मानवाच्या शरीरात धडकणार वरहाचे हृदय..
मानवाच्या शरीरात धडकणार वरहाचे हृदय..
*विज्ञान क्षेत्रात क्रांती*
अमेरिकेत डॉक्टरांनी एका रुग्णाच्या शरीरात चक्क वराहाच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले. वराहाच्या हृदयाचे मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या त्या रुग्णाची तब्येत ठीक आहे. सर्वकाही सुरळीत झाले तर आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रातील हा एक चमत्कारच असेल. गंभीर हृदयविकार असलेल्या लोकांसाठी वराहाचे हृदय प्रत्यारोपण एक वरदान ठरू शकते.
मेरीलैंड राज्यातील बाल्टीमोरमध्ये राहणारे ५७ वर्षीय डेव्हिड बेनेट है हृदयाचे अनियमित ठोके आणि हार्टफलच्या समस्येने ग्रस्त होते. सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे होता. परंतु काही वैद्यकीय कारणांमुळे इतर कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे डेव्हिडच्या शरीरात प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते.
त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलैंड मेडिकल सेंटरच्या हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. बार्टली ग्रिफीथ यांनी डेव्हिड यांच्यापुढे वराहाच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव ठेवला. डेव्हिड यांनी क्षणाचाही विलंब न लावता हा प्रस्ताव मान्य केला. एक तर मरण पत्करणे किंवा आपल्या शरीरात वराहाचे हृदय प्रत्यारोपित करणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे होते. मला जगायचे होते. प्रत्यारोपणाचा निर्णय म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे होते. परंतु माझ्यापुढे ही शेवटची संधी होती, अशी भावना डेव्हिडने शस्त्रक्रियेपूर्वी व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे नऊ तास ही शस्त्रक्रिया चालली.
जगातील अशा प्रकारच्या या पहिल्या शस्त्रक्रियेची सोमवारी ‘डॉक्टरांनी माहिती दिली. गत तीन दिवसांपासून डेव्हिडची प्रकृती सुधारत आहे. सध्या ते नैसर्गिकपणे श्वासोच्छवास करत आहेत. मात्र दीर्घकाळाच्या परिणामांबद्दल आताच काही सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांचा हा प्रयत्न पुर्णपणे यशस्वी ठरला तर हृदयविकाराच्या समस्येने ग्रस्त लोकांवरील उपचाराचा नवा मार्ग मोकळा होणार आहे.
एखादया प्राण्याच्या हृदयाचे शरीरात प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी १९८४ साली एका नवजात अर्भकाच्या शरीरात वानराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते मात्र शास्त्र क्रियेनंतर ते बाळ अवघे २०दिवस जगले होते.सध्या जगभरात वरहाच्या अवयांचा प्रत्यारोपणासाठी वापर केला जातो.हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये डुकराच्या हृदयाच्या झाडपांचा सर्वाधिक वापर होतो.याशिवाय भाजलेल्या रूग्णांवर अनेकदा डुकराच्या त्वचेचे प्रत्यारोपण केले जाते.अमेरिकेतील मानवाच्या शरीरातील वरहाच्या हृदयाचे मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण यशस्वी झाले,सर्वकाही जर सुरळीत झाले तर आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रातील एक चमत्कारचं असेल.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
मो.९५६१५९४३०६