या.
टोकांना जोडणारी एक कमान तरवारीच्या म्यानांच्या टोकावर टेकलेली आणि त्या कमानीवर KORE उजवी व ‘GAON’ (डावी बाजू) ही अक्षरे कोरली होती.
तळाच्या पट्टीवर
‘The MAHAR REGIMENT’ ही अक्षरे होती. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जो बॅज टोपीसाठी तयार केला त्यांत स्तंभाच्या ठिकाणी उभी कट्यार काढली बाकीचे सर्व पूर्वी प्रमाणेच होते; मात्र वरील टोकांच्या कमानीवरील KORE ऐवजी ‘यश’ व GAON ऐवजी ‘सिद्धी’ ही अक्षरे घालण्यात आली (कित्ता, पा. ९०) या चार बॅजेसची चित्रे येणे प्रमाणे.
अशा प्रकारे भीम कोरेगावच्या बाबतीत महार शूरवीरांच्या सन्मान प्रतिकाचा ते मूळ स्वरूप स्वातंत्र्यानंतर बदलण्यात आले आहे.
( संदर्भ- अस्प्रश्यांचा लष्करी पेशा
चांगदेव भं. खैरमोडे)
-रायटर्समंच