माणूस दगड झाला..
माणूस दगड झाला
मी माणसां माणसांत देव शोधला
त्यांनी देव दगडाला मानला
त्यांने वेद वाचून पोट भरले
माझे आयुष्य कष्टाच्या वेदनांनी वेढले
कष्टाळू जीवंत देह उपाशी
निर्जीव दगड मात्र तुपाशी
कोणी आणलं हे शास्त्र पुराण
भेकड मनुवादी वेद गाऱ्हाणं
ऐकून अंतर्मनात चळवळ उभी झाली
एकापाठोपाठ एक रांग लागली
दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे
एन. डी. लंकेश जमले सारे
छ.शिव, फुले, शाहू, आंबेडकर
यांचा वारसा घेऊन सत्वर
मी अंधश्रद्धेला ठासून भिडलो
संविधान हाती घेऊन उभारलो
एक एक मनुवादी सनातनी
सैरभैर पळू लागले रानो वनी
जाब विचारता षडयंत्र कावे रचले
देव नांवाच्या पोथीपुराणात बांधले
तो अज्ञानी माणसांचा कळप बिथरला
देव नांवाच्या अंध कल्पनेत खोल गुंतला
राष्ट्रसंत पुरुषांची शिकवण विसरला
दगडाला देव मानून, माणूस दगड झाला
*कवी, लेखक, समाजसेवक*
*हिंदरत्न दिपक लोंढे*
*सांगली. ८६६८२ ५५५०३ wt.*
*शनीवार दि.२२.०१.२०२२