नांदेड प्लागर्स व नागरिक कृती समिती तर्फे “आपलं नांदेड – प्लास्टीक मुक्त नांदेड” अभियानास सुरुवात
नांदेड प्लागर्स व नागरिक कृती समिती तर्फे “आपलं नांदेड – प्लास्टीक मुक्त नांदेड” अभियानास सुरुवात
नांदेड: नांदेड प्लागर्स व नागरिक कृती समिती, नांदेड यांच्या मार्फत आज ‘हुतात्मा दिना’ दिनाचे औचित्य साधून आपलं नांदेड – प्लास्टीक मुक्त नांदेड या अभियानाची सुरुवात सकाळी 07:30 ते 9:30 या वेळेत नवीन मोंढा मैदान येथे करण्यात आली.
या चळवळीची सुरुवात स्वीडन मध्ये 2016 मध्ये झाली जॉगिंग करताना प्लास्टीक कचरा उचलून तो व्यवस्थित रित्या गोळा केला जातो. प्लास्टीक प्रदूषणा बद्दल वाढती चिंता झाल्यामुळे स्वीडन नंतर 2018 मध्ये जागतिक स्तरावर याचा प्रसार मोठ्या प्रमाणात
झाला. ही एक अशी चळवळ आहे की, जॉगिग करताना प्लास्टीक उचलताना खाली वाकणे, शरीराची हालचाल दोन्ही बाजूने होत असते म्हणजे यामुळे शरिराचा व्यायाम ही होतो व सोबत प्लास्टिक चा कचरा सुद्धा उचलला जातो. आजतागायत या चळवळीशी 100 हून अधिक देश व जवळपास 2,000,000 लोक जोडले गेले आहेत.
अशाच प्रकारचे अभियान नांदेड शहरात सुयश ढगे व सचिन राजभोज या दोन युवकांनी सुरुवात करण्याचे ठरवले. याच अनुषंगाने या मोहिमेची सुरुवात नवीन मोंढा मैदान येथे करण्यात आली. या चळवळीमध्ये नांदेड प्लॉगर्स सोबत नागरिक कृती समिती यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. जवळपास 55 युवकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. ‘नांदेड महानगर पालिकेच्या महापौर सौ. जयश्रीताई निलेश पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा हेतू सुयश ढगे याने थोडक्यात सांगितला. तत्पूर्वी नांदेड नागरिक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अशा प्रकारच्या चळवळीत युवकांचे योगदान फार महत्वाचे आहे आजच्या या अभियानात तरुणांची संख्या पाहून सरांनी समाधान व्यक्त केले. प्लास्टीक वापरण्यावर महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून नागरिक प्लास्टिकच्या वापरापासून परावृत होतील व आपलं नांदेड प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त होईल, असे प्रतिपादन केले. डॉ. हंसराज वैद्य यांनीही सदरील अभियान लांबपर्यंत सुरू ठेवण्याचे आवाहन उपस्थितीना केले. प्लास्टीकचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत त्यापासून आपणास वेळीच सावध व्हावे लागेल. प्रत्येक माता भगिनी आपले घर स्वच्छ ठेवतात त्याच प्रकारे आपले शहरही स्वच्छ ठेवतील अशी खात्री त्यांनी बोलून दाखवली. या आगळ्या वेगळ्या अभियानात प्रा. डॉ. बालाजी कोंम्पलवार यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांच्या पत्नीने बनवलेल्या प्लास्टीकचा हार घालून प्लास्टीक मुक्तीचा चा संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी नांदेडच्या महापौर सौ. जयश्रीताई निलेश पावडे यांनी या अभियानास महापालिकेतर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच येणाऱ्या काळात शहरात असलेल्या विविध शाळेत प्लास्टिक मुक्ती साठी “नांदेड प्लागर्स” च्या मदतीने विशेष अभियान राबवू असे जाहीर केले. लहान मुले चिप्स, कुरकुरे व इतर पदार्थ जास्त प्रमाणात खात आहेत, हे पदार्थ आरोग्यास हानिकारक तर आहेतच सोबत या हे पदार्थ प्लास्टीक मध्ये विकले जातात त्यातून फार मोठ्या प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण होत असल्यामुळे अशा प्रकारच्या पदार्था पासून विद्यार्थी व लहान मुलांना परावृत्त करणे आवश्यक आहे. म्हणून “नांदेड प्लागर्स व नागरिक कृती समिती संयुक्त रित्या या अभियानात महत्वाची कामगिरी बजावतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. सोबत प्लास्टीक वापरा बाबत महापालिका कठोर कारवाई करेल याची हमी या वेळी बोलताना महापौरांनी दिली.
सदरील कार्यकत्राचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. जयवर्धन बलखंडे यांनी केले. या अभियानासाठी नागरिक कृती समिती तर्फे डॉ. व्यंकटेश काब्दे, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. पुष्पा कोकीळ, प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवाड, धोंडीबा पवार, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे प्रा. डॉ. शैलेजा वाडीकर, यांच्या सहित “नांदेड प्लागर्स चे सर्व तरुण सदस्य उपस्थित होते .
अशा प्रकारची मोहीम दर रविवारी नांदेड शहरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार असल्याची माहिती सुयश ढगे याने दिली. तसेच पुढील रविवारी दिनांक ०६/०२/२०२२ रोजी छत्रपती चौक व परिसरात सकाळी ०७:३० ते ९:३० या वेळेत हि मोहीम घेण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त युवकांनी, प्रौढानी सहभागी व्हावे असे आवाहन “नांदेड प्लागर्स” व नागरिक कृती समिती तर्फे करण्यात आले आहे.