कोणता झेंडा घेऊ हाती”..हे गाणं अरविंद जगताप यांना असं सुचलं ज्यातून कार्यकर्त्याचा विचार झळकतो!
“कोणता झेंडा घेऊ हाती”..हे गाणं अरविंद जगताप यांना असं सुचलं ज्यातून कार्यकर्त्याचा विचार झळकतो!
सध्याच्या मराठी चित्रपट सृष्टीत कथा-पटकथा लेखन करणारे प्रख्यात लेखक अरविंद जगताप यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक मालिका, चित्रपटाचे लेखन केले आहे. त्याबरोबरच त्यांनी विविध प्रकारची गाणीही लिहली आहेत. अशा या लेखकास लिखाणाची संधी मिळाली ती निशिगंधा वाड यांच्या ‘हार्दिक’ नावाच्या पहिल्या मालिकेत तर चित्रपटाच्या बाबतीत मकरंद अनासपुरे यांनी संधी दिली. आणि गाण्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अवधुत गुप्ते यांनी यांना संधी दिली होती.
त्यात उभ्या महाराष्ट्राच्या ओठावर असलेलं प्रसिद्ध गाणं “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”? हे गाणं कसं सुचलं या प्रश्नाला उत्तर देताना अरविंद जगताप असं सांगतात की,
“अवधुत गुप्ते जेव्हा सिनेमा बनवित होते तेव्हा त्यांनी केवळ असा असा चित्रपट आहे’. म्हणून जगतापांशी
चर्चा झाली.आणि त्याच परिस्थितीशी जुळत मिळतं त्यांनी लिहलं होत;पण हे कसं सुचलं या प्रश्नाला उत्तर देतांना जगताप सांगतात की,
कारण कोणे एकेकाळी नेत्यांच्या सभेला जाणे. त्यांना आवडायचं. हळूहळू मग त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की, हे सगळेच राजकारणी सारखेच असतात. या पक्षातून त्या पक्षात जातात.त्यांना विचारधारेशी काही देणं घेणं नाही. पण या काळात सामान्य कार्यकर्ता तिथल्या तिथेच राहतो. त्यामुळेच या विचार मंथनातून सामान्य कार्यकर्त्याची होणारी हेळसांड ,कोलाहाल या सर्व गोष्टींचा विचारमंथन केल्यानेच विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे प्रसिद्ध गाणं लोकांच्या काळजावर कोरल गेलं होतं.