येवतीत एक वर्षापासून पहिल्यांदाच झाली ग्रामसभेचा
येवतीत एक वर्षापासून पहिल्यांदाच झाली ग्रामसभेचा
सुनील शिरपुरे/ झरीजामणी
तालुक्यातील लिंगती गटग्रामपंचायत अंतर्गत येवती येथे आज ग्रामसभा घेण्यात आली. लिंगती गटग्रामपंचायत अंतर्गत येणा-या येवती गावात एक वर्षांपासून पेसा ग्रामसभा घेण्यात आली नाही. त्या अनुषंगाने आज दिनांक 14 रोजी ग्रामसभा घेण्यात आली.
रखडलेल्या कामाची पाहणी करून गावातील समस्या म्हणजे पाणी, नळयोजना, नवीन गटारी नाले करून देने, नवीन पथदिवे बसविणे अशा प्रकारे पेसा ग्रामसभेमध्ये नियोजन करण्यात आले व त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यात प्रमुख उपस्थिती, लिंगती गटग्रामपंचायत येथील ग्रामसेवक गिज्जेवार साहेब, सरपंच बद्दमवार ताई, समाजसेवक जगदीश बद्दमवार, पवन कुळसंगे, शालिक गोंडे, अविनाश किनाके,विष्णू तोडसाम, नानाजी गोंडे, मारोती गोंडे, नागोराव अरके व समस्थ गावातील नागरिक उपस्थित होते. अशाप्रकारे ही ग्रामसभा अतिशय शांततेत व यशस्वीरीत्या पाड पडली.