यवतमाळ येथे भोई समाज युवा जागर कार्यशाळा संपन्न
यवतमाळ येथे भोई समाज युवा जागर कार्यशाळा संपन्न
भोई समाजातील युवकांचा सर्वांगिण विकास व रोजगारक्षम बनविण्याचा उद्देश
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
भोई समाजातील युवकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतूने व विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याकरीता स्वयंरोजगाराचे उपलब्ध मार्ग, कौशल्य विकासाच्या योजना, त्यातील संधी, प्रकार, वित्तीय साक्षरता , प्रोजेक्ट, प्रपोझल लिहिण्याची पद्धत, स्पर्धा परीक्षा इत्यादी विषयांवर महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ प्रणित युवा शाखा यवतमाळच्या वतीने भोई समाज युवा जागर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून श्री.मारोतरावजी पडाळ, उदघाटक मा.डॉ.श्री.सुरेशराव नेमाडे, श्री.अजय मेसरे, श्री.महादेवराव वाघाडे, श्री.दिनानाथजी वाघमारे, श्री.राहुल हरसुले, श्री.अमोल बावणे, श्री.संजय कुकडे, श्री.संजय शिवरकर, श्री.देविदासजी वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.विजयकुमार भगत यांनी स्वयंरोजगाराचे क्षेत्र आणि प्रशिक्षण देणा-या संस्था, श्री.अशोक खिरटकर यांनी वित्तीय साक्षरता, श्री.अशोक कांबळे यांनी बँकिंग योजना, प्रोजेक्ट प्रपोझल लिखाण, लघु व सूक्ष्म उद्योगातील योजना, श्री.संजय मनवर मच्छीमारांच्या योजना, त्याची अंमलबजावणी श्री.अमोल बावणे डिजिटल युगात रोजगाराच्या संधी, श्री.अजय मेसरे मच्छीमारांच्या योजना, व्यवसायात येणा-या अडचणी तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना येणा-या अडचणी कशा सोडवायच्या? श्री.श्रीकांत आडे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांची सामाजिक व मानसिक तयारी कशी करायची? श्री.दिनानाथजी वाघमारे व श्री.मारोतरावजी पडाळ यांनी सामाजिक संघटनेत युवकांचा सहभाग इत्यादी विषयांवर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच समाजातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.संजय कुरवाडे यांचा सपत्नीक सत्कार, सेवा निवृत्त श्री.हनुमानजी सातघरे व श्री.रामभाऊ बोरवार यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यशाळेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन झाल्यामुळे समाजातील युवा बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून या समाज हिताच्या भोई समाज युवा जागर कार्यशाळेची सर्वत्र चर्चा होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अभिजित पारीसे प्रास्ताविक श्री.राहुल पडाळ व आभार प्रदर्शन श्री.निरंजन सातघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्वश्री निलेश गिनगुले, संजय राखडे, आनंद मांढरे, प्रकाश मोहजे, परीक्षित सोनोने, रत्नाकर सातघरे, दिलीप बावणे, गजानन मोहजे, गजानन बावणे, अक्षय मेश्राम, अभि मेश्राम, भारत राऊत, देवा पारीसे, चिंदू सातघरे, स्वप्नील पडाळ व सौ.सोनाली नि.सातघरे यांनी अथक परिश्रम घेतले.