समिश्र

असावे निःशुल्क;शिक्षण,न्यायदान अन उपचार..

असावे नि:शुल्क ; शिक्षण, न्यायदान अन् उपचारही..

शिक्षण, न्यायदान आणि रुग्णालयातील उपचार ह्या गोष्टी माणसाच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी आहेत. परंतू ह्या गोष्टींनाच अलिकडे जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्या जेव्हा निःशुल्क होतील. तेव्हाच देश ख-या अर्थानं सुजलाम सुफलाम होवू शकेल.
शिक्षण ही आवश्यक गरज आहे. ज्या धर्मात आणि जातीत शिक्षणाचा अभाव असतो. त्या जाती मागासलेल्या जाती म्हणून ओळखल्या जातात. ती मंडळी एकंदर सर्वच गोष्टी अज्ञानानं करीत असतात. जसे विवाह.
विवाह करतांना काही काही जातीत विवाह लवकर करतात हे त्यांचं अज्ञान असतं. मुलीही विवाहाला तयार होतात स्वतःच्या मनानं विचार न करता. हेही त्या मुलींचं अज्ञान असतं. मुलगाही विवाहाला तयार होतो स्वतःच्या कामधंद्याचा विचार न करता. हेही त्याचं अज्ञानच असतं. कारण आपला समाज हा ती मुलं मुली व्यवस्थीत विचार करण्यायोग्य होण्यापुर्वीच विवाह करुन टाकतात. मग अशा मुलांवर आपली पत्नी पोसायची जवाबदारी येते.,अशावेळी ती मुलं मिळेल ती कामं करीत असतात.
मुलांचे विवाह होताच आपली पत्नी पोसण्यासाठी ते मिळेल ती कामं तर करतातच. व्यतिरीक्त पुढं प्रजोत्पादन करतांनाही केवळ आणि केवळ अज्ञानामुळं मुलं कितीतरी जास्त प्रमाणात जन्माला घालतात. त्यातच त्या मुलांना पुढं व्यवस्थीत शिक्षण मिळत नाही. घालायला व्यवस्थीत कपडेही मिळत नाही. तसेच खायला पुरेसे अन्नही मिळत नाही. त्यातच यावेळी थोडं वय वाढलेलं असतं. अशा वाढलेल्या वयानंतर पती पत्नीत संमजसपणा येतो. कळायला लागतं की शिक्षण म्हणजे काय? त्या शिक्षणाची गरज काय? आपल्या काय चुका झाल्या? त्याचा परीणाम काय झाला? परंतू चूक ती चूकच. ती आता सुधारता येत नाही. कारण वेळ निघून गेलेली असते. त्यातच वडीलधारी मंडळींनी आपल्यासोबत दगलबाजी केल्याची भावना आपल्या मनात जोर धरु लागते. विचारांची कालवाकालव होते. त्यातच पश्चाताप व त्या पश्चातापातून काही मंडळी बोध घेतात. ती मंडळी प्रसंगी कितीही मुलं असली तरी त्यांना शिकवतात. त्यांचे विवाह उशीरा करतात. तसेच त्यांना सर्वात मोठं फुल, एकच मुल अशी भावना शिकवतात. हेच खरं शिक्षण असतं. अनुभवातून आलेलं.
काही काही मंडळींना पश्चाताप तर होतो. परंतू ते त्यातून मार्ग काढत नाहीत. काय करावं ते कळत नाही. एकमेकांवर दोषारोपण सुरु असतं पती पत्नीचं. विचारांची कालवाकालव होते व त्याची परियंती आत्महत्येत होते. खास करुन पुरुष. मग ती मुलं व तो संसाराचा गाडा पती पत्नीमधून उरलेल्या एका व्यक्तीला चालवावा लागतो. त्यातच ते तरुणपण असतं. शारिरीक भावनाही जुळलेली असते. शेवटी तो पुरुष असेल तर त्याला मुलींना फिरवणं वा फसवणं आवडत नाही. मुलीही अशा मिळत नाही. शेवटी अशी पोटची मुलं असतांनाही तो दुसरा विवाह उरकवतो. मग काय सारंच बिघडतं. दुसरी विवाहानंतर येणारी मुलगी ही त्यांच्या त्या बाळाला शिकवेलच असं नाही. पुरेसे अन्न देईलच असे नाही. ती मुलं बेवारस उकिरड्यावर जशी कुत्री जगतात. तशी जगत असतात. हीच बेवारस मुलं पुढे जावून जेव्हा समझदार होतात. तेव्हा आपली जीवनसंगीनी मिळविल्यावर तिला दुःख देत नाहीत.
अशा आत्महत्येतून पुरुष जर मरण पावला तर उरलेली स्री ही आपल्या सर्वस्वाचा त्याग करते. काही काही दुसरा विवाह देखील करीत नाही. त्या मोलमजूरी करुन आपलं पोट व आपल्या मुलांचं पोट पालवते. परंतू शारिरीकता तिलाही लागलेली असते. ती दुसरा विवाहही करु इच्छीते. परंतू आपली पुरुषप्रधान संस्कृती. तिला नाव बोटं ठेवणारच. त्यातच तिला जर मुलं असतील तर तिच्याशी कोणताच पुरुष विवाह करायला तयार नसतो. फक्त त्यांना ती हवी असते तिची मुलं नाही.
तिलाही आकर्षण असतं लैंगीकतेचं. शेवटी ती काय करणार. मग ती लपूनचोरुन आपल्या कामवासना पुर्ण करीत असते. परंतू ती कामनासना असते. केव्हापर्यंत लपणार. शेवटी सर्व समाजाला माहित होते. लोकं नावबोटं ठेवतात. शेवटी तिच्यासमोर पर्याय नसतो. त्यामुळं की काय, ती राजरोषपणे आपला देह समाजाची पर्वा न करता विकत असते. कशासाठी तर आपल्या पोटासाठी. आपल्या लेकरासाठी. कारण तिला आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं. त्याचबरोबर आपली शारिरीक तृप्तीही पुर्ण करायची असते.
महत्वपूर्ण वस्तुस्थिती ही की यात तिचं काय चुकतं? तिला दुषणे लावण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? तरीही तिलाच दोषी मानलं जातं. परंतू यात तिला दोषी मानू नये. दोषी असतात तिचे वडीलधारी. जे तिच्या समंजस होण्यापुर्वी तिचा विवाह एका असमंजस पुरुषांची लावून देतात.
शिक्षण……..अशी बरीचशी गरीब कुटूंब आहेत. अशी कुटूंब केवळ ग्रामीणच भागात नाही तर ती शहरातही बहुसंख्य प्रमाणात आहेत की ज्यांना मुलांना शिक्षणच देता येत नाही. ज्यांना परीश्रम कितीही केलं तरी आपल्या मुलांना नीट पालवता येत नाही आणि पुरेसं अन्न देता येत असलं तरी शिक्षण? प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण शिक्षणाला पै पै पैसा लागतो. हा पैसाच अशा लोकांच्या गरीबीचं कारण ठरते.
शिक्षण वाघिणीचं दुध आहे असं म्हणतात. ते प्यायल्यावर व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहात नाही. हे खरं आहे. परंतू शिक्षण घ्यावं कसं? ही एक समस्याच आहे.
अलिकडे आरक्षण आहे. आरक्षणानं उच्च शिक्षण शिकवता येतं. पण हे आरक्षण कुणासाठी. विशिष्ट अशा वर्गासाठी. सर्वसामान्य लोकांसाठी नाही. आरक्षणाची या लोकांनाही गरज आहे. जी मंडळी आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी शिक्षण निःशुल्कच असावं. तसंही पाहता शिक्षण हे निःशुल्कच असावं. कारण त्या शिक्षणातून सामाजीक विकास होत असतो. काहीतरी नवनिर्मीती करता येते. एक नवा बदलाव करता येतो. ज्या बदलावातून देशाचा विकास होत असतो. परंतू शिक्षण निःशुल्क होणार नाही. कारण राजकारण्यांना या शिक्षणातूनच भरमसाठ पैसा कमवता येतो.,आज उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर विनापैशानं घेता येत नाही. कारण पुढील तांत्रीक उच्चशिक्षणावर राजव्यवस्थेची मालकी आहे. डॉक्टर, इंजीनियर बनायचे असल्यास भरमसाठ पैसा ओतावा लागतो. जो पैसा लाखोच्या घरात आहे. असे मोठमोठे तंत्रशिक्षण शिकविणा-या संस्था या किंबहूना सरकारी नाही. दोनचार अपवादात्मक संस्था सोडल्या तर बाकी सर्व शिक्षणसंस्था ह्या श्रीमंतांच्या मालकीच्या आहेत. त्यातूनच शिक्षणाचा बाजार मांडला जातो. त्यामुळं की काय, लोकांनी आपली मानसिकता बदलली आहे. तेही मुलांना साधं प्रार्थमीक शिक्षण देवू शकत नाही. द्यायला पुढं येत नाही. कारण त्यांना माहित आहे की शिक्षणाचा उपयोगच नाही. पुढे शिक्षण घ्यायला भरपूर पैसा लागतो. त्यामुळं आजच अज्ञानी असलेलं बरं. त्यामुळच की काय ते शिकत नाही. तसेच बालविवाहाला प्राधान्य देतात व पुढे त्यानंतर उद्भवणा-या सा-या समस्याही झेलत बसतात. शोषत राहतात.,एखाद्या शोषीतांसारख्या.
दुसरी महत्वाची गरज आहे ती म्हणजे न्याय. आपले संविधान न्याय समता बंधूता यावर आधारलेली आहे. परंतू खरंच आपल्या देशात न्याय सर्वांना निःशुल्क आहे काय? याचं उत्तर नाही असंच आहे. ज्यांचेजवळ अमाप पैसा. त्यांना न्याय हा विकत घेता येतो असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण एखाद्या गरीब व्यक्तीवर अन्याय झाल्यास तो न्यायालयात दाद मागू शकत नाही. खटला चालवू शकत नाही. कारण खटला चालवायला वकील जरी निःशुल्क मिळत असला तरी यायला जायला पुरेसा पैसा लागतो. त्यातच सरकारी वकीलही कळसुत्री बाहूले असल्यासारखा प्रतिवादींच्या वकीलांच्या हो ला हो मिळवीत असतो. कारण वकील बनत असतांना लाखोच्या घरात पैसा मोजावा लागतो. तो पैसा कुठून निघणार. तो पैसा कमविण्यासाठी तो वकील प्रतिवादीच्या वकीलाशी जुळवून घेत असतो. त्यामुळं गरीब माणसं ही असा अत्याचार सहन करतात. परंतू ते न्यायालयात खटले दाखल करीत नाही वा स्वतःवर अत्याचार होनूनही न्याय मागू शकत नाहीत.
तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे उपचार. आज सर्वांना आरोग्य लागलं आहे. व्याधींनी हा गरीब हा श्रीमंत असा भेद केलेला नाही. त्यातच डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतांना खाजगी संस्थेत लाखो रुपये मोजावे लागतात. मग डॉक्टर ही रुग्णांवर उपचार करतांना केवळ पैसा कमविणे हाच उद्देश ठेवतात. ते गरीबांचा उपचार करीत नाही.
महत्वपूर्ण गोष्ट ही की डॉक्टर, इंजीनियर वकील या देशातीलच नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ उपयोगिता पदं. निदान त्याच्या प्राप्तीसाठी तरी एवढा पैसा लागू नये. ते एवढा पैसा घेतात. जो पैसा सर्वसामान्यांना झेपत नाही. परंतू ते तरी काय करणार. त्यांना ते शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ पैसा मोजावाच लागतो. म्हणून ती मंडळी आपला पैसा काढण्यासाठी असा पैसा काम करतांना घेतात.
मुळात शिक्षण हे निःशुल्क असावं. ते मग डॉक्टरकीचं असो की इंजीनियरचं वकीलकीचं असो की मास्तरकीचं. ते जेव्हा निःशुल्क होईल. तेव्हाच ख-या अर्थानं देश सुधारेल. देशाला सुजलाम सुफलाम बनवता येईल. तसेच सर्वांना शिक्षण तर घेता येईलच. तसेच शिक्षणाचे महत्व तर वाढेलच. व्यतिरीक्त योग्य न्यायही मिळवता येईल त्याचबरोबर वेगवेगळ्या व्याधीवर उपचारही. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

 

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button