राजकीय

आमदार गाणार; एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व

 

आमदार गाणार; एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व

एखादा आमदार म्हटलं तर आपल्यासमोर असा चेहरा उभा राहतो. ज्याचं स्वतःचं कार्यालय तर असतं. ज्यांचे कपडे भरजरी असतात. ज्यांचं बोलणं तापट असतं नव्हे तर ज्यांचं वागणंही तापट. परंतू आमदार गाणार सर हे सौम्य स्वभावाचे असून त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं नव्हे तर त्याचा पोशाखही एका आमदाराला लाजवेल असंच आहे. अशा या आमदाराची या लेखाच्या निमीत्यानं करुन दिलेली ओळख.*
काही काही मंडळी अशी असतात की ज्यांना प्रसिद्धीची हाव नसते. ते कार्य करीत असतात, ते त्यांचं नाव व्हावं म्हणून नाही तर आपण एक समाजाचा एक घटक आहोत म्हणून. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास झाला. तो त्रास इतरांना होवू नये म्हणून ते झटत असतात. असेच लढा देणारे आहेत गाणार सर. जे शिक्षक आमदार म्हणून नागपूरमध्ये निवडून आलेत.
राष्ट्रहित विद्यार्थी हित व शिक्षकहित असं ब्रीदवाक्य असणा-या महाराष्ट्र शिक्षक परीषदेतून माननीय गाणार सर निवडून आले. त्यांनी केवळ वेतन उचलणा-या शिक्षकांनाच न्याय दिला नाही तर त्या उपेक्षीत शिक्षकांनाही न्याय दिला, ज्यांना वेतन मिळत नव्हते. तसेच त्या विद्यार्थ्यांनाही न्याय मिळवून दिला. ज्यांना काँन्व्हेंटच्या भरमसाठ शुल्क घेणा-या शाळेत प्रवेश मिळत नव्हते. असे निःस्वार्थ कार्य करणारे गाणार सर त्यांचा लढा हा अजुनही अविरतपणे सुरुच आहे.
समाजात अशी माणसं क्वचितच जन्माला येतात. आमदार असलेले गाणार सर हे त्यापैकीच एक. ते अगदी साधे राहतात. त्यांच्या साधेपणाच्या वागण्यावरुन त्यांना अनेकवेळा अडचणीही आल्या. एकदा विधानपरीषदेत प्रवेश करीत असतांना तेथील चौकीदारानं त्यांना अडवलं व कडक विचारणा केली. तेव्हा त्यांना आपलं ओळखपत्र दाखवावं लागलं. दुसरा एक प्रसंग सांगतो. ते एकदा बसमधून जात असतांना त्यांनी आपली तिकीट काढली आमदार एसटीतून प्रवेश करुच शकणार नाही असं समजून. तेव्हा कोणीतरी गाणार सरांना ओळखणारा व्यक्ती त्या कंन्डक्टरला म्हणाला की ते सर आमदार आहेत. तेव्हा कंन्डक्टरला वाईट वाटलं. परंतू तिकीट कापल्यानंतर त्यावर उपाय नव्हता.
आज बसमधून जातांना काही लोकं तिकीट न काढता प्रवास करतात. काही पासष्ट वर्षाचे वयापेक्षा जास्त नसूनही ओळखपत्रात वय वाढवतात व बसमधील अर्ध्या तिकीटाचा फायदा घेतात. परंतू गाणार सर आजही बसमधूनच प्रवास करतात नव्हे तर त्यातून प्रवास करतांना तिकीटही काढतात.
एकदा रेल्वेमधील त्यांचा प्रवास आठवतो. ते रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्यांच्या त्याच रेल्वेतून एक महिला प्रवास करीत होती. तेव्हा त्या बोगीत एक गर्भवती महिलाही होती. तेव्हा गाणार सरांनी आपली सीट तिला दिली व आपण स्वतः मुंबईपर्यंतचा प्रवास उभे राहून केला. आज लोकं असे नाहीत की जे दुस-यांना मुंबईपर्यंतचा प्रवास करतांना आपली जागा दुस-यांना देतील. ते तर पैसे मोजून स्वतःच्या आरामाची व्यवस्था रेल्वेमध्ये करुन घेतात. परंतू गाणार सर हे वेगळ्याच विचारांचे आहेत.
सुरुवातीला आमदार बनल्यावर गाणार सरांना शिक्षण कार्यालयही घाबरत नव्हते. कारण त्यांची लढाई ही पत्राची असून संयमाची होती. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो असं ते मानतात. त्यासाठी पत्र पाठवावेच लागते असं ते म्हणतात. कारण तो कागद म्हणजे पुरावा असतो असं ते म्हणतात. पत्र लिहिण्यात ते खुप माहिर आहेत. काही काही पत्र ते स्वतः लिहितात. त्यांच्या या पत्राच्याच प्रभावानं त्यांनी मोठमोठे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारी पक्षी मारले.
गाणार सर हे शेतकरी कुटूंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील हे शेती करीत होते. त्यांनी शालेय प्राथमीक व माध्यमीक शिक्षण पुर्ण करताच ते नागपूरमध्ये आले. तिथे मथुरादास मोहता महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. इथूनच ते घडले. या महाविद्यालयात ते अभावीपचे उमेदवार म्हणून लढले. त्यावेळी त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांच्यावर दबाब निर्माण केला गेला. काही धमक्याही आल्या. परंतू त्याला न घाबरता ते महाविद्यालयीन राजकारणात सक्रीय राहिले. पुढे ते अभावीप तर्फे निवडूनही आले. याच दरम्यान नीतीन गडकरीशी संपर्क आला.
पुढे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यावर ते कमाल चौकातील जगजीवनराम हायस्कुलमध्ये गणित विषयाचे शिक्षक म्हणून लागले. परंतू इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्या काळात गणित विषयाचे शिक्षक मिळत नसतांनाही व गाणार सर गणित विषयाचे शिक्षक असूनही ते राजकारणी आहेत व संस्थाचालकाला घाबरत नाहीत. म्हणून संस्थाचालकानं त्यांना दोन वेळा बडतर्फ केलं. कारण त्यावेळी संस्थाचालकाचा वेगळाच दबाब होता. संस्थाचालकाच्या कोणीही विरोधात जात नसत. तसेच त्यांच्या विरोधात कोणीही ब्र देखील काढू शकत नसे. त्यावेळी ते लढले. न्यायालयात लढले संस्थाचालकाविरोधात. त्यातच त्याच काळी ते आमदार दिवाकर जोशीच्या संघटनेत सहभागी झाले. जी संघटना केवळ संस्थाचालकांचा शिक्षकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी अस्तित्वात आली होती.
आजही बरेचसे शिक्षक संस्थाचालकांना घाबरतात. कारण त्यांचे कासरे संस्थाचालकाच्या हाती असतात. परंतू आज बरेचसे असे शिक्षक आहेत की जे संस्थाचालकाला घाबरत नाहीत. ते संस्थाचालकाचा अन्याय सहन करीत नाहीत. हे सर्व गाणार सरांच्या माध्यमातून साध्य झालं आहे. परंतू आजही नियुक्ती आणि बडतर्फचे अधिकार हे संस्थाचालकांना असल्यानं आजही शिक्षक घाबरतात.
आज खरं तर असे कायदे बदलविण्याची गरज आहे. नियुक्ती आणि बडतर्फीचे अधिकार हे संस्थाचालकाला नसावे. ते प्रत्यक्ष न्यायालयाला वा शिक्षणाधिकारी साहेबाला असावे. तेव्हाच शिक्षक हा अभय होवून आपल्या वर्गात शिकवेल. तसेच आपल्या वर्गाला न्याय मिळवून देईल.
आज आमदार गाणार सरांकडे शिक्षक आशेच्या दृष्टिकोणातून पाहतात. बहुतःश गाणार सरांनी शिक्षकांच्या नियुक्त्या व त्यांचं निलंबन संस्थाचालकाच्या हातून काढण्यासाठी लढावं असं शिक्षकांना वाटते. ते त्यासाठीच त्यांच्याकडे आशेच्या दृष्टीनं पाहतात. तरीही गाणार सर लढत आहेत या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी. हे निलंबन आणि ही नियुक्ती संस्थाचालकाच्या हाती असल्यानं भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. तो भ्रष्टाचार कदाचित त्यांच्या हातून दूर होईल असं वाटते. तसंच ते निलंबन व नियुक्त्या संस्थाचालकाच्या हातून त्यांच्याच प्रयत्नातून निघेल व शिक्षकांना अभय मिळेल असे वाटते. जेणेकरुन यातून शिक्षक आपल्या वर्गात संस्थाचालकाला न घाबरता निर्भयपणे शिकवेल व त्यातून त्यांच्या सुप्त गुणांचा तर विकास होईल. व्यतिरीक्त विद्यार्थी विकास होईल. तसेच शाळेचा आणि देशाचाही विकास होईल. हे नाकारता येत नाही. हेच कार्य गाणार सर आजपर्यंत करीत आल्यानं आज ते दोन वेळा आमदार झाले. सन २०१० मध्ये पहिल्यावेळी व सन २०१७ मध्ये दुस-या वेळी. आज ही शिक्षकांना त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. तसं पाहता ते सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. आज त्यांच्याकडे येणारा वर्ग जर पाहिला तर अगदी काँन्व्हेंटला शिकणा-या लहान मुलांपासून तर अंशी वर्षाच्या म्हाता-यापर्यंतचा आहे. प्रत्येकाचा ते फोन उचलतात. मग तो कोणीही असो. ते कोणालाही व्हि आय पी वागणूक दाखवत नाही. प्रत्येकाशी बोलतात.तसेच प्रत्येकाशी चांगूलकीनं समोर येतात. त्यामुळं लोकं त्यांच्याबद्दल आवर्जून म्हणतात की आम्ही आजवर असा आमदार पाहिला नाही. न पाहणार. कारण आमदार म्हटलं तर व्हि आय पी वाटणारा. त्याच्याकडे गेल्यावर त्यांचा चौकीदारच अडवतो. त्यातही त्यांची भेट झालीच तर ते बरोबर बोलतही नाही. आपण म्हटल्यावर अधिकारी वर्गाला एक साधा फोन लावत नाहीत. कधी पत्र लिहित नाहीत. पत्र लिहिण्यासाठी काही आमदार पैसेही मागतात. म्हणतात की आम्ही तुमच्यामुळं निवडून आलो नाही. मात्र गाणार सर याऊलट आहेत. ते स्वतः फोन लावतात आणि कधीकधी त्या समस्या दूर करण्यासाठी स्वतः येतात. जणू त्यांनी आपलं जीवन शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी समर्पीत केलं आहे असं वाटते. त्यांनी तर शिक्षकहितासाठी आपली पेन्शनदेखील नाकारली आहे. हे वास्तववादी सत्य आहे.
खरं सांगायचं म्हणजे असेच आमदार खासदार, अधिकारी, नगरसेवक, संस्थाचालक, मुख्याध्यापक प्रत्येकांना मिळायला हवे. जे गाणार सरांसारखे असावेत. ज्यांना स्वतःची व्हि आय पी वागणूक नसावी. कोणालाही हवं तेव्हा भेटता यावं. तसेच कोणालाही केव्हाही फोन करता यावा. तेव्हाच खरं समाधान वाटतं. खरं पाहता आमदार गाणार सर हे त्यातीलच आहेत. स्वतःला व्हि आय पी न समजणारे. परंतू व्हि आय पी पेक्षा बरेच मोठे असलेले.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button