ईशान्य भारताच्या तळागाळातील, दुर्गम,भागात रिपब्लिकन विचारधारा वास्तवात उतरवणारा एक पिपासू विनोद निकाळजे..!
ईशान्य भारताच्या तळागाळातील, दुर्गम,भागात रिपब्लिकन विचारधारा वास्तवात उतरवणारा एक पिपासू विनोद निकाळजे..!
मानवी जीवनाला एक विकाससूत्र आहे .या विकाससूत्राला निसर्गाने मुक्तसंचारतेच रूप दिलं तरी भारतीय समाज व्यवस्थेतील जातीय धर्मव्यवस्थेने त्यात आडमार्ग निर्माण केलेलेले आहेत.त्यामुळेच भारतीय समाजव्यवस्थेतील शोषित पीडित अत्याचारित माणसांचे उत्थान करण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची एकमेव अद्वितीय निवड म्हणजेच महाकारूणीक तथागत गौतम बुद्धांची निवड होय. कारण बुद्ध हेच मानवी कल्याणाचे प्रथम आणि अंतिम अहि सत्य आहे.तीच बुद्धांची संकल्पना आपल्या संविधानात उतरवून बुद्धांच्या संघाला संसदेच्या रूपात पाहणाऱ्या महामानवाने या देशातील बहुजनाला शासनकर्ती जमात व्हायला सांगितले आहे.कारण बाहेरून व्यवस्थेला पोखरण्यापेक्षा सत्तेचा भाग बनून व्यवस्था परिवर्तनाची मोट बांधणे केव्हांही अधिक सोयीस्कर ठरते .त्यामुळेच दलित पॅंथरच्या क्रांतीच्या रणसंग्रामपासुन ते आजच्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्याच्या रूपात आपली न्यायिक भूमिका मांडणाऱ्या लढवय्या नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारतातील दुर्गम,डोंगराळ,भागातील तळागाळात जिथं सूर्यकिरण पोहचुशकत नाही तिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार प्रस्थापित करणारा युवा भीमसेनानी विनोद निकाळजे म्हणजे गर्दीची नाही तर दर्दीची रिपब्लिकन चळवळ वास्तवात उतरवणारा पिपासू होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील चळवळीची चाचपणी केली असता भुकेने कंगाल,अन्याय अत्याचाराने बिहाल, न्याय, हक्क, अधिकाराने पिछाडीवर पडलेल्या शिलेदारांचा इतिहास हाती लागतो.त्यामुळे त्याचे साक्षेपी साक्षीदार म्हणजे नामांतर लढा आणि दलित पॅंथरच्या चळवळीतील सर्व लढव्यांचा अग्रक्रमाने उल्लेख करता येईल. चळवळ काय देऊ शकेल याचा मापदंड लावणे चुकीचे ठरू शकते. कारण चळवळ ही एक अशी क्रांतीची ठिणगी आहे जी या देशातील व्यवस्थेला सुरूंग लावू शकते. आणि प्रस्थापित व्यवस्थेचा तक्तताज उलथून पाडू शकते. ज्या पद्धतीने दलित पँथरने शासन, प्रशासन राजकारण, समाजकारण, साहित्य, पक्ष ,संघटना, सत्तापरिवर्तन, न्याय, हक्क ,अधिकार ,आणि शिक्षण या सगळ्या क्षेत्राच्या अडगळीत पडलेल्या दिशांना खुली वहिवाट करून दिली त्यातून अनेक नेते ,कार्यकर्ते ,विचारवंत ,साहित्यिक ,पत्रकार, राजकारणी, प्राध्यापक ,वकील ,अधिकारी,उदयास आले.त्यापैकीच एक म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले आहेत. मुळात नेता अधिक मोठा तेव्हाच होतो जेव्हा त्याचा कार्यकर्ता मोठा होतो.म्हणूनच ज्या पद्धतीने दलित पँथर आणि नामांतर लढ्यातील ज्या ज्या ढाण्या वाघांची भूमिका त्यावेळी गावोगावी चर्चिली जात होती त्यात विद्यमान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा ही गवगवा कमी नव्हता.अशा माणसांच्या कार्याचा गवगवा ऐकत प्रत्यक्षातील भेटी दरम्यान दुरू उभे राहून पाहणारा कार्यकर्ता जेव्हा आज संपूर्ण ईशान्य भारताची धुरा खांद्यावर घेऊन नेटाने आणि गतीमानतेने मार्गक्रमण करत आहेत याची कल्पना रिपाई(आ)च्या अनेकांनी कधी कोणीच केलेली नसावी.तत्कालीन काळाचा उल्लेख करतांना १९७० च्या आसपास महाराष्ट्रात दलितावर होणाऱ्या अत्याचारात वाढच होत गेलेली होते असे चित्र दिसते. १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या इलाया पेरूमल समितीच्या अहवालात नमूद केलेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनात
सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू देण्यास सक्त मनाई,
हॉटेलमध्ये ताटात प्लेटमध्ये खाद्यपदार्थ देण्यास नकार,नाव्ही व धोबी सेवा स्वीकारण्यास मनाई, पंचायतीच्या बैठकीत दूरवर बसविणे किंवा वेगळी व्यवस्था करणे, झोपडीत कोंडून कुटुंबास जाळणे,
नरबळी देणे,दलित स्त्रियांची नग्न करून धिंड काढणे,दलित स्त्रियांवरील बलात्कार,जबरदस्त मारहाण व ठार करण्याची धमकी देणे,दलितांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मानवी विष्ठा, मृत जनावरे टाकणे,उभी पिके नष्ट करणे,सार्वजनिक बहिष्कार टाकणे,रस्त्यावरून लग्नाची वरात नेऊ देण्यास बंदी करणे यासारख्या बाबी नित्याचाच घडत असत. त्यामुळे आपल्याही गावात वर उल्लेखीत बाबी रोजच घडतात याचा खोलवर विचार करत असतांना त्या संदर्भातील अस्पृश्यता अन्याय अत्याचाराविरोधात दलित पँथर हाच एक आशावाद ज्या काळात वाटायचा त्याच दरम्यानच्या काळात विद्यार्थी दशेतूनच अशा अनेक प्रकारच्या चटक्यांना बळी पडलेला एखादा विद्यार्थी चळवळी पासून कसा दूर राहू शकेल ?म्हणूनच अशा रामदासजी आठवले यांच्याकडून प्रभावित झालेल्या कॉलेज तरुणाने आपल्या गावातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा स्थापन केली. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंतर्गत येणारे डोंगरसनी गावात या छोट्याशा गावात जन्म झालेल्या नेतृत्वाचे नाव म्हणजे विनोद वसंत निकाळजे आहे. ज्या पद्धतीने अवकाशाला गवसणी घालण्यासारखे त्यांचे कार्य आहे .त्यात त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर हे केवळ त्यांचेच नाही तर त्यांच्या आई-वडिलांचेही यश आहे याचा प्रत्यय येऊ लागतो.
काबाड कष्ट उपसत मुलांना शिक्षण देणार्या अतिसामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनोद वसंत निकाळजे आज ज्या पद्धतीने रिपब्लिकन विचारधारा तळागाळात पोहोचवत एक सक्षम नेतृत्वाच्या भूमिकेतून ईशान्य भारताच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जबाबदारी पार पाडत आहेत त्याबाबतीत त्यांना अशी कुठलीही राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक, पार्श्वभूमी कुटुंबातून न्हवती.अशा गरीब कुटुंबातून उदयास आलेल्या विनोद निकाळजे यांच्या आई- वडिलांनी शेतात, बांधावर जात कष्ट करत मुलांना शिक्षणाचे धडे दिले हे भूषण वाटते. त्यात लेकर जेव्हा
शिकणाबरोबरच बाबासाहेबांच्या चळवळीचे धडेही गिरवणारे निघाले की,आई वडिलांचा उर अभिमानाने फुगतो. प्राथमिक ते माध्यमिकपर्यंतचे शिक्षण आपल्याच तालुक्यात पूर्ण केलेल्या विनोद निकाळजे यांनी शिक्षणाचे गंभीर महत्व जाणून घेत.उच्य शिक्षण आणि दर्जेदार शिक्षणासाठी मोठ्या शहराची निवड केली.त्यात पदवीचे शिक्षण पुण्यासारख्या शहरातून पूर्ण केले आहे तर मुंबई विद्यापीठातून उच्च शिक्षण अहर्ता धारण केलेल्या विनोद निकाळजे यांना चळवळ, विचारधारा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास शिक्षण काळातच झाला.त्याकाळातील एमबीएची पदवी म्हणजे गलेलठ्ठ पगार ,पैसा ,श्रीमंतीच्या लालसेपोटी ते परदेशातही सेटल झाले असते; पण ज्यांच्या धमन्यातून रक्त नाही तर चळवळ प्रसरण होत असते अशांना पांढरपेशी सुख भुरळ घालू शकत नाही हेही तितकेच खरे आहे.
कॉलेज वयात 1993 च्या दरम्यान ग्रामस्तरावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची शाखा उभारून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या निकाळजे यांना स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत गावात बोर्ड लावण्याच्या संदर्भाने प्रचंड विरोध झाला; पण बसस्टॅडवर इतरांनी बोर्ड लावले आहेत त्यामुळे माझाच बोर्ड का हटवता ? म्हणून गावाच्या विरोधात जाणाऱ्या निकाळजेना शंभर-दोनशे समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, रामदास आठवलेंचा फोटो ,फलक पाहून ज्या जातिवाद्यांची पोटदुखी व्हायची त्यासर्व गोष्टीचा सामना विनोद निकाळजे यांनी केला. प्राणघातक हल्ल्यातून कसाबसा वाचलेला हा रिपब्लिकन पिपासू अन्यायाला सहन करणारा नाही तर अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणारा आहे .त्यामुळे आपणास ज्या-ज्या लोकांनी मारले त्या त्या लोकांना प्रतिमार न देणारे विनोद निकाळजे ते कसले?असा हा माणूस शिक्षण करत करत चळवळीत काम करत राहिला हे आजच्या तरुणांना सांगण्याची विशेष बाब होय. कारण या काही वर्षात तरुणांचा चळवळीपासून संपर्क तुटत आला आहे. त्यामुळे चळवळ ही तुमच्या शिक्षणात बाधा ठरत नाही तर ढाल ठरू शकते ही बाब इथे स्पष्ट करणे गरजेचे आहे. शिक्षण काळात चळवळीत सहभाग घेऊन आंबेडकरी विचारांचा प्रचार-प्रसार करत समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठवणे, न्याय मागणे यासारख्या चळवळीच्या कार्यात शिक्षणाला कुठेच बाधा पोहोचत नाही ही बाब आजच्या तरुणांनी विनोद निकाळजेकडून शिकण्यासारखी आहे.
अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने सामाजिक व राजकीय कार्य करीत सक्रियपणे भूमिका बजावत एक मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या विनोद निकाळजे यांच्याकडे समाजाला दिशा देण्यासाठी बरेच काही आहे. देशात विविध प्रकारची पक्ष आहेत त्यात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस ,जनता दल,शिवसेना, अकाली दल, समाजवादी पार्टी ,आम आदमी पार्टी ,कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी , तृणमूल काँग्रेस अशासारख्या अनेक राज्य आणि राष्ट्रीय पक्ष देशात आहेत; पण ही पक्ष प्रणाली देशातील अखंडतेला एकात्मतेला तडा निर्माण करणारी आहे. कारण या पक्षीय धोरणातून राजकारणाची जी आखणी केली जाते त्यात जात, धर्म, भाषा,लिंग,पंथ या प्रणालीवर राजकारण केले जाते त्यामुळे ही पक्षीयव्यवस्था समाजाला योग्य न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे याला एकमवे पर्याय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जी रिपब्लिकन विचारधारा आहे तीच या अखंड भारताला निर्माण करू शकते ,जिवंत ठेवू शकते अशी त्यांची भूमिका आहे. समाजातील विविध स्तरातील मूलभूत प्रश्नाबरोबरच ,कार्यकर्त्यांच्या समस्या,रस्ते,वीज,पाणी,अन्याय अत्याचाराच्या बाबतीत आवाज उठवत सरकार आणि व्यवस्थेला धारेवर धरणारे विनोद निकाळजे यांनी अनेक आंदोलने,मोर्चे,उपोषणे यांसारख्या भूमिका नेहमीच घेत आले आहेत.प्रचंड जनसंपर्क ,तळागाळातील सामान्य कार्यत्यासोबत थेट संबंध,आणि प्रत्येकांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊन त्याला अचूक मार्ग दाखवणारे हे व्यक्तीमत्व गेली अनेक वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करत आहे. आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जी रिपब्लिकन आयडॉलॉजी आहे तीच अखंड भारताला निर्माण करू शकते, जिवंत ठेवू शकते कारण रिपब्लिकन विचारधारा ही जात, धर्म, पंथ, व्यक्ती ,अशी विरहित विचारधारा असून रिपब्लिकन विचारधाराच आपले उत्थान करू शकते. या ध्येयाने पेटलेले विनोद निकाळजे यांनी राज्यासह देशभरात रिपब्लिकन विचारधारा प्रस्थापित करण्याचे काम केले आहे.कारण ज्या ईशान्य भारतातील बहुसंख्य छोटी छोटी मागास आणि दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या राज्यांचा आपण विचार करतो तिथे अजूनही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पोहचवू शकली न्हवती त्या ठिकाणी निळा ध्वज, जय भीमचा जय घोष,रिपब्लिकन विचारधारा त्या त्या दऱ्या खोऱ्यात पसरवण्यात निकाजे यशस्वी झाले आहेत. हे त्यांचे विशेष कार्य आज प्रेरणादायी ठरते.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने 2016 साली केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली ‘समाज समता रथाच्या ‘माध्यमातून जवळपास 17 हजार किमीचा प्रवास करत जाती तोडो समाज जोडोचे ध्येय ते बाळगतात. देशातील राजकारणात बहुजनांची सत्ता असल्याखेरीज त्यांना कुठल्याच बाबतीती उचित ध्येय गाठता येणार नाहीत. त्यामुळे जकारणापासून पळ काढायचा नाही तर ते केलेच पाहिजे असा मानस ठेवणारे निकाळजे यांच्या राजकारनाचं गणित म्हणजे 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण अशी हातोटी चालवुन नेतृत्व करणाऱ्या विनोद निकाळजे रिपब्लिकन पक्षातून जनसामान्यांचा अधिकाधिक फायदा करण्यासाठी ते धडपडत असतात.आजच्या घडीला तरुणांनी बेरोजगारी, नोकरीच्या अभावामुळे घालमेल निर्माण न होऊ देता बिकट अवस्थेत अडकून न ठेवता त्यांना उद्योग व्यवसायातून सक्षम करण्यावर विनोद निकाळजे यांचा अधिक भर आहे.त्यामुळे आजच्या घडीला तरुणांना विनोद निकाळजे हा एक सक्षम आधार वाटत आहे. खच्चीकरण जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे सरकारी नोकऱ्या संपुष्टात आल्याने आजच्या तरुणांना रोजगार कसे मिळणार ?या समस्येवर तोडगा काढत महाराष्ट्रप्रमाणेच ईशान्य भारतातील अनेक डोंगराळ राज्य, त्यातील छोटे छोटे दऱ्या खोऱ्यातील गावे ,वस्ती या भागातही डॉ. बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिक विचार पोहचवत तेथील लोकांना,तरुणांना रोजगारक्षम बनवण्यात विनोद निकाळजे यशस्वी होत आहेत .सामाजिक न्यायाच्या बऱ्याच योजना असतात त्या व्यक्तीला आर्थिक सबळ बनवू शकत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ही खेदाची बाब आहे असेही निकाळजे वेळोवेळी सांगतात.आजच्या तरुणांनी उद्योग व्यवसायात स्वतःची आर्थिक उन्नती साधली पाहिजे कारण आर्थिक सबलता हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने अगोदर आपली आर्थिक उन्नती करा म्हणून सांगणाऱ्या निकाळजे यांनी राज्यातील अनेक तरुणांना रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यातील मार्गदर्शन व याबाबतीत त्यांचं मोठा सहभाग आहे. देशातील बहुतांश राज्यात, देशातील नक्षलवाद,उग्रवाद,अतिरेकी कारवाया यासारख्या घटनां पेट घेत असतात. यात शासन-प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होऊन सामाजिक असुरक्षितता हा प्रश्न देशासमोर निर्माण होत असले तरी ते संपुष्टात आणता येतात यासंदर्भात विनोद निकाळजे च्या पद्धतीने आपली भूमिका मांडतात त्यात सत्यता आढळून येते. त्यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास विनोद निकाळजे म्हणतात की, ‘पोटाचा प्रश्न मिटला की हातातील शस्त्रे खाली पडतात’ या शब्दातच विनोद निकाळजे देशातील मोठ्या प्रश्नांचा निर्वाळा एका मार्मिक वाक्यात करतात.केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले त्यांच्या नेतृत्ववादी तालमीतून रिपब्लिकन विचारधारेने पेटलेल्या चळवळीतील पिपासू नेतृत्वास 31 जानेवारी रोजी जन्म दिनाच्या मंगल कामना..! जय भीम
– मनोहर सोनकांबळे
– ८४५९२३३७९१,८८०६०२५१५०
(एम.फिल.संशोधक विद्यार्थी
माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
शुभेच्छात्मक संकल्पना:
इंजि. अमोल गोणारकर
(सचिव,नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ,गोणार ता.कंधार जि. नांदेड
श्रीकांत गोणारकर (अध्यक्ष,नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ,गोणार ता. कंधार जि. नांदेड)