आपल्याला जगाला हेच शिकवायचे आहे..
आपल्याला जगाला हेच शिकवायचे आहे
पदव्या…….पदव्या अवश्य घ्याव्यात. पण आपली संस्कृती जोपासावी असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आज लोकं पदव्या घेतात. पण संस्कृत्या विसरतात.
शिक्षण तत्ववेत्ते महात्मा फुले यांनी स्रियांना शिक्षणासाठी शाळा उपलब्ध करुन दिली. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यात स्रियासाठी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. तसेच ज्यावेळी एक इंग्लिश राजपुत्र पंचम जार्ज भारतात आला. त्यावेळी त्याला भेटायला सभागृहात जातांना ते अगदी साध्या म्हणजे शेतकरी वेषात गेले. त्याचं कारण होतं आपली संस्कृती. खरं तर आपल्याला आपल्या संस्कृतीचा गर्वच असायला पाहिजे. पण तो गर्व आपल्याला नसतो.
आपली संस्कृती ही अतिप्राचीन असून महान अशी आहे. या संस्कृतीत महिलांना विशेष करुन नवश्रृंगार दिलेला असून त्यात कपाळाला कुंकू, भागाला मळवट, डोक्यावर पदर (सेव), हातात बांगड्या, पायाला जोडवे, त्यातच गळ्यात मंगळसुत्र असून जी स्री या साजश्रृंगारापैकी एखादा जरी श्रृंगार करुन नसेल, तिला भारतीय प्राचीन संस्कृती स्री मानत नव्हती तर तिला एका देवदासीची उपमा देत होती. त्यात कारणही होतं. ते म्हणजे महिलांनी आपला साजश्रृंगार करुन राहावे. वडीलधारी मंडळींचा आदर करावा. जेणेकरुन त्या संस्कृतीतील स्रिया विवाहानंतर टिकतील. वडीलधारी मंडळींचा आदर करतील. ही संस्कृतीतील स्रीया शास्रोक्तही करीत असत. जसे गार्गी मैत्रेयीनं शास्रोक्त केला होता.
प्राचीन भारतीय संस्कृतीतील स्रीयांनाच अशा साजश्रृंगाराचं बंधन होतं असे नाही तर त्या काळातील पुरुषांनाही तसं बंधन होतं. ते पुरुष शेवटपर्यंत वडीलधारी मंडळींच्या आज्ञेत वावरत असत. वडीलधारी मंडळींच्या विरोधात जात नसत. ते उच्च शिक्षण शिकत. परंतू त्या शिक्षणाचा त्यांनी कधी गर्व बाळगला नाही.
आज काळ बदलला. या काळातील मंडळी पाश्चात्याच्या संपर्कात आली. त्यातच या बदलत्या काळानुसार आजची संस्कृतीही बदलली. या बदलत्या काळात महिला शिकल्या. कोणी डॉक्टर, इंजीनियर बनल्या. त्यातच पदर गेला डोक्यावरील. तसेच गळ्यातील मंगळसुत्र संपलं. त्याची जागा सोनसाखळीनं घेतली. कपाळाचा कुंकू गेला. हातातील बांगड्याही तसेच पायातील जोडवेही. ही संस्कृती आजच्या एकंदर परीस्थीतीवरुन त्या काळातील स्रियांना पुरुषांनी गुलाम बनवले होते असं मानायला लागली. कारण आजच्या संस्कृतीचं मानणं होतं की त्या काळातील स्रियाच फक्त गळ्यात मंगळसुत्र घालत होत्या. पुरुष नाहीत. स्रियाच कपाळावर कुंकू लावत होत्या. पुरुष नाही. स्रियाच हातात बांगड्या घालत होत्या. पुरुष नाही. परंतू आजची संस्कृती हे विसरली की त्याही काळात पुरुष कानात मोठमोठे कर्णफुल घालायचे. गळ्यात त-हेत-हेचे दागीणे घालायचे. कपाळावर अष्टगंधाचा टिळा राहायचा.पाय आणि हातात तसेच भुजेतही कडे राहायचे. मग पुरुषांचा तो अवतार……..ते कशाचं प्रतिक होतं. आजही अजिंठा वेरुळच्या भित्तीचित्रावरुन तशी कल्पना येते. ज्याप्रमाणे स्रिया आपला साजश्रृंगार परीधान करायच्या, त्याप्रमाणे पुरुषही साजश्रृंगार करीत असत.
आज पुरुषप्रधानच संस्कृती आहे. परंतू या संस्कृतीला पाश्चात्य संस्कृतीची झालर आहे. ती पाश्चात्य संस्कृती. ज्या संस्कृतीतील स्रियांच्या आणि पुरुषांच्या अंगावर पुरेसे कपडे दिसत नाही. ज्या संस्कृतीतील स्रियांच्या कपाळावर कुंकू दिसत नाही. ज्या संस्कृतीतील स्रियांच्या हातातही बांगड्या दिसत नाहीत. तसेच मंगळसुत्राऐवजी सोनसाखळी दिसते. परंतू त्यात कारण आहे.
समशीतोष्ण कटिबंधाचा भाग जर धरला तर त्या भागात दमट वातावरण असतं. त्या भागात दमट वातावरणामुळं अंगावर कपडे सहन होत नाही. म्हणून ते अर्ध्या कपड्यात वा वेषभुषेत दिसतात. त्यांच्याकडील वातावरणानुसार त्यांचं वागणं बरोबर आहे. परंतू आपल्याकडील वातावरण तसं नाही. त्यामुळं आपली संस्कृतीही कमी कपड्यातील नाही.
महत्वाचं म्हणजे माणसानं शिकावं. मोठमोठ्या पदव्या घ्याव्यात. कोणी डॉक्टर इंजीनीयर बनावं. त्याचबरोबर स्रियांनीही शिकावं. डॉक्टर, इंजीनियर बनावं. परंतू आपली संस्कृती विसरु नये. तिचा सन्मान करावा. त्यातच त्या संस्कृतीनुसार चालावे. कारण आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायलाच हवा. ज्यावेळी आपण आपल्या संस्कृतीचा आदर करु. सन्मान करु. तेव्हाच इतर देशही आपला आदर करतील आपला सन्मान करतील. महत्वपूर्ण गोष्ट ही की आपण आपली संस्कृती विसरुन इतरांच्या संस्कृतीचं अनुकरण करण्याऐवजी आपल्या संस्कृतीचे इतर अनुकरण कसे करतील याचा विचार आपण प्रत्येकांनी करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण आपली संस्कृती महान बनवू. विदेशी संस्कृती सोडून आपल्याच संस्कृतीच्या नियमानुसार वागू. हे जेव्हा इतरांना दिसेल. तेव्हा तेही आपले अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही आणि एक महत्वाचं सांगतो की आपल्याला जगाला हेच शिकवायचे आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०